एके काळी ‘कॅम्प’ या भागाबद्दल सर्वांना बरंच आकर्षण होतं. तिथले रस्ते, तिथली दुकान, तिथली राखण्यापिण्याची चंगल वगैरेंमुळे पुणेकर कॅम्पात खेचले जायचे. हा भाग ख्रिश्चनबहुल. त्यामुळे त्याबद्दलही एक वेगळंच आकर्षण होतं. आता कॅम्पचं स्वरूप बदललं आहे आणि हीच ख्रिश्चनधर्मीय मंडळीही तिथून बाहेर पडली आहेत. आजमितीला कॅम्पशिवाय पुण्याच्या विविध भागांमध्ये ख्रिश्चन समाजवास्तव्य करत आहे. एका अर्थाने पुण्याच्या सामाजिक जीवनात हा समाज मिसळून गेला आहे.
ख्रिस्ती
संस्कृतीचा पुण्याशी संबंध आला अठराव्या शतकात. पेशव्यांच्या राजवटीत ख्रिस्ती
मंडळींचं आणि पुण्याचं नातं सैन्यातील व्यवहारांच्या निमित्ताने जुळू लागलं होतं.
मुळात गोमंतकीय पोर्तुगीज नागरिक पशेव्यांच्या आणि ख्रिस्ती समाजाच्या संपर्कातील
सेतू ठरले. त्यानंतर काही ख्रिस्ती लोक पेशव्यांच्या सैन्यात अधिकारपदावर किंवा
तोफांच्या कारखान्यातले कर्मचारी म्हणून किंवा व्यापारी म्हणून सामील होत गेले.
पुणे कॅम्प ही तेव्हाची लष्कराची छावणी. त्यामुळे पूर्वी मराठ्यांच्या लष्करातील
सहभागाच्या निमित्ताने शहरात आलेले ख्रिश्चन अधिकारी व सैनिक या परिसरात स्थायिक
झाले. याशिवाय खडकी, वानवडी या बाजूलाही ख्रिस्ती सैनिक व अधिकारी
वसू लागले.
मराठी फौजेतील
युरोपीय वंशाच्या किंवा गोमंतकीय ख्रिस्ती लष्करी अधिकारी व सैनिकांसाठी पुणे
कॅम्पात 1792 साली एक चर्च बांधण्यात आलं. अनेकांना माहीत नसेल, परंतु सवाई माधवराव पेशव्यांनी देणगी म्हणून दिलेल्या जागेवर हे सिटी चर्च
(इमॅक्युलेट कन्फेशन चर्च) उभं राहिलं. क्वार्टर गेट परिसरातलं हे चर्च पुण्यातील
ख्रिस्तीधर्मीयांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी सर्वात जुनी खूण. या चर्चचं
मूळ बांधकाम माती आणि चुन्याच्या साहाय्याने केलेलं होतं. 1852 साली जुनं बांधकाम
पाडून चर्चचं सध्याचं रूप घडवण्यात आलं. पुणे आणि ख्रिस्तीधर्मीयांचं नातेसंबंध
घडण्याची आखणी एक खूण म्हणजे कॅम्पातच, सोलापूर रोडवर असलेलं
सेंट मेरीज चर्च. हे चर्च 1823 साली बांधण्यात आलं. नंतरच्या काळात मराठा फौजेतील
ख्रिस्ती अधिकारी व सैनिकांसाठी लष्करी तळांच्या परिसरात अनेक चर्च बांधली गेली.
अव्वल बि‘टिश
आमदनीत पुण्यातील ख्रिश्चन समाज मु‘यत्वे फौजेतील युरोपीय या गोमंतकीय अधिकारी व
सैनिक आणि त्यांची कुटुंबं असा मर्यादित होता. त्यामुळेच पुण्यातील सर्वांत जुनी
कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट चर्च केवळ पुणे कम्प, खडकी आणि वानवडी या
लष्करी तळांत दिसतात. पुणे स्वातंत्र्यपूर्व काळात लष्करातील किंवा रेल्वे
खात्यातील नोकरीच्या निमित्ताने अनेक दाक्षिणात्य
ख्रिस्ती कुटुंबं पुणे कँपात आणि खडकीत स्थायिक झाली. त्यातून हा भाग
ख्रिश्चनबहुल बनत गेला. गेल्या तीन-चार दशकांत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत जी
अनेक ख्रिस्ती चर्च उभी राहिलेली दिसतात ती ख्रिश्चनांच्या सं‘येत या परिसरात
मोठी वाढ झाल्याचं दर्शवतात.
भारताच्या अनेक
भागांत ख्रिस्ती समाज आढळतो आणि त्यांच्या चालीरीती त्या त्या भागांतील स्थानिक
संस्कृतीनुसार असतात. पुण्यात देशातील सर्वच भागांतील ख्रिस्ती स्थलांतरित झाले
असल्याने धर्माने एकच असलेल्या या समाजाच्या विविध घटकांत खूपच सांस्कृतिक विविधता
आढळते. पुण्यातील ख्रिस्ती समाज हा बहुभाषिक, विविध पंथीय, भिन्न भिन्न संस्कृतींचा आणि आपल्या मूळ प्रांतांच्या संस्कृतीनुसार वेशभूषा
करणारा आहे, त्याचप्रमाणे तो अठरापगड जातींचाही आहे.
पुणे आणि
पिंपरी-चिंचवडमधील ख्रिस्ती समाजाच्या कॅथॉलिक आणि प्रॉस्टेस्टं या दोन्ही पंथांचे
लोक आहेत. कॅथॉलिकांची सं‘या तुलनेने अधिक आहे. कॅथॉलिक चर्चतर्फे चालवल्या जाणार्या
शाळा, प्रशिक्षण केंद्र, दवाखाने आणि इतर
संस्थांची सं‘याही अधिक आहे. या दोन्ही पंथांतील लोक मराठी भाषक, कोकणी भाषक गोवन, कोकणी भाषक मंगलोरियन, तमिळ, मल्याळी आणि तेलुगू वगैरे भाषिक गटांत
विभागलेले आहेत.
विशेष म्हणजे
खुद्द मराठी भाषक ख्रिस्ती समाजसुद्धा महाराष्ट्रातील चार प्रदेशांतून इथे
स्थलांतरित झाल्यामुळे त्यांच्या संस्कृती किंवा बोलीभाषा एकमेकांपासून भिन्न
आहेत. ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातून स्थलांतरित झालेला, मूळचा गोमंतकीय असलेला बार्देकर समाज; पश्चिम महाराष्ट्रातील
अहबदनगर-कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांतून आलेला आणि मराठवाड्यातून स्थलांतरित
झालेला ख्रिस्ती समाज अशा चार गटांत मराठी भाषिक ख्रिस्ती समाज विभागलेला आहे.
गोवा मंगळूर, बार्देस आणि वसई इथून स्थलांतरित झालेल्या
ख्रिस्ती समाजात डिसूझा, गोन्साल्विस, फर्नांडिस अशी पाश्चिमात्य
धर्तीची आडनावं आढळतात, याचं कारण म्हणजे या समाजघटकांना लाभलेला
पोर्तुगीज राज्यकर्त्यांचा वारसा.
पुण्यातील काही
नामांकित व्यक्तींमधील पुण्याचे निवृत्त बिशप वॅलेरीन डिसूझा हे मूळचे गोमंतकीय
आहेत, विद्यमान बिशप थॉमस डाबरे हे वसईचे आहेत, नाशिकचे निवृत्त बिशप थॉमस भालेराव हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत, तर पुणेकर असलेले आणि सध्याचे नाशिकचे बिशप असलेले लुईस डॅनियन हे मूळचे तमिळ
आहेत. पुण्यातील ख्रिस्ती समाजातील आडनावांवरूनसुद्धा जाणकार मंडळींना त्यांची
प्रादेशिक, भाषिक आणि जातीय पार्श्वभूमी समजते.
भारतात ख्रिस्ती
समाज हिंदू धर्मातील विविध जाती-जमातींतून आलेला आहे. गोव्यात आणि वसईत धर्मांतर
होऊन ती-चार शतकांचा काळ उलटला,
तरी तेथील ख्रिस्ती
समाजात त्यांच्या मूळ हिंदू उच्च-नीच समजल्या जाणार्या जाती आजही ठाम पाय रोवून
आहेत. विशेषतः लग्नसंबंधात या जातींची उतरंड आणि प्रदेश विशिष्ट पार्श्वभूमी काम
करताना दिसते. पुण्यातील गोवन तरुणाचं लग्न पुण्यातील गोवन तरुणीशी किंवा गोव्यात
स्थायिक असलेल्या तरुणीशी होतं,
तसंच पुणेस्थित मूळचे
अमदनगर, औरंगाबाद किंवा कोल्हापूर जिल्ह्यांतील आणि त्याचप्रमाणे
मूळ वसईकर, बार्देस्कर किंवा तमिळ ख्रिस्ती तरुणांचे विवाह
जुळत असतात. प्रेमविवाहाचा अर्थात या प्रथेला अपवाद असतो.
मुंबईप्रमाणेच
पुणे शहरात कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट मिशनर्यांनी अनेक शाळा आणि संस्था उभारलेल्या
असल्या तरी या दोन्ही शहरांत मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालेली नाहीत. अशा प्रकारची
मोठ्या प्रमाणात धर्मांतरं झाली ती ठाणे जिल्ह्यात वसई येथे आणि उर्वरित
महाराष्ट्रात अमदनगर, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती वगैरे ठिकाणी. रेव्हरंड नारायण वामन
टिळक, त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक, रेव्हरंड निळकंठशास्त्री नहेम्या गोर्हे आणि पंडिता रमाबाई वगैरे उच्चवर्णीय
व्यक्तींचा अपवाद वगळता ही सर्व धर्मांतरं हिंदूंमधल्या अस्पश्य गणल्या जाणार्या
दलित समाजपुरती मर्यादित होती.
मराठी ख्रिस्ती
समाजपुरतं बोलायचं झाल्यासहा समाज इतर मराठी समाजापेक्ष्ज्ञा काही वगेळा आहे अशी
जाणीवही होणार नाही. कारण या मातीतच इतरांसारखी मराठी ख्रिस्ती व्यक्ती वाढली आहे.
त्यांचे संस्कार, चालीरीती, भाषा आणि संस्कृती या
भूमीतीलच आहे. ख्रिस्त धर्म स्वीकारला म्हणून येथील भाषा, संस्कृती आणि चालीरीतींचा त्याग करण्याची या समाजाला गरज भासलेली नाही. ज्या
युरोपीय मिशनरींनी त्यांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली त्यांनादेखील येथील
संस्कृती ख्रिस्ती धर्माच्या तत्त्वांशी विसंगत आहे असं वाटलं नाही. त्यामुळे
हिंदू धर्मातील चांगल्या परंपरा आणि रीती कायम ठेवून नवधर्मांतरित ख्रिस्ती
लोकांनी आपली जीवनशैली कायम ठेवली. गोव्यात आणि वसईत मात्र पोर्तुगीजांनी स्थानिक
मराठी-कोकणी भाषांची गळचेपी केली. महाराष्ट्राच्या इतर भागांत असा प्रकार सुदैवाने
झाला नाही. त्यामुळे ख्रिस्ती झाल्यानंतरही नारायण वामन टिळक, सत्यवान नामदेव सूर्यवंशी, पंडिता रमाबाई किंवा लक्ष्मीबाई टिळक ही नावं
ख्रिस्ती धर्मतत्त्वांशी विसंगत आहेत असं कुणालाही वाटलं नाही. पश्चिम महाराष्ट्र
आणि मराठवाड्यातून पुण्यात आलेल्या ख्रिस्ती समाजातही गायवाकड, सोनवणे, कांबळे, भालेराव, तांबे अशी खास मराठमोळी आडनावं आहेेत.
असाच काहीसा
प्रकार मराठी ख्रि‘स्ती समाजाच्या वेशभूषेबाबत आणि काही स्थानिक (हिंदू) सणांबाबत
घडला आहे. आपल्या धर्माच्या तत्त्वांशी कुठलीही तडजोड न करता पुण्यातील मराठी
ख्रिस्ती समाजाने या परंपरा चालू ठेवल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कुठल्याही
कॅथॉलिक चर्चमध्ये मराठी उपासनाविधीत सहभागी होणार्या जेष्ठ महिला नऊवारी किंवा
गोल साडी, कुंकू आणि मंगळसूत्र आणि डोक्यावर पूर्ण पदर
घेणार्या आहेत, असं दिसून येईल. हिंदू समाजात कुंकू, मंगळसूत्र ही सौभाग्यलेणी समजली जातात. कॅथॉलिक धर्मपीठालाही या समजुती
ख्रिस्ती धर्मविरोधी आहेत असं वाटत नाही. त्यामुळेच मराठी ख्रि‘स्ती विवाह
चर्चमध्ये होताना लग्नाच्या आणाभाका घेतल्यानंतर धर्मगुरू मंगळसूत्र, अंगठी, जोडवी आशीर्वादित करतो आणि त्यानंतर नवरदेव
वधूच्या गळ्यात हे मंगळसूत्र विधिपूर्वक घालतो. काही प्रॉटेस्टंट पंथीयांनी मात्र
कुंकू आणि मंगळसूत्र ही सौभाग्यलेणी ख्रिस्ती धर्मतत्त्वांविरुद्ध आहेत, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्रॉटेस्टंट पंथातील बहुतेक महिला कुंकू लावत
नाहीत.
पिंपरी-चिंचवड
परिसरात काळेवाडी, पिंपरी, कासारवाडी या परिसरात
मराठी ख्रिस्ती भाषकांची सं‘या लक्षणीय आहे. यापैकी सध्या ज्येष्ठ नागरिक असणार्या
या कुटुंबप्रमुखांची पार्श्वभूमी औद्योगिक कामगाराची आहे. यामागेही एक इतिहास
आहे. पुण्यात स्वारगेटजवळ शंकरशेट रोडवर सेंट जोसेफ टेक्निकल इन्स्टिट्यूट ही
एकेकाळी नावाजलेली संस्था आहे. येशूसंघीय (जेझुइट) या कॅथॉलिक पंथीय धर्मगुरूंनी
चालविलेल्या या संस्थेने पुण्यातील अनेक औद्योगिक कंपन्यांना कुशल कामगार पुरविले
आहेत. 1960 आणि 1970 च्या दशकांत येशूसंघीय धर्मगुरूुंच्या संपर्काने अहमदनगर आणि
अहमदनगर जिल्ह्यातील शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेली अनेक मुलं या प्रशिक्षण
संस्थेत दाखल झाली आणि त्यांचं प्रशिक्षण पूर्ण होताच टाटा मोटर्स, बजाज ऑटो, ग‘ीव्ह्ज वगैरे प्रमुख कंपन्यांत त्यांना नोकर्या
मिळाल्या. अशा प्रकारे अहमदनग आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एक पिढी त्या काळात
पुण्यात स्थिरावली. पिंपरी-चिंचवड या औद्योगिक नगरीत मराठी भाषक ख्रिस्ती
नागरिकांची मोठी सं‘या असल्याचं हे एक प्रमुख कारण. आज या कुटुंबांच्या दुसर्या-तिसर्या
पिढ्या कार्यरत झाल्या आहेत.
विशेष महत्त्वाची
बाब म्हणजे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांत गेली तीन-चार दशकं स्थिरावूनही मराठी
ख्रिस्ती भाषिक समाजाने आपल्या मूळ भूमीशी नातं कायम राखलं आहे. अहमदनगर-औरंगाबाद
जिल्ह्यांतील आपल्या मूळ गावी जुन्या पिढीतील व्यक्ती वर्षातून एकदा तरी भेट
देतातच. नव्या पिढीतील मंडळी लग्न वा इतर कार्यक‘मासाठी गावी जात असतात. पुण्यातील
वसईकर मंडळी या बार्देस्कर मंडळीसुद्धा आपल्या मूळ भूमीशी कायम संपर्क राखून
असतात. विशेषतः लग्नासाठी सोयरीक जुळवताना मूळ गावातील नातेवाईक मंडळींचं साहाय्या
घेतलं जातं.
मराठी भाषक
खिस्ती समाज कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट या पंथांत विभागला असून त्यांच्यात जसे
विवाहसंबंध होत नाहीत. तसंच कुठल्याही धार्मिक वा इतर कारणामुळे या दोन्ही
पंथांच्या लोकांना परस्परसंबंधदेखील होत नाहीत. मराठी साहित्य चळवळ मात्र यास
अपवाद म्हणावी लागेल. ‘मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलना’च्या निमित्ताने या दोन्ही
पंथांतील लोक एकत्र येतात. सन 1927 पासून ख्रिस्ती साहित्य संमेलनं भरत असून ती
परंपरा आजही सुरू आहे. पुण्यातील मराठी ख्रिस्ती साहित्य संघाची दर महिन्याच्या
शेवटच्या गुरुवारी वायएमसीएच्या हॉलमध्ये नियमितपणे बैठक होत असते.
पुण्यातील
कॅथॉलिक आणि प्रॉटेस्टंट चर्चमध्ये मराठी उपासनाविधी होतो तेव्हा तिथे रेव्हरंड
ना. वा. टिळक, कृष्णाची सांगळे वगैरे नामवंतकवींनी केलेल्या
रचना गायल्या जातात. मराठी ख्रिस्ती समाजाच्या या गायनप्रथेला शंभर-सव्वाशे
वर्षांची परंपरा आहे. ज्या चर्चमध्ये यूथ ग‘ुप या गायकवृंद असेल तिथे हार्मोनियम, तबला वगैरे वाद्यांच्या साथीने गीतं गायली जातात. नाताळच्या आधी आठवडाभर कॅरोल
सिंगर्स नाताळची गाणी गात ख्रिस्ती कुटुंबांच्या घरी भेटी देतात, तेव्हाही नामांकित कवींनी विशिष्ट रागांत रचलेली गायनं गायिली जातात. पुणे आणि
पिंपरी-चिंचवड येथील कॅथॉलिक चर्चमध्ये मराठी भाषकांसाठी खास वेगळी मिस्सा किंवा
उपासना केली जाते. धर्मगुरू आशीर्वाद देतात तेव्हा सर्व महिला डोक्यावर पूर्ण पदर
घेतात, त्याचप्रमाणे तामिळ किंवा मल्ल्याळी भाषकांसाठीही त्यांच्या
भाषांत प्रार्थना केल्या जातात. याशिवाय इंग‘जी भाषेत होणार्या प्रार्थनेसाठी
सर्वच भाषक नाताळला एकत्र जमतात.
विवाह
समारंभाच्या बाबतीतही मराठी ख्रिस्ती समाजाने सुपारी फोडणे, साखरपुडा, हळद लावणे वगैरे परंपरा कायम ठेवल्या आहेत.
यातही भारतीय आणि पाश्चिमात्य परंपरेची सांगड घातली जाते. युरोपियन पद्धतीनुसार
चर्चमध्ये लग्नात नववधूने सफेद गाऊन घालण्याची परंपरा आहे. आपल्याकडे मात्र
गाऊनऐवजी सफेद साडी नेसली जाते. मात्र, डोक्यावर पांढरा जाळीदार
व्हेल (पडदा) आणि हातात पांढरे हातमोजे असतात. लग्नविधीनंतर रिसेप्शनला मात्र
भारतीय परंपरेनुसार शालू हवाच. बिगरमराठी भाषक ख्रिस्ती समाजानेही अशाच प्रकारे
दोन्ही संस्कृतींची सांगड घातलेली दिसते.
स्वातंत्र्यपूर्व
काळत आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काही दशकांत गोव्यातील अनेक कॅथॉलिक कुटुंब
पुणे कँपात स्थायिक झाली. त्यामुळे तिथे आणि नजीकच्या परिसरात सिटी चचर्च, सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रल आणि सेंट झेवियर्स ही देवळं उभारण्यात आली. दोन-अडीच
दशकांपूर्वी गोव्यातील बार्देस तालुक्यातून अनेक ख्रिस्ती कुटुंबं नोकरी आणि
व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील घाटावरील प्रदेशात स्थलांतरित झाली. त्या
वेळी गोवा पोर्तुगीज अमलाखाली होता. इन्क्विझिशनच्या काळात नवधर्मांतरित ब‘ाह्मण
आणि इतर जातींतील ख्रिस्ती समाजावर पाश्वात्य संस्कृती स्वीकारण्यासाठी अत्याचार
झाल्यामुळे, प्लेगच्या साथीमुळे आणि इतर काही कारणांमुळे हे
स्थलांतर झालं, असं म्हणतात. मात्र या दोन-अडीच दशकांत या
बार्देस्कर समाजाने आपली गोमंतकीय संस्कृती आणि कोकणी भाषा जतन केली. धर्मगुरू
नसतानाही ख्रिस्ती धर्माचं आचरण चालू ठेवलं. हा एक मोठा सामाजिक चमत्कारच म्हटला
पाहिजे. गेल्या दोन-अडीच दशकांत घाटावरील हा बार्देस्कर समाज पुण्यात आणि चिंचवड
इथे स्थायिक झाला आहे.
पुण्यातील तमिळ
आणि मल्याळी ख्रिस्ती कुटुंबं पूर्वी कँपात छोट्याशा भाडोत्री घरात किंवा
स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असत. गेल्या तीन दशकांच्या काळात जमिनींच्या किमती
स्वमालकीची जागा विकून त्या बदल्यात मिळालेल्या रकमेत पुणे शहराबाहेर असलेल्या
वानवडी वगैरे परिसरांत जागा घेऊन घ्ज्ञरं बांधली किंवा नवे फ्लॅट्स खरेदी केले.
पुण्यातील सदाशिव, नारायण वगैरे पेठांतील वाडा संस्कृतीत राहणार्या
लोकांनी जागा विकून शहराबाहेर म्हणजे कोथरूड परिसरात जागात किंवा फ्लॅट्स विकत
घेऊन स्थलांतर केलं, अगदी तसाच हा प्रकार होता.
दरम्यान, याच काळात धर्मगुरू होऊ इच्छिणार्या उमेदवारांना प्रशिक्षण देणार्या ‘डी
नोबिली कॉलेज’ आणि ‘पेपर सेमिनरी’ यासार‘या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था नगर
रोडवर सुरू झाल्या. या संस्थांच्या अनुषंगाने अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील
अनेक कुटुंबं नोकरी वा शिक्षणाच्या निमित्ताने रामवाडी, येरवडा आणि वडगाव शेरी या परिसरात स्थायिक झाली. खिस्ती समाजाचं प्राबल्य
असलेल्या अनेक सहकारी गृहनिर्माण संस्था या परिसरात उभ्या राहिल्या आहेत. आज या
परिसरात होणार्या महानगरपालिकेच्या निवणुकीत मतपेटीचा कौल फिरवू शकेल इतकी या
समाजाच्या मतदाराची सं‘या आहे; या परिसरातील ख्रिस्ती समाजात मराठी भाषकांची
सं‘या अधिक आहे, तर वानवडी, फातिमानगर आणि पुणे कँप
परिसरात गोवन ख्रिस्ती कुटुंबांची सं‘या अधिक आहे. खडकी कँटोन्मेंट क्षेत्रात आणि
शेजारच्या भागात तमिळ ख्रिस्ती कुटुंबांची सं‘या लक्षणीय आहे. केरळमधून अलीकडील
काही वर्षांत स्थलांतरित झालेली कुटुंबं मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात
विखुरलेली आहेत.
शहरातील गोवन
समाजाने कुटुंबात, नातलगांत आणि मित्रांशी कोकणी भाषेत बोलून आपली
ही भाषा जतन केली आहे. गोव्यात ख्रिस्ती धर्मप्रसारात महत्त्वाची भूमिका करणारे
सेंट फान्सिस झेवियर हे या गोमंतकीय समाजाचं प्रमुख श्रद्धास्थान. या ‘गोयंच्या
सायबा’चया 3 डिसेंबरच्या सणाला हा समाज चर्चमध्ये मोठ्या सं‘येने उपस्थित असतो.
पुणे कॅम्पात ‘पूना गोवन इन्स्टिट्यूट’ इथे होणार्या अनेक सभा-समारंभांत शहरातील
गोमंतकीय ख्रिस्ती समाज आवर्जून उपस्थित राहतो. ख्रिस्ती गोमंतकीय संस्कृतीतील
अनेक उत्सव इथे उत्साहपूर्वक साजरे केले जातात. पुणे कॅम्पातील एम. जी. रोडपाशी
काही दुकानं गोवन किंवा ख्रिस्ती समाजाच्या संस्कृतीशी निगडित असलेल्या विविध
चालीरीत, स्नानसंस्कार किंवा पुण्यस्मरण यासार‘या विधींसाठी लागणारं
विविध साहित्य, उपकरणं पुरवत असतात. नाताळपूर्वी तर कॅम्पातील
अनेक दुकानं या सणासाठी अगदी सजलेली असतात. नाताळचा खास फील अनुभवण्यासाठी, त्या फेस्टिव्ह मूडमध्ये जाण्यासाठी अनेक बिगरख्रिस्ती कुटुंबं आपल्या लहान
मुलांसह कॅम्पचा फेरफटका मारतात,
तो केवळ यासाठीच.
जगभरात सर्व
पसरलेल्या गोवन ख्रिस्ती कुटुंबांत सेंट फान्सिस झेवियर हे एक महत्त्वाचं
श्रद्धास्थान असतं. गोव्यातील ‘बॉम जेसू बॅसिलिका’त या पंधराव्या शतकातील
संतांच्या शरीराचे अवशेष आजही जतन करण्यात आले आहेत. पुण्यातील गोवन ख्रिश्चनांच्या
या श्रद्धास्थानाकडे विशेष ओढा असतो. तर अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांतून
पुण्यात आलेले ख्रिस्ती समाजातील हजारो लोक दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसर्या
शनिवारी-रविवारी हरेगावच्या मतमाउलीच्या सणाला आवर्जून जात असतात. अहमदनगर
जिल्ह्यातील श्रीरामपूरजवळील या खेड्यात येशूची आई मारिया हिच्या जन्मतिथीनिमित्त
ही यात्रा गेली सहा दशकं भरत आहे. लाखो लोक आकर्षित करणार्या या यात्रेमुळेच
हरेगावला मराठी ख्रिस्ती समाजाची पंढरी असं संबोधलं जातं.
तमिळ ख्रिस्ती
समाजात सेंट अँथनी या संताला विशेष मान दिला जातो. हा समाज या संताच्या सणाला
शहरातील विविध चर्चमध्ये आवर्जून हजरत असतो. हरेगावला मतमाउलीचा सण साजरा होतो, त्याच दरम्यान पुण्यातील खडकी येथील सेंट इग्नेशियस चर्चमध्येही माता मारियेची
यात्रा नऊ दिवस भरवली जाते. पुणे पिंपरी-चिंचवड परिसरातील ख्रिस्ती आणि इतरही
भाविक या नऊ दिवसाच्या प्रार्थनेला - ‘नोव्हेना’ला उपस्थित असतात. या वेळी
चर्चमधील मारियेच्या पुतळ्याला साडी चढवली जाते. हिंदू देवळांत ज्याप्रमाणे देवीला
साडली नेसवली जाते, तीच परंपरा इथेही चालू ठेवण्यात आली आहे. विशेष
म्हणजे इथे साडीबरोबर नारळसुद्धा अर्पण केला जातो.
ख्रिस्ती धर्माचा प्रसार करताना स्थानिक संस्कृतीतील चांगल्या परंपरांचा स्वीकार करण्याची भूमिका अनेक ख्रिस्ती मिशनर्यांनी संपूर्ण जगभर घेतल्याचं दिसून येतं. मदुराई भागांत उच्चवर्णीय ब‘ाह्मणांमध्ये कार्य करणार्या सेंट रॉबर्ट डी नोबिली याने धर्मांतर केल्यानंतरही धर्मांतरीतांना डोक्याचं मुंडन करून शेंडी राखावयास आणि कपाळावर भस्म राखण्यास मुभा मिळवली. यासाठी त्याने अगदी रोमपर्यंत लढा दिला होता. गोव्यात सतराव्या शतकाच्या सुरुवातीला ‘ख्रिस्तपुराण’ हे मराठी महाकाव्य लिहिणार्या थॉमस स्टीफन्स या बि‘टिश धर्मगुरूने हिंदू धर्मातील अनेक संकल्पनांचा या महाकाव्यात वापर केला आहे.
स्थानिक संस्कृतीतील काही चांगल्या परंपरांचा, रीतिरिवाजांचा ख्रिस्ती धर्मातही वापर करण्याच्या प्रथेला ‘सांस्कृतिकीकरण’ किंवा ‘इनकल्चरेशन’ असं म्हटलं जातं. कॅथॉलिक चर्चने गेल्या काही दशकांत या संकल्पनेचा हिरिरीने पुरस्कार केला आहे. यामुळेच पुण्यात किंवा महाराष्ट्रातही अनेक ख्रिस्ती धर्मगुरू आखपल्या पांढर्या झग्यावर खांद्यावर शाल गुंडाळून उपासना करताना दिसतात. अनेक मराठी ख्रिस्ती कुटुंबांत रक्षाबंधन, भाऊबीज वगैरे परंपरा आजही पाळल्या जातात. तमिळ आणि मल्याळी ख्रिस्ती समाजातही पोंगल आणि ओणम वगैरे सण उत्साहपूर्वक साजरे केले जातात.
पुण्यातील
ख्रिस्ती समाजातील विविध घटकांनी आपली खास वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, चालीरीती ख्रिस्ती धर्मतत्त्वांशी तडजोड न करता अशा प्रकारे जतन केली आहे.
भाषा, आहार अशा गोष्टींमध्येही या मंडळींनी आपली वैशिष्ट्यं जपली
आहेत. ही जपणूक करताना ते पुण्याच्या स्थानिक संस्कृतीपासून वेगळे पडले नाहीत, तर या मंडळींच्या संस्कृतिवैविध्यामुळे पुण्याच्या संस्कृतीलाही नवीन आयाम
मिळाले.
कामिल पारखे
No comments:
Post a Comment