Showing posts with label Baba Adhav. Show all posts
Showing posts with label Baba Adhav. Show all posts

Wednesday, April 27, 2022

दौरे आणि चळवळ समाजजागृतीसाठी आवश्यक

मी लहानपणी श्रीरामपूरला शाळॆत शिकत असताना समाजवादी कार्यकर्ते डॉ बाबा आढाव यांनी महाराष्ट्रभर एक दौरा काढल्याचे आजही आठवते. दौऱ्याचे आयोजन एका विशेष कारणासाठी केले होते. राज्यातील किती गावांत विविध समाजघटकांसाठी - स्पष्टच लिहायचे झाल्यास विविध जातीजमातींसाठी - पिण्याच्या पाण्यासाठी किती आणि कशाप्रकारच्या सामायिक विहिरी आणि इतर सुविधा आहेत हे पाहण्यासाठी डॉ आढाव यांनी हा संशोधनदौरा हाती घेतला होता. यानंतर कुठल्याशा दैनिकात कि इतर नियतकालिकांत याविषयी डॉ बाबा आढाव यांनी 'एक गाव, एक पाणवठा' या शिर्षकाची एक लेखमालिका लिहिली. नंतर ही लेखमालिका पुस्तकरुपातही प्रसिद्ध झाली. ही घटना आहे सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीची.

डॉ बाबा आढाव यांच्या या 'एक गाव, एक पाणवठा' संशोधनदौऱ्यात महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याची सुविधा सामायिक आहे कि नाही याबाबतचे वास्तव लोकांच्या समोर आले.
त्यानंतर शांतीलाल मुथ्था यांनी सामुदायिक विवाहासाठी असेच दौरे आणि चळवळ सुरु केली होती. काही समाजांत लग्नासाठी आणि हुंड्यासाठी मुलीच्या कुटुंबाच्या ऐपतीबाहेर खर्च करण्यासाठी प्रचंड दबाब येतो, त्यावर सामुदायिक विवाह हा एक प्रभावी उपाय आहे असे मुथ्था यांचे म्हणणे होते.

याच हेतूने त्यांनी १९८९साली महाराष्ट्राच्या काही भागांत म्हणजे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश या प्रदेशांतील विविध शहरांत आणि गावांत सामुदायिक विवाहास उत्तेजन देण्यासाठी पदयात्रा काढली. यादरम्यान गोव्यातील माझे वास्तव्य आटोपून मी महाराष्ट्रात परतलो होतो, तेव्हा या पदयात्रेचे ठिकठिकाणी अगदी उत्साहाने स्वागत होत असल्याचे वृत्तपत्रांच्या बातम्यांतून दिसून येत होते. या दौऱ्यामुळेच शांतिलाल मुथ्था यांना मग `सामुदायिक विवाहाचे प्रणेते' ही एक उपाधी चिकटली.
मुथ्था यांच्या प्रेरणेने नंतर अनेक जाती आणि जमातींमधील आणि धर्मांतील नेत्यांनी मग आपापल्या समाजांसाठी सामुदायिक विवाहसोहोळे आयोजित सुरु केले
काँग्रेसचे मुंबईतील खासदार आणि चित्रपट अभिनेते सुनिल दत्त यांनी मुंबई ते पंजाबमधील अमृतसर येथपर्यंत १९८७ साली काढलेली शांती पदयात्रा अशीच त्यामागच्या उद्दात्त हेतूने गाजली. अमृतसर येथील सुवर्णमंदिरातले अतिरेकी बाहेर काढण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन ब्ल्यु स्टार लष्करी कारवाईनंतर सुद्धा पंजाबमधले स्थिती पूर्वपदावर आलेली नव्हती.
पंजाबमधली ही स्थिती बदलून तेथे शांती प्रस्थापित करण्यासाठी आणि दुःखी शीख समाजाच्या वेदनेवर फुंकर घालण्यासाठी ही अडिचहजारहून अधिक किलोमिटर्सची पदयात्रा सुनिल दत्त यांनी सुरु केली होती. एकूण ७८ दिवस चाललेल्या या पदयात्रेत सुनिल दत्त यांच्या सोबत त्यांची मुलगी प्रिया दत्त याही होत्या.

समाजसेवक बाबा आमटे यांनी ऐंशीच्या दशकात ''भारत जोडो'' या नावाने देशभरचा दौरा सुरु केला होता. पणजी येथे `नवहिंद टाइम्स'चा बातमीदार म्हणून बाबा आमटे यांचा हा गोवा दौरा मी कव्हर केला होता, त्यावेळेस वृद्धत्त्वाकडे झुकलेले बाबा आमटे मणक्याच्या दुखण्याने त्रस्त होते तरीसुद्धा त्यांनी हा दौरा हाती घेतला होता हे विशेष होते.
जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी १९८३ साली केलेली कन्याकुमारी ते दिल्ली पदयात्रा अशीच खूप गाजली. `भारत यात्रा' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पदयात्रेने चंद्रशेखर यांना देशभर एक नवी, स्वतंत्र ओळख मिळवून दिली.
भारतीय जनता पक्षाच्या लाल कृष्ण अडवाणी यांच्या देशभरच्या रथ यात्रेने तर देशाचा इतिहास घडवला हे कोण नाकारू शकेल?
काँग्रेसचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना इतर पक्षांच्या मदतीने पदच्युत करुन शरद पवार मुख्यमंत्री बनले पण हे पद अल्पकाळाचे ठरले. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आल्यानंतर आणि काँग्रेसचे सरकार आल्यावर विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस (समाजवादी) पक्षाचे नेते म्हणून शरद पवार स्वस्थ बसले नव्हते. त्याकाळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला होता, अगदी कब्बडीच्या स्पर्धा आयोजनातसुद्धा ते मागे राहिले नव्हते असे म्हणतात. शरद पवार यांच्या अशा या कष्टांचे फळ आणि परीणाम आपण सर्व जण आज पाहत आहोतच.
आजकाल मात्र असे दीर्घ परीश्रम आणि कष्टांचे दौरे राजकीय नेत्यांना सोसवत नाहीत असे दिसते. त्यामुळेच केवळ एखादया केंद्रस्थानी वा प्रकाशझोतात आलेल्या क्षेत्राला भोज्याप्रमाणे (भोंगा नव्हे ! ) भेट देऊन त्याद्वारे दीर्घकालीन दौऱ्याचे पुण्य आणि श्रेय उपटण्याचे मार्ग पत्करावे लागत आहेत.
अर्थात एव्हढ्या शॉर्टकटने जर त्यांचा अपेक्षित कार्यभाग उरकत असेल तर इतरांचीही त्याबद्दल हरकत नसावी.

Friday, October 23, 2020

सामाजिक चळवळीतील - डॉ. बाबा आढावांचे योगदान

 

सामाजिक चळवळीतील - डॉ. बाबा आढावांचे योगदान

 डॉ. बाबा आढाव म्हणजे समाजातील दुर्बल आणि शोषित घटकांचा अन्यायाविरुद्धचा लढा असे जवळजवळ समीकरणच बनले आहे. कुठेही अन्याय घडून आल्यास त्याविरुद्ध संघर्ष करण्यासाठी तरुणाच्या उमेदीने उभ्या राहणाऱ्या बाबाची कामगिरीही तशीच आहे.

सडपातळ बांध्याच्या, जाड्याभरड्या खादीचे कपडे वापरणाऱ्या आणि पुण्यातील महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या छोटेखानी कार्यालयात हमाल पंचायतीच्या सदश्यांशी बोलताना बाबाना पहिले म्हणजे महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी चळवळीत एक भरीव योगदान करणारी व्यक्ती ती हीच यावर विश्वास बसत नाही. समोर बोलणारी व्यक्ती मग टिम्बर मार्केटमध्ये काम करणारी हमाल असो वा समाजातील एखादी मान्यवर व्यक्ती असो बाबांच्या चेहऱ्यावर बोलताना नेहमीच स्मितहास्य खेळत असते. १९५२ साली अन्नधान्य भाववाढीविरोधी सत्याग्रहात बाबानी भाग घेतल्याबद्दल त्यांना तीन आठवड्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यावेळी हा तरुण अन्यायाविरुद्धच्या लढ्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून टाकील याची कल्पना कुणालाही आली नसणार त्यानंतर म्हणजे गेल्या चार दशकात प्रभाव असणाऱ्या डॉ. बाबा आढावांनी अन्यायाविरुद्धच्या संघर्षात कोणतेही क्षेत्र वर्ज्य मानलेले नाही. एक गाव, एक पाणवठा सारखी अस्पृश्यता निर्मूलन मोहीम, देवदासींच्या पुनर्वसनाची मोहीम हमाल - माथाडी आणि फूटपाथवर माल विकून पॉट भरणारे कष्टकरी घटकांचे संघटीकारण, मुस्लिम आणि दाऊदी मोहरा

पंढरपूर येथे शासकीय खर्चाने दरवर्षी होणारी विठोबाची पूजा १९७१ साली बंद पडण्यास बाबानी शासनाला भाग पडले होते. भारताच्या निधर्मी धोरणाशी हि शासकीय पूजा सुसंगत नाही असं बाबांचे म्हणणे. मात्र पुढे श्री. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर हि प्रथा पुन्हा सुरु करण्यात येऊन पुरोगामी चळवळीची काही प्रमाणात पीछेहाट झाली याचे बाबाना अजूनही वैषम्य वाटते. संतांनी समतेची पताका उभारून सर्व समाजास एकसंघ बनविण्याचा प्रयत्न केला असतानासुद्धा विठोबाच्या दर्शनास जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्यामध्ये अस्पृश्यांसाठी वेगळे पथक ठेवण्याच्या प्रथेसही बाबानी तीव्र विरोध केला.

बाबांच्या पुढाकाराने १९७४ साली कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे पहिली देवदासी परिषद भरविण्यात आली. तेव्हापासून धर्माच्या नावावर चालणाऱ्या या अमानुष प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी बाबांनी  मोलाची कामगिरी पार पाडली आहे. एक धार्मिक प्रथा या गोंडस नावाखाली महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमाभागातील बालिकांना वेश्या व्यवसायास लावणाऱ्या या प्रथेस दोन्ही राज्य सरकारांनी पूर्णतः आळा घालून या प्रथेचे बळी ठरलेल्या महिलांचे पुनर्वसन करावे.      

त्यांच्या होणाऱ्या मानहानीचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी बाबा गडहिंग्लज परिषदेतील एका देवदासींच्या छोट्याश्या भाषणाचा दाखल देतात. गौराबाई हि देवदासी या परिषदेत बोलण्यासाठी दोन्ही हात जोडून उभी राहिली पण तिचे भाषण दोन-तीन वाक्यापुरतेच मर्यादित राहिले. बाबांनो तुम्ही आम्हाला मे-बहिणी म्हणून संबोधले आणि यातच आम्हाला सर्व काही मिळाले. असे म्हणून हि देवदासी मटकन खाली बसली. पुरुषांच्या फक्त कामुक अथवा हेटाळणीच्या नजरेची सवय झालेल्या या देवदासींना समाजाचा एक घटक आपल्याला सन्मानाने जगता यावे म्हणून पुढे येतो या जाणिवेनेच अपार आनंद झाला होता.

देवदासी प्रथा निर्मूलनाच्या चळवळीच्या निमित्ताने अनेक सभा-संमेलनातून मी या प्रथेवर कडक हल्ले चढविले आहेत. पण यापैकी एकही भाषण गौराबाईच्या त्या छोट्याश्या भाषणाइतके परिणामकारक नव्हते असे बाबा म्हणतात.

काही काळापुरता बाबांनी पक्षीय राजकारणातही वावर केला. १९६७ साली खेड मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्याआधी म्हणजे १९६३ साली ते पुढे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून निवडून आले होते परंतु आपल्या समाजवादी विचारसरणीशी तडजोड करण्याचे त्यांनी स्वीकारले नाही. त्यामुळे अंदाजपत्रकात झोपडपट्टी विकासासाठी पुरेशी आर्थिक तरतूद नाही या कारणावरून त्यांनी १९७१ मध्ये नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.

आणीबाणीच्या काळात लोकशाही पद्धतीने विरोध करण्याच्या सर्व पद्धतींवर देशात बंदी घालण्यात आली होती. या काळात दडपशाहीच्या भीतीमुळे सर्वच चळवळी एकदम थंडावल्या होत्या. त्यापैकी बाबानी पुण्यात झोपडपट्टी परिषद आयोजित केली. यावेळी भूमिगत असलेले व बाबांचे समाजवादी पक्षातील एकेकाळचे सहकारी श्री. जॉर्जे फर्नांडिस यांनी बाबांना आता सर्व जबाबदारी तुमच्या खांद्यावर असा संदेश पाठवला होता. झाले. त्याच रात्री बाबाना अटक करण्यात आली व येरवड्याच्या कारागृहात त्यांना दीड वर्षे ठेवण्यात आले.

आणीबाणी उठविण्यात आल्यानंतर इतर नेत्यांबरोबरच बाबांचीही तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. त्यानंतर समाजवादी पक्षाचे नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या जनता पक्षात विलीनीकरण करण्यात आले. पण बाबा जनता पक्षात गेले नाहीत. पक्षविरहित राहून समाजकार्य करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. जनता पक्ष सत्तेवर असतानासुद्धा झोपडपट्टीच्या प्रश्नावर बाबानी सत्याग्रह केला व तुरुंगवास पत्करला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी आणीबाणीनंतर आपली जातीयवादी भूमिका बदलली संघाचे परिवर्तन झाले अशी प्रकारचा प्रचार जनता राजवटीच्या काळात करण्यात येत होता. त्यावेळी बाबानी संघाचे परिवर्तन झाले. अशी प्रकारचा प्रचार जनता राजवटीच्या काळात करण्यात येत होता. त्यावेळी बाबानी संघाचे ढोंगबाजी आणि संघापासून सावध या पुस्तिका लिहून संघाचे पितळ उघडे पडण्याचा प्रयत्न केला होता. या दोन पुस्तिकांनी त्यावेळेस सगळीकडे प्रचंड खळबळ उडवून दिली होती.

आयुर्वेद वैद्यकशास्त्राची पदवी असणाऱ्या बाबा आढावांनी गोआ मुक्ती आंदोलनातही सहभाग घेतला. १९५५ साली त्यांच्या नेतृत्वाखाली एक शुश्रूषा पथक गोव्याच्या सीमेवर गेले होते. मराठवाडा विद्यापीठास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी झालेल्या आंदोलनातही ते अग्रस्थानी होते. १९७९ साली नामांतरप्रकारणी त्यांनी सत्याग्रहींचा लॉन्ग मार्च आयोजित केला होते. त्यावेळी त्यांना व इतर सत्याग्रहींना शासनाने रस्त्यावरच अडवून वीस दिवस तुरुंगात ठेवले होते.

महाराष्ट्र राज्य माथाडी महामंडळाचे  अध्यक्ष या नात्याने राज्यातील बाजारपेठ वाहतूक व्यवसाय सरकारी बसस्थानके येथे केम करणाऱ्या हमालांना संघटित करून त्यांचा न्याय मागण्यासाठी संघर्ष करण्याचे कार्य बाबा करत आहे. पुण्यातील हमाल कामगारांशी तर त्यांचे नाते जवळजवळ चार दशकांचे आहे. पुण्यातील हमाल पंचायतीचे हमाल भवन हे आज परिवर्तनाच्या आणि कष्टकरी जनतेच्या लढ्याचे एक प्रतीकच बनले आहे.

हमालांना संघटित करून बाबानी समाजातील अनेक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली आहे. प्रश्न महागाईचा असो अथवा सामाजिक न्यायाच्या हक्कासंबंधीचा असो, पुण्यातील हमाल व इतर कष्टकरी त्यासंबंधी आपले मत मांडण्यासाठी नेहमीच रस्त्यावर आलेले आहेत.

हमाल केमगार आणि इतर कष्टकरी जनतेपैकी बहुतेक जण निरक्षर असतात आणि त्यांना सामाजिक न्याय, स्वतःचे हक्क व आर्थिक पिळवणूक वगैरे संकल्पनांचे मुळीच ज्ञान नसते. त्यामुळे मोर्चा, निदर्शने वगैरे लढ्याच्या भाषेतूनच त्याने त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची आणि त्यांच्या स्वतःच्या हक्काची जाणीव करून देता येते, असे बाबा म्हणतात.

स्वतःचे श्रम विकून आपले पॉट भरणाऱ्या एका फार मोठ्या घटकास समाजात मनाचे स्थान पॅट नाही याचे बाबांना फार वैषम्य वाटते. वाहतूक व्यवसायातील व्यापाज्यानी स्वतःच्या वाहनांना ठेवण्यासाठी गॅरेज नाही म्हणून हि वाहने भर रस्त्यावर उभी केली तर कुणीच आक्षेप घेत नाही. मात्र एखाद्या गरीब पोटभरू व्यक्तीने ह्याच रस्त्यावर फळभाज्या व इतर वस्तू विकावयास सुरुवात केली तर पोलीस, नगरपालिका आणि इतर खात्यातील अधिकारी लगेच त्यांच्याविरुद्ध कारवाई करावयास पुढे येतात यामधील पक्षपाताची त्यांनी नेहमीच चीड व्यक्त केली आहे. एखाद्या गरीब आणि नाडलेल्या कष्टकरी व्यक्तीने छोट्याश्या वस्तूची चोरी केली तर तो एक मोठा गुन्हा मानला जातो. मात्र या कष्टकऱ्यास त्यांच्या सेवेबद्दल अत्यंत कमी मोबदला देऊन त्यांच्या श्रमाची राजरोसपणे होणाऱ्या चोरीची कुणीच का दखल घेऊ नये असा त्यांचा सवाल आहे.

मी स्वतः इज फुलेवाडी माणूस आहे. महात्मा फुल्यानी स्वतःच्या सामाजिक कार्याची स्रियांपासून सुरुवात केली. पण अजून स्रियांना अर्थव्यवस्थेत पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळालेले नाही. स्त्रीमुक्ती चळवळ आज फोफावते आहे. पण आजपावेतो तरी हि चळवळ कष्टकरी आणि दलित महिलांपर्यंत पोहोचली नाही याची खंत वाटते. असे बाबा म्हणतात.

सामाजिक न्याय आणि समता या तत्वांचे एक कट्टर पुरस्कर्ते बाबा आढाव गेले एक दशकभर मंडळ आयोगाचे समर्थन करत आहेत. सद्य अस्तित्वात असलेल्या सामाजिक असमतेचे निर्मूलन केल्याशिवाय सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे स्वप्न प्रत्यक्षात आणणे शक्य नाही व यासाठी सामाजिक दुर्बल घटकांना राखीव जागांचे सरक्षण मिळालेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे.

ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे अशी उच्च वर्गातील मंडळी राखीव जांगांच्या धोरणास विरोध करतात. बसमध्ये जागा मिळालेल्या सर्व व्यक्तींना वाटते कि, कंडक्टरने ताबडतोब डबल बेल वाजवून बस बसस्थानकावरून निघावी, बुसीमध्ये जागा न मिळाल्याने स्थानकावरील रांगेतच तात्काटलेल्या व्यक्तींचा या मंडळींपैकी कुणीच विचार करत नाही. मंडळ आयोगास विरोध करणाऱ्या व्यक्तीची असलीच मनोवृत्ती आहे असे बाबा म्हणतात.

 

 

 

Thursday, February 9, 2012

Anna Hazare A soldier’s journey


A soldier’s journey
CAMIL PARKHE
Sunday, August 28, 2011 AT 06:50 PM (IST)
I remember my first reporting assignment related to Anna Hazare two decades ago. I had arrived from Aurangabad to Pune to join a national newspaper. One morning, I, another reporter and a photographer rushed to Wadegavhan near Shirur. Three farmers protesting against the power distribution company were killed there in police firing. The farmers agitation was led by Anna Hazare, who had resorted to his first indefinite fast in Ahmednagar. Hazare was hospitalised and called off his fast only after securing an assurance from the authorities.

A couple of years later, I met Hazare for the first time at Ralegan Siddhi, where he had resorted to a "maunvrat" to demand action in some corruption cases. Reporters would ask him questions and he would write the answers on a note pad. Then in mid-20s, I could not suppress my laughter on seeing this exercise was. I remember being admonished by my colleagues. Visits to Ralegan Siddhi became frequent later. I developed a close relationship with the social activist and once camped in his village for couple of  days to get acquainted with his development projects. To this date, I have preserved my black and white photographs with Anna and the letters Anna wrote to me, acknowledging receipt of newspaper clips on him or news about some of his new projects.

Hazare has always been media savvy. Ignoring protests from his office staff, he would give journalists complimentary copies of books on success stories of Ralegan Siddhi. For some unknown reasons, most journalists from Ahmednagar used to scoff at Hazare. It was  only after some Pune journalists regularly wrote on Hazare in English newspapers that his unique contribution became known in the state and later all over the country.

The fight against corruption has been an issue dear to Anna's heart. For years, he used to launch a fast around the Kranti Din of August 9 and would end it after a token assurance from the authorities. He was criticised and made fun of because of this. Once, about a decade back, Anna teamed up with Mohan Dharia, Baba Adhav and others to take on the issue of corruption. Otherwise, he was always a solitary crusader. Anna had never studied in a college but this former soldier-driver in the army has graduated to becoming a revered leader in the country during the past three decades. Now he is articulate, has clarity of thought and most important, has the moral strength to lead the masses. No wonder, his protests now move the entire country. 

Join Sakàl Times on Facebook: