या नव्या पिढीतील ही पोरंपोरी..
मी मिखाईल गोर्बाचेव्हच्या काळात सोव्हिएत रशियाच्या मॉस्कोत, क्रेमलीनमध्ये हिंडलो आहे. सोव्हिएत ब्लॉकचाच एक भाग असलेल्या पूर्व युरोपातील बल्गेरियात माझे पत्रकारितेतील पहिलेवहिले आणि एकमेव प्रशिक्षण पूर्ण झाले. बल्गेरियाची राजधानी सोफिया आणि इतर शहरांत संध्याकाळी डिनर झाल्यानंतर पब्समध्ये व्होडका घेऊन संगीताच्या तालावर मनसोक्त नाचलो आहे.
त्याआधी सत्तरच्या दशकात सातारा जिल्ह्यातल्या दगडी बांधकाम असलेल्या आणि गुरुवार वगैरे पेठा असलेल्या कराड शहरात मी शिकलो आहे. कराडमध्ये माझा बालपणीचा काळ संपून उमेदीचा, तरुणाईचा कालखंड सुरु झाला. तरुणाईचे माझे अनुभव आणि आठवणी तिथपासून सुरु होतात.
हल्ली मी पुण्यात जाताना सिटी बसने जातो आणि संध्याकाळी घरी परतताना मेट्रोने प्रवास करतो. मेट्रोच्या या वातावरणात आणि प्रवासातून आजकालच्या तरुणाईचे होणारे दर्शन मला अचंबित करून जाते. कालचाच प्रसंग घ्या ना.
मुठा नदीवर असलेल्या मेट्रोच्या पुलावरुन मेट्रोच्या स्थानकात शिरताना पावसाची रिपरिप कालही चालू होती. माझ्या पायाच्या नखाला जखम झाल्याने त्या जखमेत पाणी शिरू नये, जखम चिघळू नये म्हणून मी काळजी घेत होतो.
त्याचवेळी नदीवरील मेट्रोच्या पुलाच्या अगदी मधोमध फ्रॉकमधील एक मुलगी पावसात नाचत होती आणि तिच्याबरोबर असलेला तो मुलगा मोबाईलवर तिचे नाचणे टिपत होता. सिटी बसने प्रवास करताना तरुणाईची अशी हलकीफुलकी, सहजगत्या वावरणारी दृश्ये नजरेस पडत नाही. मेट्रोचा माहोल काही वेगळाच असतो.
डिस्ट्रिक्ट कोर्ट जंक्शनमध्ये ती दोन तरुणतरुणी एकमेकांच्या हातात हात घेऊन बाहेर पडली. येथून बहुधा त्यांच्या मेट्रोच्या लाईन्स बदलणार होत्या, कारण एकमेकांना जवळ घेऊन, आलिंगन घेऊन त्यांनी निरोप घेतला. पाठ बदलल्यानंतर चित्रपटांत दाखवतात तसे त्यांनी पुन्हापुन्हा मागे वळून पाहिलेसुद्धा नाही.

या तरुणाईचा पेहराव खास असतो हे सांगायलाच नको. जो तो आणि जी ती आपल्या मोबाईलमध्ये गुंग असते. त्यामुळे कोचमध्ये कितीही गर्दी असली तरी गोंगाट असा नावालाही नसतो. माझ्या रोजच्या मेट्रो प्रवासात या तरुणाईचे मोहक, आकर्षक आणि उत्साहवर्धक दर्शन घडते.
माझ्या समवयस्कातील पिढीने आपल्या तरुणाईच्या काळात इतिहास घडवला होता. घोषित आणिबाणीआधी गुजरातमध्ये मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी मोठा उठाव केला होता. या बंडाचे लोण नंतर बिहारमध्ये पोहोचले.
घोषित आणीबाणीविरुद्ध तेव्हाच्या तरुणाईने किती मोठा संघर्ष केला होता हे खरे तर आता सांगायलाच हवे. कराडच्या टिळक हायस्कुलात अकरावीत शिकताना माझेही त्यात अल्पसे योगदान होतेच. ` इंडियन प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी लॉस्ट इलेक्शन इन हर रायबरेली सिट' हे बीबीसी रेडिओवरून मध्यरात्री ऐकल्यानंतर सातारा मतदार मोजणी केंद्रात आम्ही केलेला जल्लोष आजही मला आठवतो.
विशेष म्हणजे त्यावेळी मी मतदार होण्यासाठी पात्रसुद्धा नव्हतो. त्याकाळात मतदार नोंदणीसाठी, सज्ञान होण्यासाठी वयाची एकविशी गाठावी लागे. भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान असलेल्या राजीव गांधी यांनी मतदारपदाची पात्रता एकवीस वर्षावरुन अठरा वर्षांपर्यंत खाली आणली. यामुळेच काँग्रेस पक्ष नंतर केंद्रातील सत्तेपासून दुरावला गेला असे काहींचे म्हणणे आहे.
आणीबाणीपर्वातल्या राजकीय क्रांतीने अनेक नेत्यांना जन्म दिला. अलीकडेच निधन झालेले युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी हे त्यापैकी एक.
मी शिकत असताना सत्तरच्या दशकात गोव्यात विद्यार्थी चळवळ खूप प्रभावी होती. आसामच्या विद्यार्थी आंदोलनाने तर देशात इतिहास घडवला. परकी नागरिकांच्या मुद्द्यावर ऑल आसाम स्टुडन्ट्स युनियनने निवडणूक जिंकून विद्यार्थी नेते प्रफुल्ल महंत वयाच्या ३२व्या वर्षी मुख्यमंत्री बनले. देशातील सर्वांत तरुण मुख्यमंत्री होण्याचा विक्रम अगदी अलीकडच्या काळापर्यंत अनेक वर्षे त्यांच्या नावावर होता.
काही वर्षांपूर्वी युरोपात फ्रान्समध्ये आणि इटलीमध्ये वावरताना तिथला अभ्यासलेला, वाचलेला इतिहास नजरेसमोर येत होता. पॅरीस, रोम आणि व्हेनिसमध्ये फिरताना तिथल्या बोल्ड तरुणाईचे दर्शन घडले. पॅरीसमध्ये एका मॉलमध्ये तिथल्या पोरसवदा कॅशियरशी संवाद साधताना त्याचे एक वाक्य आजही आठवते.

आम्ही भारतीय आहोत असे ऐकताच, ''इंडिया, ओह, शाह रुख खान्स इंडिया' असे तो उत्स्फूर्तपणे उद्गारला होता. पॅरीस आणि इतर शहरांत फिरताना मला फ्रान्सची राज्यक्रांती आठवत होती तर त्या फ्रेंच मुलाला भारतीय अभिनेता शाह रुख खान आकर्षित करत होता.
आज रविवारी सकाळी ब्रून घेण्यासाठी बेकरीत गेलो होतो. तिथला पंचविशीतला भरगच्च केशसंभार असलेला पोरगा मला जंतर मंतरला काय, काय झाले ते मला ऐकवत होता. तो मूळचा दिल्लीचा, त्याचा एक मित्र दिल्ली आंदोलनात होता, दुसरा एक अमेरीकेतून पाठबळ देत होता. ''तुला हे सगळे काही कसे कळत होते?'' मी त्याला विचारले. ''मी कायम मोबाईलवर अपडेट्स घेत असतो,'' तो उत्तरला.
याच तरुणाईने देशात आता पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. आपले भवितव्य घडवण्यात या पिढीने पुढाकार घेतला आहे.
Camil Parkhe
No comments:
Post a Comment