Friday, July 27, 2018

No school bag days’ in PCMC schools on 1st and 3rd Saturday of every month





‘No school bag days’ in PCMC schools on 1st and 3rd Saturday of every month

Camil Parkhe
Monday, 23 July 2018
Students in Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC)-run schools will henceforth enjoy ‘No school bag days’ twice a month. The students studying in 105 primary schools run by the civic body will not be required to carry their school bags on every first and third Saturday of the month. 
Pimpri: Students in Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC)-run schools will henceforth enjoy ‘No school bag days’ twice a month. The students studying in 105 primary schools run by the civic body will not be required to carry their school bags on every first and third Saturday of the month. 
On these days, the students will not be involved in the routine studies. Instead, they will, for a change enjoy the extra-curricular activities including a parade, book readings, attending lectures and interviews of renowned persons. 
The civic body’s Education Committee took a decision in this regard at its meeting held on July 19. The Education Board’s Chairperson Sonali Gavhane said the decision will be applicable to all primary schools run by the municipal corporation having classes from the first to the seventh standards, in Marathi, English, Hindi and Urdu mediums. 
There are complaints that the primary school students are overburdened with the weight of their school bags. The PCMC Education Committee has taken this decision to provide relief to the students at least on two days in each month.
There are nearly 38,000 primary school students who will be benefited by the ‘no school bag days’ decision.

Monday, July 16, 2018

Football World Cup fans sport idols’ hairstyles





Football fans sport idols’ hairstyles

Asha Salwi And Camil Parkhe
Thursday, 12 July 2018      goo.gl/DFSe13  
Football fans sport idols’ hairstyles
Hairstyles have no longer remained the sole monopoly of women. The young football fans are ready to pay the exorbitant fees to adorn the hairstyle of their favourite footballers.
PIMPRI: The FIFA Football World Cup fever has reached its peak and the youths in the city are rushing to hair saloons for adapting hairstyles of the most popular football players.
The hair stylists who are normally asked to do hairstyles of the most popular cricketers, are now getting themselves updated with the world’s most popular football players.
The football players from various countries whose hairstyles are in much demand include Portugal’s Ronaldo Cristiano, Brazil’s Neymar, Argentina’s Lionel Messi, Germany’s Tony Cruz and Spain’s Isco. These footballers who have been the star attractions during the ongoing FIFA World Football Cup matches in Russia are also known for their special hairstyles.
Hairstyles have no longer remained the sole monopoly of women. The young football fans are ready to pay the exorbitant fees to adorn the hairstyle of their favourite footballers. 
A 3D haircut with a tattoo is one of the most favourite hairstyles during the ongoing Football World Cup. 
This haircut is accompanied by carving FIFA letters on the head. Also, often colours are also used to highlight the special hairstyles.
“I am a fan of Ronaldo Cristiano and hence, I have copied his hairstyle. Many of my friends adorned hairstyles of their favourite footballers,” says Aniket Pawar, a college student.
“Young fans nowadays want hairstyles of their favourite football players. They show us the photos of the hairstyles of footballers and we meet their demands with the use of sophisticated machines,” says Mangesh Raut, a hairstylist from Morwadi in Pimpri.

Monday, July 2, 2018

कम्युनिस्ट राजवटींचा अस्तकाल आणि आजचा रशिया Fall of Communism





कम्युनिस्ट राजवटींचा अस्तकाल आणि आजचा रशिया
सोमवार , २ जुलै, २०१८         goo.gl/kuQdq8  कामिल पारखे
सध्या फूटबॉल वर्ल्डकपमुळे पुन्हा एकदा प्रकाशात आलेला रशिया एकेकाळी साम्यवादी राष्ट्रांचा पुढारी होती. आज कम्युनिझम नाहीसा झालेल्या या देशाच्या १९८०च्या दशकातील आठवणी.
मॉस्कोच्या रेड स्केअर चौकात उणे बारा तापमानाचा अनुभव घेत आम्ही उभे होतो आणि आमची अनुवादक आणि  गाईड आम्हाला त्या ऐतिहासिक स्थळाची माहिती देत  होती. राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निवासस्थान कोठे आहे, आमच्यापैकी एका  पत्रकाराने तिला मध्येच विचारले आणि आतापर्यंत उत्साहाने बोलणाऱ्या ती गाईड क्षणभर गप्पगारच झाली. बहुधा तिला परदेशी पर्यटकांकडून येणाऱ्या अशा प्रश्नांची सवय असावी. कारण ताबडतोब तिने मूळ प्रश्नाला बगल देत रेड स्केअरविषयी अधिक माहिती देण्यास सुरुवात केली. 
ही घटना होती एप्रिल १९८६ मधील. कॉम्रेड  मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी नुकतीच  युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लीक  किंवा यूएसएसआरच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस म्हणून सूत्रे घेतली होते. त्यांनी सुरू केलेल्या ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोईका या उदारमतवादी धोरणांची जगाला हळूहळू ओळख होत होती. त्या शीतयुद्धाच्या काळात अमेरिकाविरोधी गटाचे नेतृत्व रशियाकडे होते. व्हर्साव्ह करारावर सह्या करणारी इस्टर्न ब्लॉकमधील पूर्व जर्मनी, पोलंड, रोमानिया, झेकोस्लाव्हाकिया, हंगेरी,  बल्गेरिया  वगैरे राष्ट्रे रशियाच्या प्रभावाखाली होती. भारत अलिप्त राष्ट्रांचे नेतृत्व करत असला तरी रशियाच्या बाजूने झुकला होता. त्याकाळात भारतातील पत्रकारांसाठी या इस्टर्न ब्लॉक किंवा पूर्व युरोपातील राष्ट्रांत दरवर्षी पत्रकारितेचे पदविका अभ्यासक्रम आयोजित केले जात असत. इंडियन फेडरेशन ऑफ वर्किग जर्नलिस्ट्स तर्फे पत्रकारांची अभ्यासक्रमासाठी निवड केली जाई. गोवा युनियन ऑफ जर्नालिस्टचा मी सरचिटणीस होतो. त्यामुळे  त्यावर्षी बल्गेरियात होणाऱ्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी निवडलेल्या भारतातील ३० पत्रकारांच्या तुकडीत माझा समावेश होता. बल्गेरियाला जाण्यापूर्वी रशियाला आम्ही धावती भेट देत होतो. त्यानिमित्त तेथील राजकीय, सामाजिक जीवनाचे दर्शन घडले.
मॉस्कोच्या या भेटीत व्लादिमीर लेनिनचे शरीर जतन केलेल्या स्मारकास- लेनिन मौसोलियमला - आम्ही भेट दिली. थ्री-पीस सूट, अर्धवर्तुळाकार टकलावरील उरलेले चापूनचोपून बसवलेले केस असा तो लेनिन शांत झोपला आहे असेच वाटले. त्या कडाक्याच्या थंडीतही स्मारकास भेट देणाऱ्या लोकांची रांग खूप लांब होती.  स्मारकाच्या शेजारीच कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंगल्स, लेनिन, जोसेफ स्टॅलिन वगैरेंचे मोठे पुतळे होते. अत्यंत मोठया आकाराच्या त्या लाल चौकात वाहनांस मुळी परवानगीच नव्हती. अफूची गोळी  असलेल्या धर्मावर बंदीच असल्यामुळे तेथील मोठमोठ्या चर्चचे पर्यटन वास्तूंत रूपांतर झाले होते. या चर्चमध्ये साठी-सत्तरी उलटलेल्या पुरुष- महिला भाविक आणि काळ्या झग्यातल्या आणि दाढी राखलेल्या ऑर्थोडॉक्स चर्चच्या धर्मगुरूंशिवाय कुणी दिसत नव्हते. रशियातील सामान्य माणसांकडे त्यावेळी भारताचे  नाव काढले की इंदिरा गांधी आणि अभिनेते राज कपूर या दोनच व्यक्तीं त्यांच्या नजरेसमोर उभ्या राहत असत. 
मॉस्कोनंतर बल्गेरियात गेलो तेथे त्या देशाची राजधानी सोफिया आणि इतर अनेक शहरांना भेटी दिल्या.  रशियाचे जवळजवळ मांडलिक देश असलेल्या पूर्व युरोपातील देशांतही लेनिनच्या धर्तीवर आपापल्या राष्ट्रपुरुषांचे देह जतन करण्याची टूम होती. मृतदेह जतन करण्याची प्रक्रिया अर्थातच रशियातच केली जाई. सोफिया येथेही बल्गेरियन कम्युनिस्ट क्रांतीचा प्रणेता जॉर्जी  दिमित्रोव्ह यांचे शरीर असेच ठेवले होते. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त एक मे रोजी सोफिया येथे झालेल्या परेडला उपस्थित राहण्याची संधी मिळाली, त्यावेळी मी भारावूनच गेलो होतो.
१९८०च्या त्या  दशकात आणि त्याआधीच्या  कालखंडात भारतात  डाव्या चळवळीबाबत आणि  कामगार युनियनबाबत सामान्य लोकांची, विचारवंतांची सहानुभूती असे. जवळजवळ सर्वच सरकारी खात्यांत आणि खासगी उद्योगकंपन्यांत कामगार युनियन्स असतच. कामगार संघटना स्थापन करणे हा कामगारांचा हक्क आहे याविषयी त्यावेळी दुमत नसे. कामगार चळवळीसाठी एक मे  हा दिवस एका मोठा उत्सव असे. मला आठवते दरवर्षी एक मे रोजी कामगारदिनानिमित्त गोव्यात पणजीत, म्हापशात, मडगाव आणि वॉस्को येथे विविध डाव्या, उजव्या  आणि सेंट्रिस्ट विचारसरणींच्या कामगार संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रम आणि मोर्चे-फेऱ्यांचे आयोजन केले जात असे आणि दुसऱ्या दिवशी त्या घटनांचे सविस्तर वृत्तांकन आम्ही वृत्तपत्रांत छापत असू.  
पुरोगामी किंवा डाव्या विचारसरणीकडे झुकलेल्या विविध क्षेत्रांतील लोकांना, ओपिनियन मेकर्सना  त्याकाळात रशिया आणि पूर्व युरोपातील देशांची वारी करण्याची संधी मिळत असे, तेथील कम्युनिस्ट जीवनप्रणालीचा, तेथील तथाकथित प्रगतीचा वारेमाप प्रचार केला जाई. त्याकाळात कम्युनिस्ट विचारसरणींचा प्रचार करणारी पुस्तके, ग्रंथ विविध भाषांत अगदी नाममात्र किंमतीत वा फुकटात मिळत असे. त्यामुळेच मॅक्झिम गॉर्की यांच्या  'द मदर' या कादंबरीचे मराठी भाषांतर असलेले  'आई'  हे हार्डबाऊंड छापलेले पुस्तक, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वगैरे पुस्तके घरोघरी असायचीच. 'सोव्हिएत लँड' या शीर्षकाचे गुळगुळीत कागदांवर छापलेले एक  रंगीत नियतकालिक जागोजागी दिसायचे.    
तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आघाडीवर असलेल्या कम्युनिस्ट देशांत प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याबाबतीत  बोंबच होती. जाहिरातबाजीमध्ये किंवा प्रोपोगांडामध्ये मात्र ही सर्व राष्ट्रे आघाडीवर होती. बल्गेरियात आम्ही दौऱ्यावर असताना विविध शहरात गेल्यावर तेथील अधिकारी, महापौर अशा  आर्थिक,  सामाजिक प्रगतीची  पोपटपंची सुरू करत, त्यावेळी बल्गेरियाबाहेरच्या जगाचा अनुभव घेतलेला आमच्या एक अनुवादकाकडे माझे लक्ष असायचे. 'या जाहिरातबाजीत  काहीच तथ्य नाही'  असे तो आम्हाला नेहेमी खासगीत सांगत असे. मात्र रशियन आणि बल्गेरियन भाषा फारशी येत नसल्याने  स्थानिक  लोकांशी थेट संवाद साधून सत्य परिस्थिती जाणून घेणे शक्य नसायचे. मात्र एकदा बुर्गास शहरात असताना काही गोरीगोमटी आणि  चेहेऱ्यावर लालभडक टिपके असलेली  मुले-मुली आमच्या शर्टाला खेचून भीक मागू लागली तेव्हा आम्ही चकितच झालो होतो.  त्याबद्दल स्पष्टीकरण पुरवताना त्या अनुवादकाची भंबेरी उडाली होती. ती मुले जिप्सी कुटुंबांतील होती आणि त्यांचे  पुनर्वसन करणे कम्युनिस्ट बल्गेरियन सरकारला शक्य झाले नव्हते हे त्यावेळी आमच्या लक्षात आले. 
रशियात आणि बल्गेरियाचा आम्ही दौरा करत असताना याकाळात म्हणजे  १९८०च्या दशकाअखेरीस कम्युनिझमचा अस्तकाळ जवळ येतो आहे, या कम्युनिस्ट जगात मोठी सुनामी येणार आहे याची अंधुकशीही कल्पना कुणाला आली नव्हती. या दोनतीन वर्षांच्या काळात कम्युनिस्ट जगतात अनेक घटना वेगाने घडत गेल्या आणि कम्युनिस्ट राजवटींचा हा  डोलारा डॉमिनो इफेक्ट प्रमाणे वेगाने खाली कोसळला. 
जगभर पसरलेल्या कम्युनिझमच्या या पोलादी पडद्यास छिद्रे पडण्यास सुरुवात झाली ती पोलंड येथे कामगार नेते लेक वालेसा यांनी केलेल्या चळवळीमुळे. कम्युनिस्ट राजवट असलेल्या पोलंडमधील क्रॅकोव्हचे कार्डिनल  कॅरोल जोसेफ वोजत्याल यांची रोममध्ये पोप जॉन पॉल दुसरे म्हणून निवड झाली आणि पोलंडमधील लोकशाही चळवळीने अधिक जोर घेतला. लेक वालेसा नंतर पोलंडचे राष्ट्राध्यक्ष बनले. त्यानंतर बर्लिनच्या भिंतीचा पाडाव झाला आणि  इतरही  अनेक कम्युनिस्ट राष्ट्रांत उठाव होऊन तेथेही लोकशाहीप्रधान राजकीय व्यवस्था प्रस्थापित झाल्या. रशियात मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी उदारमतवादी धोरण राबवल्यानंतर त्यांना भले नोबेल पुरस्काराने सन्मानित केले गेले. मात्र त्यांच्या उदारीकरणाच्या धोरणाचा एका परिपाक म्हणून युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लीकचे विभाजन झाले. हुकूमशाहीच्या बळावर एकसंघ राहिलेल्या सोव्हिएत युनियनमधून पंधरा स्वतंत्र राष्ट्रे  उदयास आली.  कम्युनिझमचा पोलादी पडदा कोसळल्यानंतर या देशांतील आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विषमतेच्या  वास्तव्याचे पहिल्यांदाच संपूर्ण जगाला दर्शन घडले. 
पूर्वाश्रमीच्या युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट  रिपब्लिकपैकी केवळ रशियाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली राजकीय ताकद प्रस्थापित केली आहे. कम्युनिस्ट राजवट लोप झाली असली तरी आता तेथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची एकाधिकारशाही आहे. रशियाच्या अध्यक्षपदी 'निवडून'  येण्याची पुतीन यांची ही चौथी वेळ आहे.     
वर्ल्ड फुटबॉल कप किंवा फिफाच्या निमित्ताने रशिया पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. एकेकाळी साम्यवादी देशांचा पुढारी असलेल्या रशियातच आज कम्युनिझम नाहीसा झाला आहे. सात  दशकांच्या कम्युनिस्ट राजवटीत रशियातून धर्माचे पूर्ण  उच्चाटन करणे शक्य झाले नाही. आज अनेक रशियन नागरिक चर्चमधील धार्मिक विधीस उपस्थित राहू लागले आहेत. सर्व जगभर नाताळ  २५ डिसेंबरला साजरा आहोत असला तरी  रशियात  ऑर्थोडॉक्स चर्च सात जानेवारीस हा सण  साजरा करते. पूर्वी केजीबी या गुप्तचर संघटनेचे अधिकारी असलेले  राष्ट्राध्यक्ष पुतीन या ख्रिसमसच्या विधीला चर्चमध्ये आवर्जून हजर असतात. कम्युनिस्ट नेत्यांची पुतळे चौकाचौकांतून हटविण्यात आली असली तरी  जगातील पहिल्यावहिल्या कम्युनिस्ट क्रांतीचा नेता असलेल्या  लेनिनचे शरीर रेड स्केअरमध्ये आजही जतन करून ठेवण्यात आले आहे. एके काळी हे स्मारक जगभरातील साम्यवादी जगासाठी एक तीर्थक्षेत्र होते. आजकाल  लेनिनला वंदन करण्यासाठी तेथे पूर्वीसारखी लोकांची लांबलचक रांग नसते. या स्मारकापाशी रोडावलेली ही गर्दी  गेल्या शतकभराच्या कालावधीत रशियात आणि कम्युनिस्ट जगतात  झालेल्या स्थित्यंतराचे एक प्रतीकच  आहे. 

Friday, June 22, 2018

फरारी चार्ल्स सोबराजला गोव्यात पकडले तेव्हा. Charles Sobhraj arrested in Goa


फरारी चार्ल्स सोबराजला गोव्यात पकडले तेव्हा...
बुधवार, २० जून, २०१८कामिल पारखे
बातमीदाराच्या करिअरमध्ये स्कूप क्वचितच असतात. कधीतरी अचानक त्याला स्कूपचे घबाड मिळते आणि त्याची अविस्मरणीय बातमी होते. अशाच एका अवचित गवसलेल्या स्कूपविषयी.
गोव्याच्या राजधानीच्या पणजी शहरात संध्याकाळी सातनंतर शुकशुकाटच असतो. १९८६ सालच्या  सहा एप्रिलच्या त्या रविवारच्या संध्याकाळी मी द नवहिंद टाइम्सच्या ऑफिसात क्राइम रिपोर्टरची  ड्युटी सांभाळत होतो. तेव्हा आमच्या या  इंग्रजी पेपरची आतल्या पानांसाठी संध्याकाळी सात ही डेडलाईन असायची. त्यानंतर फारच मोठी बातमी असली तर थेट संपादकांच्या परवानगीनेच ती पहिल्या पानावर जाई.  या वृत्तपत्राचे पणजी मार्केटजवळ असलेले कार्यालय आणि आझाद मैदानापाशी असलेल्या गोवा पोलिसांचे मुख्यालय हे अंतर केवळ तीनशे मीटर. तेथील पोलीस स्टेशनवर ड्युटीवरच्या फौजदाराशी गप्पा मारून मी आलो होतो. 'सोगळे शांत हा मरे आज' असे नेहेमीप्रमाणे त्यांनी मला सांगितले होते. पण तरीही क्राईम रिपोर्टरला सतर्क राहावेच लागते म्हणून मी रुटीन राऊंडस घेण्याच्या तयारीत होतो. रविवार असल्याने उशिरा संध्याकाळी मी एकटाच ज्युनियर रिपोर्टर ऑफिसात होतो. 
साधारणतः रात्री दहाच्या दरम्यान न्यूज रूममधील फोन खणखणला. 'पर्वरी येथे काही गडबड झाली आहे काय? तिथे का गर्दी जमली आहे?"  एक वाचक विचारत होता.  'हो का? मी चौकशी करतो' असे सांगून मी फोन खाली ठेवला आणि संबधित पोलीस स्टेशनकडे चौकशी केली. कुठे काही तणाव, गडबड नाही, असे मला सांगण्यात आले.  दहा-पंधरा मिनिटानंतर दुसऱ्या एका व्यक्तीचा फोन आला. ''म्हापसा-पणजी रस्त्यावर काय चालले आहे, कुणा मोठया व्यक्तीला पकडले आहे काय?  कसलो बोबाळ असा तिंगा?'' या दुसऱ्या फोननंतर  मात्र मी दोन-तीन पोलीस स्टेशनना फोन लावले, वरच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो. सर्वांनी काही मोठी घटना झाली आहे याचा इन्कार केला. त्यानंतर वाचकांकडून असे फोन येत राहिले आणि मी पुन्हापुन्हा अधिकाधिक सीनियर पोलीस अधिकाऱ्यांशी याविषयी खातरजमा करत राहिलो.
त्यावेळी त्या छोटयाशा न्यूजरूममध्ये स्पोर्टस रिपोर्टर जोव्हितो लोपीस आपल्या बातम्या  टाइपरायटरवर टाईप करत होता. आपल्या खास शैलीत केवळ एका तर्जनीने मात्र वेगात बातम्या टाईप करत असताना फोनवरील माझ्या संभाषणाकडे त्याचे लक्ष होते. रात्री उशिरा परत एका वाचकाचा फोन आला आणि मी थेट गोव्याच्या टॉप कॉपला म्हणजे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिसा यांना पुन्हा एकदा फोन लावला. पर्वरी येथे कोणी बडा मासा गळाला लागला आहे काय अशी विचारणा करणाऱ्या लोकांचे पुन्हापुन्हा फोन येत आहेत, आपण यासंदर्भात प्लीज पुन्हा चौकशी करताल का असे मी त्यांना विचारले.  "कामिल, यू सी, इफ समथिंग लाईक दॅट हॅपन्स, आय विल बी द फर्स्ट पर्सन टू नो दॅट! यो नो इट!" आयजीपींचे ते उत्तर खरेच होते पण ते स्वतः ती बातमी माध्यमांपासून दडपून ठेवत असले तर?
फोनवरचे माझे हे संभाषण जोव्हितोने ऐकले आणि तो आपल्या खुर्चीवरून उठला, आपली झालेली बातमी कंपोझिगला पाठवत तो म्हणाला, "कामिलो, लेटस नॉट वेस्ट टाइम...कम विल रश टू द स्पॉट."  जोव्हितो माझ्यापेक्षा अनेक वर्षांनी सीनियर होता. त्या एकमजली कौलारू ऑफिसाच्या लाकडी फळ्यांच्या जिन्याने धावतच खाली आल्यानंतर जोव्हितोच्या स्कुटरने आम्ही पर्वरीच्या दिशेने निघालो.
पर्वरीला 'ओ कोकेरो'  या हॉटेलपाशी आल्यानंतर तेथे सामसूम दिसली. मात्र तेथे आलेले साध्या वेशातील पोलीस काही वेळापूर्वीच म्हापशाला गेले असे  कळले आणि आम्ही म्हापशाकडे कूच केले. तिथे चौकशी करण्याची गरज भासली नाही कारण त्या शहरात प्रवेश करताच सिटी बस स्टॅण्डसमोर असलेल्या म्हापसा रेसिडेन्सी या गोवा पर्यटक विभागाच्या हॉटेलसमोर मोठी गर्दी जमलेली दिसत होती.
हॉटेलमधून काही माणसे बॅगा घेऊन बाहेर असलेल्या टॅक्सीच्या डिकींमध्ये भरत होते. साध्या वेशात असले तरी ते सर्व जण पोलीस होते हे कळत होते. त्यांचे हॉटेलमधून चेक-आऊट चालले होते आणि काय घडले आणि घडते आहे याची मी आणि जोव्हितो त्या गडबडीत चौकशी करत  होतो. त्यांच्यापैकी कुणीही तोंड उघडायला वा प्रेस रिपोर्टेरशी बोलायच्या मनस्थितीत नव्हता. तरीही आम्ही दोघांनीं त्यापैकी काहींना बोलते केले आणि जे ऐकले ते धक्कादायकच होते. 
समोर टॅक्सींमधून निघण्याच्या तयारीत असलेले हे लोक मुंबई पोलिसांची टीम होती आणि काही तासांपूर्वीच त्यांनी दिल्लीतील तिहार तुरुंगातून पळालेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचा खतरनाक गुन्हेगार चार्ल्स सोबराजला पर्वरीच्या हॉटेलातून पकडले होते. 
महिलांवर बलात्कार करून नंतर त्यांचे खून केल्याचा आरोपावरून चार्ल्स सोबराज या फ्रेंच नागरिकाला भारतात सजा होऊन त्याला तिहार तुरूंगात ठेवण्यात आले होते. अशाच प्रकारचे अनेक गुन्हे त्याने इतर देशांतही केल्याने त्या देशांतही त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. विशेष म्हणजे तिहार येथील त्याची सजा पूर्ण होण्यास थोडासाच कालावधी बाकी असतानाच तेथून चार्ल्सने पलायन  केले होते. त्याकाळात म्हणजे १९८०च्य दशकातही तिहार एक अभेद्य तुरुंग समजला जाई. इतर देशांनाही हवा असणारा हा कुख्यात गुन्हेगार तिहार तुरुंगातून पळाल्याने त्यावेळी मोठी खळबळ माजली होती. देशातील अनेक राज्यांतील पोलिसांनीं त्याला पकडण्यासाठी जोरदार मोहीम राबविली होती. मात्र त्यांना यश येत नव्हते. त्या रात्री पर्वरी येथील 'ओ  कोकेरो' या एका बंगलेवजा पण  नामांकित हॉटेलात मधुकर झेंडे या पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील मुंबई पोलिसांच्या तुकडीने चार्ल्सच्या अक्षरश:  मुसक्या बांधण्यात  यश मिळवले होते. अनेक दिवस शोधमोहीम राबवून मुंबई पोलिसांनीं चार्ल्सचा मागे काढला होता. साध्या वेशात आपल्या सहकाऱ्यांसह त्या हॉटेलात बसलेल्या पोलीस इन्स्पेक्टर झेंडे यांनीं शिताफीने पकडले होते. त्यावेळी चार्ल्सबरोबर एका पिस्तूलही होते. दोरखंडाने चार्ल्सची गठडी आवळून त्याला टॅक्सीत टाकून पोलिसांनी त्याला ते मुक्कामी असलेल्या म्हापशातील हॉटेलात आले होते. तेथून आपले सामान घेऊन आता ते मुंबईला निघाले होते. 
चार्ल्स सोबराजची गठडी आवळून त्याला रात्रीच मुंबईला नेण्याची त्यांची धावपळ मी समजू शकत होते. कुणाही व्यक्तीला अटक केल्यानंतर चोवीस तासांच्या  कालावधीत त्यास न्यायालयासमोर हजर करावे लागते. चार्ल्सला मुंबईच्या तुरुंगात ठेवण्यासाठी आणि तिथल्याच न्यायालयात हजर करण्यासाठी ते लगेचच गोव्यातून निघत होते. मुंबई पोलिसांनी चार्ल्स सोबराजच्या अटकेबाबत गोवा पोलिसांना पूर्णतः अंधारात ठेवले होते आणि त्यांना याबाबतचे कुठलेही श्रेय न देण्यासाठी मुंबई गाठण्याची त्यांची घाई चालू होती.       
रात्रीचे अकरा वाजले होते. मुंबई पोलिसांनी भाड्याने घेतलेल्या त्या पाचसहा टॅक्सींनी म्हापसा सोडून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला तसे जोव्हितो आणि मीसुद्धा विरुद्ध दिशेने  म्हणजे पणजीकडे निघालो. ही बातमी घेण्यासाठी आमच्या संपादकांनी म्हणजे बिक्रम व्होरा यांनी 'स्टॉप द प्रेस' आदेश दिला होता, तरी लवकरात लवकर ही स्टोरी फाईल करणे जरुरीचे होते. जोव्हितोने वेगाने टाईप केलेली ती स्टोरी दुसऱ्या दिवशी 'जोव्हितो लोपीस अँड कामिल पारखे' या जोड बायलाईनने नवहिंद टाइम्सच्या पहिल्या पानावर आठ कॉलममध्ये प्रसिद्ध झाली. आमच्या वृत्तपत्राबरोबर एका प्रतिस्पर्धी इंग्रजी वृत्तपत्रानेही ती बातमी विस्तृत स्वरूपात छापली होती. ती बातमी आम्हालाही मिळाल्याने संपादक व्होरा, वृत्तसंपादक एम एम मुदलीयार  हे दोघेही जोव्हितो आणि माझ्यावर खूष होते. माझ्या पत्रकारितेच्या कारकिर्दीतील ती एक मोठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची बातमीही ठरली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईत पोहोचल्यानंतर मुंबई पोलिसांनी चार्ल्स सोबराजच्य अटकेची बातमी जाहीर केली.  त्यानंतर देशातील सर्व राष्ट्रीय आणि प्रांतिक पातळीवरील सर्व प्रमुख वृत्तपत्रांत ती  बातमी  ठळकपणे प्रसिद्ध झाली. 
बातमीदाराच्या कारकिर्दीत स्कुप किंवा एक्स्ल्युसिव्ह बातम्या फार क्वचितच असतात. हे सर्वच स्कुप अगदी ठरवून, नियोजन करून मिळत नसतात. कधीतरी अचानक बातमीदाराला स्कुपचे घबाड मिळते आणि त्याच्या/तिच्या करियरमधील एका खूपच स्मरणीय बातमी होते. यात कधी नशिबाचाही वाटा असतोच.  दरदिवशी प्रत्येक रिपोर्टरला आपापल्या ठरलेल्या बीट किंवा क्षेत्रातील बातम्यांचा रतीब घालावाच  लागतो, त्यापैकी काही एक्स्ल्युसिव्ह असणे साहजिकच असते. पत्रकारितेत अनेक वर्षे घालविलेल्या पत्रकारांच्या बॉसला म्हणजे संपादकांनाही याची कल्पना असते. त्यामुळे एखादी अगदी रुटीन पण महत्त्वाची बातमी चुकली तर त्याचा फारसा बाऊ केला जात नाही. मात्र समाजावर मोठी इम्पॅक्ट असणारी बातमी चुकली तर संबंधित बातमीदारासह संपादकालाही त्याची किंमत चुकवावी लागते. चार्ल्स सोबराजला पकडल्याची बातमी त्या रात्री आम्हाला मिळाली नसती तर दुसऱ्या दिवशी आमच्या ऑफिसात काय झाले असते याची कल्पनाही  करता येत नाही. 
तिहार येथील सजेचा कालावधी लवकरच संपत असताना चार्ल्सने तेथून पलायन का केले होते? असे म्हणतात की थायलंड येथेही चार्ल्सविरुद्ध खुनाचा एक  खटला दाखल झाला होता. चार्ल्सची शिक्षा संपल्यानंतर भारताने त्याला थायलंडच्या हवाली केले असते तर त्याला त्या देशात मृत्युदंडाची शिक्षा झाली असती. त्यामुळे तिहार तुरुंगातून पळून गेल्यानंतर भारताबाहेर पलायन करण्याचा चार्ल्सचा इरादा होता.  'ओ कोकेरो' या हॉटेलात त्याकाळी गोव्यातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय टेलिफोन सुविधा असल्याने चार्ल्स तेथे नक्की येईल असा मुंबई पोलिसांचा होरा होता आणि तो खराच  ठरला.
भारतातील तुरूंगातून १९९७ साली सुटल्यानंतर चार्ल्स पॅरिसला स्थायिक झाला होता.  देखणे व्यक्तिमत्व, अत्यंत बुद्धिमान असलेला आणि सुंदर तरुणींना भुरळ लावण्याची कसब लाभलेल्या या 'सेलेब्रिटी क्रिमिनल' चार्ल्सने आपले हे गुण  कायम वाईट कर्मे करण्यासाठी वापरले. अनेक तरुणींचे खून केल्याचे आरोप त्याच्यावर होते. त्यामुळे त्याने आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे  या दुष्कर्मांसाठी सजा भोगण्यासाठी खर्च केली. काही वर्षांपूर्वी तो नेपाळला पर्यटक म्हणून आला असता कुणी तरी त्याला ओळखले आणि  पोलिसांना कळवले.  नेपाळ येथील एका जुन्या खुनासंदर्भात चार्ल्सला पुन्हा अटक झाली. वयाची ७४ वर्षे पूर्ण केलेला चार्ल्स आजही नेपाळ येथे जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे.


Camil Parkhe Thanks Mukesh sir
Manage


Reply1d
Mrinmayee Ranade Not only that you were lucky, you followed it up well. That's what makes you a great reporter.
Manage


Reply1d
Mukesh Machkar आम्हीच थँक यू कामिल सर.

Manage


ReplySee translation1d
Shekhar Kanetkar हीच बातमी पुणे तरुण भारताने पण रात्री उशिरा दिली होती. मोहन वैद्य यांनी ती पणजी हून दिली होती. पुण्यातील इतर वृत्तपत्रात ती नव्हती. मी तेव्हा 
चीफ सब होतो. माझाही 
थोडाफार हातभार बातमीदार लागला होता......

Manage


Reply1d
Camil Parkhe Great..
yes... Mohan was my journalist colleague in Goa that time...

Manage


Reply1d
Arvind Tulalwar ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे ह्यांच्या आठवणींना उजळा 👍 . घटनेवर आधारित मराठी नाटक आणि हिंदी सिनेमा आहे. सत्तरीच्या उत्तरार्धात वृत्तपत्रात वाचनात आलेले क्रूर गुन्हे म्हणजे पुण्यातील जोशी अभ्यंकर हत्याकांड आणि बिल्ला रंगा शी निगडित गीता आणि संजय अपहरण प्रकरण. त्या हि आठवणींना उजळा .
Manage


Reply1d
Sumedh Bhatawadekar माधव गडकरींचे Hallow Charles शाळेत असताना वाचल्याचं आठवतय.
Manage


Reply22h
Prabhakar Bhatlekar शोभराजच्या गोव्याला झालेल्या अटकेसंबंधात वाचलेले--- 
इन्स्पेक्टर मधुकर झेंडे आणि सहकारी यांना शोभराजच्या गोवा येथे असण्याचे धागेदोरे मिळाले. अतिशय गुप्तपणे 
सारे गोव्याला पोचले. झेंडे यांनी यापूर्वी एकदा शोभराजला अटक केली होती . एका हॉटेलात शोभराज रो
ज येत आहे अशी 
माहिती झेंडे यांना मिळाली होती . त्या दिवशी त्या हॉटेलात एक लग्नसमारंभ होता. बदलेल्या वेशात आपल्या टीमसह झेंडे 
दबा धरून बसले होते. शोभराज जेव्हा आला तेव्हा झेंडे यांच्या लक्षत आले कि त्याने वेगळी केशरचना केली आहे. लेन्स लावून 
डोळे निळे केले आहेत. शोभराजवर त्यांनी झडप घातले आणि ताबडतोब त्याला टॅक्सित घालून सर्वजण भरधाव मुंबईकडे 
निघाले. गोवा पोलिसांना हे कळून फायद्याचे नव्हते. महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करताच दिल्लीत असलेल्या मुख्यमंत्री 
शंकरराव चव्हाण यांना सारे कळवण्यात आले.दिल्लीत देशाच्या सर्व मुख्यमंत्रयांची बैठक होती. शंकरराव गोव्याचे 
मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्यासमवेत उभे होते. वार्ताहार चव्हाणांना शोभराजविषयी प्रश्न विचारत होते. बातमी 
कळल्यानंतर भावनांच्या चेहेरीवरील रेषही हलली नाही. ते वार्ताहरांना एवढेच म्हणाले 'लवकरच चांगली बातमी समजेल... 
बिचार्या राण्यांना काय घडले याचा पत्ताच नव्हता...

Manage


Reply10h