कार्यस्थळ माहात्म्य आणि नैतिक जबाबदारी
मी घर केल्यापासून म्हणजे माझे लग्न झाल्यापासून एक गोष्ट मला अनायासे मिळाली आहे ती म्हणजे भल्या पहाटे किचनमध्ये आल्यावर मला खिडकीतून शुक्र ताऱ्याचे दर्शन घडते. शुक्र तारा हे भावगीत आठवते आणि दिवसाची छान सुरुवात होते.
सकाळी मला चहा करताना माझी नजर त्या शुक्र ताऱ्याकडेअसते आणि एखादे दिवशी मला उशीर झाला किंवा त्या अवकाशातील व्यक्तीने आपली जागा बदलली तर मला चुकल्याचुकल्या सारखे होते. ऋतुमानानुसार यात बदल होत असला तरी शुक्र ताऱ्याच्या दर्शनाने दिवस सुरू करण्यासारखे भाग्य नाही असे मला नेहेमीच वाटत आले आहे. मी कवी मनाचा किंवा रोमँटिक नसलो तरी तो शुक्र तारा पाहिल्यावर दातेंचे शुक्र तारा मंद वारा हे भावगीत सुद्धा हमखास आठवतेच.
कामावर
जाताना
मी
कितीतरी वर्षे
मी
दुचाकी
न
वापरता
सार्वजनिक बस
सेवेचाच वापर
करत
आलो
आहे.
त्यामागे प्रदूषण टाळणे
वाहनांची गर्दी
टाळणे
वगैरे
उदात्त
हेतु
नसून
मला
अत्यंत
प्रिय
असणारी
निद्रा
हे
आहे.
बसच्या
अर्धा
पाऊण
तासाच्या प्रवासात मस्त
पैकी
झोपून
मी
ऑफिसच्या कामासाठी ताजातवाना होत
असतो.
या
महान
कार्यासाठी अर्थात
बसमध्ये खिडकीजवळ जागा
किंवा
बसमध्ये बसण्यासाठी कुठेही
जागा
मिळणे
अत्यावश्यक असते.
यासाठी
एखादी
प्रवाशांनी गच्च
भरलेली
बस
मी
टाळत
असतो.
शेवटी
प्रत्येकाची काही
प्राधान्ये असतातच
ना.
रात्री
कामावरून घरी
येताना
मात्र
गर्दी
नसल्याने जागा
मिळते,
नाही
मिळाली
तरी
हरकत
नसते
कारण
त्यावेळी मला
निद्रादेवी ची
आराधना
करायची
नसते.
मला
वाटते
विमानाने दिवसा
किंवा
रात्री
ही
काही
तासांचा प्रवास
करताना
मुलांप्रमाणे इतरांनाही खिडकीजवळ जागा
मिळावी
असेच
वाटत
असणार.
खूपखूप
वर्षांपूर्वी रशिया
आणि
बल्गेरियाला पत्रकारितेच्या अभ्यास
क्रमासाठी जाताना
विमानात आता
आपण
अमुक
अमुक
हजार
मीटर
उंचीवरून हिमालयीन पर्वतांच्या रंगावरून जातो
आहोत
अशी
घोषणा
ऐकून
अंगावर
रोमांच
आले
होते.
अर्थात
बाहेर
पूर्ण
अंधार
असल्याने काहीच
दिसले
नव्हते.
गोव्यात आणि
महाराष्ट्रात औरंगाबाद, पुणे
अशा
विविध
ठिकाणी
काम
करताना
ऑफिसमध्ये मोक्याची जागा
मिळावी
असे
मला
वाटायचे. पणजीला
मी
ऑफिसात
अगदी
ज्युनियर असल्याने याबाबत
निवडीचा काहीच
पर्याय
नव्हता
तरी
सुदैवाने आमच्या
लाकडी
फ्लोअर
आणि
कौलारू
छत
असलेल्या ऑफिसात
अगदी
गॅलरीपाशी टेबल मिळाले
होते.
तिथे
टाईपरायटर बडवताना मांडवी
नदी
आणि
नदीशेजारच्या दयानंद
बांदोडकर रस्त्यावरची वाहतूक
दिसायची. यासारखे सौख्य
कुठे
मिळणार
असे
मागे
वळून
पाहताना आता
वाटते.
कदाचित हा माझ्या सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा परिणाम असू शकेल मात्र औरंगाबाद आणि पुण्यात कामाच्या जागी दुसरी एक चैन भोगायला मिळाली. ती म्हणजे माझ्या टेबलापाशी बसलेले असताना मला सतत चालू असलेला टेलिव्हिजन दिसायचा. अर्थात टेलिव्हिजनवर सतत न्युज चॅनेल्स असायचे, पण हरकत नसायची.
मी सध्या राहतो त्या कॉलनी बाबत आणि एकूण परिसराविषयी मी जाम खुष आहे याचे कारण म्हणजे इथल्या इमारतीभोवती असलेली गर्द झाडी, बगिचा, पार्किंग, खेळण्यासाठी आणि फिरण्यासाठी असलेली मुबलक जागा. इमारतींत घर घेण्यासाठी अर्थात उपलब्ध असलेल्या मजल्यावर आणि खिशाला परवडेल असाच फ्लॅट निवडावा लागला होता, याबाबत फारशी निवडीचा फारसा पर्याय नव्हता, उलट तडजोडच अधिक होती. मिळेल त्याच्यात आनंद मानावा चित्ती असू द्यावे समाधान अशीच भावना होती.
श्रीरामपुरला व्यवसायाने टेलर
असलेलं
माझे
वडील
मला
एक
गोष्ट
सांगायची ती
आजही
आठवते.
कोणा
एका नगरीत असलेला
एक
माणूस
त्याच्या विद्वत्तेमुळे आणि ज्ञानामुळे खूप
प्रसिद्ध झाला
होता.
मात्र
असे
असले
तरी
त्याची
मजल
बैठे
स्वरुप
असलेल्या त्याच्या व्यवसायाच्या पुढे
गेलेली
नव्हती.
तो गरीबच राहिला
होता.
त्याच्या ज्ञानाची कीर्ती
ऐकून
त्या
नगरीच्या राजाने
त्याला
बोलावून घेतले.
राजदरबारात मात्र
त्या
माणसाने राजाची
आणि
दरबारातील इतरांची निराशाच केली.
त्या
मुखदुर्बळ माणसाच्या तोंडातून एक
शब्द
उमटत
नव्हता.
त्या
दरबारातला प्रधान
मात्र
हुशार
होता.
त्या
माणसाच्या ज्ञानाबद्दल सगळीकडे कौतुक
होत
असताना
प्रत्यक्षात ही
व्यक्ती मात्र
तशी
नाही
यात
काही
तरी
गौडबंगाल असावा
अशी
त्याला
शंका
आली.
तो
प्रधान
मग
त्या
माणसाच्या पाठोपाठ वेषांतर करुन
पोहोचला. पाहातो
तो
काय,
आपल्या
नेहेमीच्या बैठकीवर स्थानापन्न झाल्यावर त्या
माणसाला पुन्हा
एकदा
वाचा
फुटली
आणि
तो
आपले
ज्ञान
इतरांना देऊ
लागला.
त्या
रात्री प्रधानाने नोकरांकरवी त्या माणसाच्या बैठकीची जागा
खणून
काढली
तेव्हा
तिथे
खूप
खोल
खड्ड्यात सोने-चांदी आणि हिरेमोती असलेला
एक
घडा
सापडला.
त्या
दिवसानंतर तो
माणूस
इतरांसारखा सामान्य झाला,
त्याच
बैठकीवर बसून
निमूटपणे आपले
काम
करत
राहिला. त्याची नेहेमीची बैठक
असलेल्या त्याच्या कार्यस्थळाचा तोपर्यंत कुणालाही अगदी त्यालाही माहित
नसलेला
महिमा
आता
संपला
होता.
तत्त्वज्ञान हा माझा एक आवडीचा विषय. पणजीला
कॉलेजात असताना तत्त्वज्ञान माझा विषय होता. अनेक भारतीय आणि पाश्चिमात्य तत्त्ववेत्ते
त्यांच्या काही प्रमुख सिद्धांतांसाठी प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ,
आद्य शंकराचार्य यांचा अद्वैत सिद्धांत आहे, प्लॅटो आणि अरिस्टॉटल हे विविध
विषयांवरील पायाभूत मांडणीसाठी प्रसिद्ध आहेत.
फ्रान्सिस हर्बर्ट ब्रॅडले (१८४६-
१९२४) हा तत्त्ववेत्ता `माझे कार्यस्थळ आणि त्यासंबंधीची कर्तव्ये' किंवा `माय स्टेशन अँड इट्स ड्युटीज' या सिद्धांतासाठी
प्रसिद्ध आहे. या सिद्धांताविषयी विविध अंगांनी
मांडणी होत असली तरी मी स्वतः माझ्यापुरता
हा विचार 'आपली या घटकेची किंवा कामाची जागा
आणि त्याबाबतची कर्तव्ये' असाच घेत असतो.
No comments:
Post a Comment