मल्याळम् भाषक ख्रिस्ती बांधवांना मिळाली सुखद भेट
| |
- कमिल पारखे
मंगळवार, 2 जून 2015 - 12:30 AM IST
| |
Tags: malayalam language, pune
|
मलांकारा सिरियन कॅथोलिक चर्चच्या नव्या "सेंट एफ्रेम खडकी-पुण‘े धर्मप्रांताचे शनिवार मे 30 रोजी उद्घाटन होत आहे. त्यानिमित्त...
मलांकारा सिरियन कॅथोलिक चर्चच्या नव्या "सेंट एफ्रेम खडकी-पुण‘े धर्मप्रांताचे शनिवार मे 30 रोजी उद्घाटन होत आहे. थॉमस अन्थोनिओस यांची या धर्मप्रांताचे पहिले बिशप म्हणून या दिवशी दीक्षा होणार आहे. सिरो-मलांकारा कॅथोलिक चर्चच्या इतिहासात ही एक महत्त्वाची घटना आहे. या नव्या धर्मप्रांताची स्थापना करण्याची घोषणा पोप फ्रान्सिस यांनी व्हॅटिकन सिटीमध्ये 26 मार्च रोजी केली होती. मल्याळम मातृभाषा असणाऱ्या मलांकारा सिरियन कॅथोलिक चर्चच्या भाविकांच्या दृष्टीने ही एक आनंदाची घटना आहे.

कॅथोलिक पंथात वेगळ्या प्रकारचे एकूण 21 राइट्स (उपासना विधी) आहेत आणि त्यापैकी भारतात लॅटीन राईट, सिरो-मलांकारा आणि सिरो-मलाबार असे तीन उपासनाप्रकार आहेत. पुण्यात लॅटिन राईटचे बिशप थॉमस डाबरे आहेत, नवीन धर्मप्रांताच्या स्थापनेने आता पुण्यात कॅथोलिक पंथीयांचे दोन बिशप असणार आहेत. संत थॉमसचे भारताच्या किनारपट्टीवर सन 52 मध्ये आगमन झाले होते, तेव्हापासून केरळमध्ये ख्रिस्ती धर्माची परंपरा आहे, असे केरळमधील कॅथोलिक आणि प्रोटेस्टंटपंथीयही मानतात. जगातील पहिले कॅथोलिकपंथीय असणारे केरळमधील ख्रिस्तीजन मुख्य कॅथोलिक प्रवाहातून अलग पडले आणि या मुख्य प्रवाहात 1930मध्ये पुन्हा सामील झाले. मलांकारा सिरियन कॅथोलिक चर्चचे सभासद सर्व जगभर आहेत आणि त्यांच्या चर्चमध्ये केरळच्या परंपरेनुसार आणि मल्याळम भाषेतच उपासना केली जाते, हे विशेष. या चर्चतर्फे जगभर शाळा-कॉलेजेस, दवाखाने आणि समाजसेवी संस्था चालविल्या जातात.
खडकी-पुणे धर्मप्रांताची स्थापना करतानाच पोप फ्रान्सिस यांनी गुडगाव-दिल्ली येथेही या चर्चच्या उत्तर भारतासाठी नव्या धर्मप्रांताची घोषणा केली आहे. मलांकारा सिरियन कॅथोलिक चर्चला यामुळे केरळ राज्याबाहेर पहिल्यांदाच आपले स्वत:चे धर्मक्षेत्र मिळाले आहे. अशाप्रकारे या चर्चला अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले आहे.
नवे बिशप थॉमस अंथोनिओस यांनी पुण्यातील नगररोडवरील ज्ञानदीप विद्यापीठात धर्मगुरुपदाचे प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर पुण्यातील बेथानी आश्रमात अनेक वर्षे कार्य केले आहे. त्यांच्या नियुक्तीने आणि नव्या धर्मप्रांताच्या स्थापनेने दक्षिण भारतातील कॅथोलिक मल्याळी समाजाला एक सुखद भेट मिळाली आहे.