Wednesday, December 9, 2020

समाजवादी नेते नानासाहेब गोरे




मी पुण्यात इंडियन एक्सप्रेसला नुकताच रुजू झालो होतो आणि शहरातील बातमीच्या वातावरणाची आणि संस्कृतीची ओळख करून घेत होतो. नोव्हेंबर १९८९ चा हा काळ. स्थानिक बातमीसाठी आणि बाहेरील बातम्यांसाठी स्थानिक जोड किंवा आशय देण्यासाठी सर्वच क्षेत्रांतील पुण्यात खूप लोक आहेत हे लक्षात आले. गोव्यात बातमीदारी करताना ज्येष्ठ्य स्वातंत्र्यसैनिक पुरुषोत्तम काकोडकर, मार्क्सवादी नेते जॉर्ज वाझ, नारायण देसाई वगैरे मंडळींचा अशा कामांसाठी मदत व्हायची. औरंगाबादमध्ये लोकमत टाईम्सचे काम करताना मराठवाडा स्वात्रंत्र्यसेनानीं गोविंदभाई श्रॉफ, सुभाष लोमटे, कॉम्रेड भालचंद्र कानगो, ज्येष्ठ वकील नरेंद्र चपळगावकर वगैरेंशी बोलून बातमी तयार व्हायची.
पुण्यात तर अशा लोकांचे मोठे भांडारच होते. तर अशा आपापल्या क्षेत्रांतील ज्येष्ठ आणि तज्ज्ञ असलेल्या मंडळींमध्ये समाजवादी नेते नानासाहेब गोरे आणि ग. प्र. प्रधान, माजी मंत्री आणि पर्यावरणवादी मोहन धारीया, सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, विद्या बाळ, डॉ निलम गोऱ्हे, शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि गोविंद स्वरुप अशी भलीमोठी यादी होती.
या सर्व ज्येष्ठ मंडळींमध्येही काही जणांचे व्यक्तिमत्व अगदी उठून दिसायचे ते त्यांच्या ज्ञान आणि अनुभवांच्या शिदोरींमुळे. ना. ग. (नारायण गणेश) किंवा नानासाहेब गोरे हे अशांपैकी एक व्यक्तिमत्व. काही वर्षांपूर्वीच लोकसभेवर निवडून आल्यानंतर जनता पक्षाच्या राजवटीत इंग्लंडमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून त्यांनी केलेले काम हे त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे अगदी अलिकडचे पद. त्याआधी कितीतरी वर्षे देशातील एक आघाडीचे समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, लेखक अशी त्यांची अनेक रूपे होती. त्यामुळे इंडियन एक्सप्रेससारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या दैनिकासाठी बातम्या लिहितांना त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांची नेहेमी गरज पडायची आणि नानासाहेबांनी कधी नाही म्हटले वा विशिष्ट कारणांमुळे 'कोट' देण्याचे टाळले असे मला आठवत नाही.
नानासाहेब गोरे यांच्या आडनावाची इंग्रजी स्पेलींग Gore असे नसून Goray अशी आहे हे इंग्रजी वृत्तपत्राच्या पुण्यात नव्यानेच आलेल्या बातमीदाराला बजावले जायचे. त्याकाळात एखादी मोठी घटना घडली की त्यात्या क्षेत्रांतील मोठ्या व्यक्तीला त्यांच्या घरी व ऑफिसांत लँडलाईनवर फोन करुन त्यांचे मत विचारायचे अशी पद्धत होती. बातमीदार लोक आताही असेच पण मोबाईलवर वा ईमेलवर प्रतिक्रिया विचारतात. ( रिऍक्शन देणारे म्हणून रिऍक्शनरी लोक, असे काही पत्रकार गंमतीने म्हणत ).
नानासाहेब गोरे ज्या पद्धतीने आपली प्रतिक्रिया व्यक्त करत त्याविषयी मला आजही नवलमिश्रीत अचंबा वाटतो. त्याचे कारण म्हणजे नानासाहेबांना फोन करुन त्यांची प्रतिक्रिया विचारली की ते लगेच म्हणायचे, ''हं , घ्या लिहून...! '' त्यांना फोन करण्याआधी बातमीदाराने पेन आणि नोटपॅडसह तयारीत असणे गरजेचे असायचे. अन त्यानंतर काही मोजक्याच वाक्यांत अगदी मुद्देसूदपणे कुठलेही पाल्हाळ न लावता नानासाहेब आपले मत अक्षरश: डिक्टेट करायचे. दोनतीन पॅराग्राफची ती प्रतिक्रिया कसलाही बदल न करता अगदी जशीची तशी वापरण्यासारखी असायची. एक शब्द जास्त नाही आणि एक शब्द कमी नाही. नेहेमीच्या अनुभवामुळे आणि एखादी घटना घडल्यावर नानासाहेबांचा फोन दिवसभर खणखणत राहणार हे ठरले असायचे. नानासाहेबांनी वाढत्या वयातही प्रतिक्रियेला नकार देऊन कुणाही पत्रकाराला नाराज केले नव्हते.
काही काळानंतर नानासाहेब गोरे यांच्या सदाशिव पेठेतील एकमजली वाडेवजा जुन्या घरी जाऊन त्यांची मुलाखत घेतली. त्यानंतर या भेटीगाठी वाढत गेल्या. या सदाशिव पेठेत त्यावेळी अनेक समाजवादी नेतेमंडळी राहत होती. मी पुण्यात येण्याआधीच एस. एम. जोशी यांचे निधन झाले होते. नानासाहेबांच्या घराच्या आसपास राहणाऱ्या इतर समाजवादी साथी मंडळींमध्ये शिरुभाऊ लिमये आणि ग. प्र. प्रधान यांचा समावेश होता. नानासाहेबांना भेटण्यासाठी एक चिंचोळा जिना चढून जावा लागत असे. त्यांची मुलगी परदेशात असल्याने या घरात नानासाहेब एकटेच राहायचे, त्यांचे जेवणखाण करण्यासाठी केअरटेकर होती. नानासाहेबांची वामकुक्षी झाल्यानंतर दुपारी साधारणतः तीननंतर मी त्यांना भेटायला जायचो. बहुतेक वेळेस पूर्वसूचना नसायची, मात्र भेटण्यासाठी ही कधीही अट नसायची.
एकदा आम्ही बोलत असताना चारच्या सुमारास केअरटेकरने आवाज दिला, तसे नानासाहेब जागेवरुन उठले आणि समोरच्या डायनिंग रुममध्ये गेले.
भिंतीला असलेल्या बिनागज वा पडदे नसलेल्या खिडकीतून ते तिथे दुपारचा चहाबिस्कीट घेत होते हे मला दिसत होते. पाचच मिनिटांत नानासाहेब परतले आणि आमची मुलाखत पुन्हा सुरु झाली. नानासाहेब एकटेच राहत असल्याने आणि माझ्यासारखे अनेक उपटसुंभ व्यक्ती त्यांना दररोज भेटायला येत असल्याने त्यांनी या सर्वांनां चहापाणी वा इतर आदरातिथ्य करावे अशी अपेक्षा करणेच चुकीचे होते. मात्र काही पत्रकारमंडळी ''जरा थांबा, मी चहा घेऊन येतो..!'' या पुणेरी वाक्याने नानासाहेबांची चेष्टाटवाळी करत असत हे मी अनुभवले होते. मात्र नानासाहेबांच्या घरच्या परिस्थितीचीं जाणिव झाल्यावर मला या वागणुकीत गैर दिसले नाही.
हीच गोष्ट स्वतःचे फोटो देण्याबाबतची. नानासाहेबांना एकदा मी एका लेखाबरोबर वापरण्यासाठी त्यांचा एक फोटो मागितला. त्यावर ''फोटोग्राफर बोलवा, नवा फोटो काढा, मी तयारच आहे !'' असे ते म्हणाले. पत्रकारांची मुलाखतीसाठी रांग लागलेली असताना प्रत्येक बातमीदाराला ब्लॅक अँड व्हाईट का होईना पण फोटो देणे त्यांना शक्य नव्हते आणि काही गरजही नव्हती. मुलाखत दिल्यावर त्या पत्रकाराने त्या लेखाचे कात्रण द्यावे अशीही अपेक्षा ते ठेवत नसत.
याच्या अगदी उलट अनुभव नानासाहेबांचे जवळचे शेजारी आणि गोवा मुक्तिसंग्रामात नानासाहेबांबरोबरच कारावासाची शिक्षा झालेल्या शिरूभाऊ लिमये यांचा. नानासाहेबांच्या तुलनेने शिरुभाऊ तसे 'लो प्रोफाईल' नेते वा कार्यकर्ते. शिरुभाऊंची मी मुलाखत घेतल्यानंतर मी त्यांच्याकडे एखादा फोटो देण्याची मागणी केली तेव्हा भोळ्या सांबाप्रमाणे त्यांनी मला गोव्याच्या आग्वाद तुरुंगातील आणखी एका नेत्याबरोबरचा एक दुर्मिळ कृष्णधवल फोटोच माझ्यापुढे ठेवला ! टाइम्स ऑफ इंडियाच्या पुणे प्लस पुरवणीत गोवा मुक्तिसंग्रामाबद्दलच्या माझ्या लेखात नानासाहेब गोरे आणि शिरुभाऊंच्या मुलाखतीसह तो दुर्मिळ फोटो प्रसिद्ध झाला.
नानासाहेब गोरे यांच्या मुलाखतीवर आधारीत लेख मी गोव्यात 'गोमंतक'ला पाठवला तेव्हा गोमंतक'चे संपादक नारायण आठवले यांनी गोव्याच्या मुक्ती सोहोळ्यानिमित्त काढलेल्या खास पुरवणीत तो लेख कव्हर स्टोरी म्हणून वापरला होता.
या ज्येष्ठ विचारवंत आणि राजकिय नेत्याशी एकदा संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयी बोलताना मी माझ्या अल्पमतीनुसार एक शंका मांडली होती आणि तेव्हा रागाने भडकलेले नानासाहेब मला अजूनही चांगले आठवतात. समाजवादी, साम्यवादी अशा वैश्विक, मानवतावादी आणि पुरोगामी विचारसरणीच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाषेच्या आणि प्रादेशिक मुद्यावर संकुचित भुमिका का घ्यावी आणि त्यासाठी १०५ लोकांना हौतात्म्य पत्करावे लागले असा माझा बाळबोध प्रश्न होता.
संतापलेल्या नानासाहेबांनी त्यावेळी ‘’कामिल, आपण चांगला, नीट अभ्यास करुन प्रश्न उपस्थित करावे’’ असे त्यावेळी मला सुनावले होते. ‘’तुम्ही लिहित असलेला हा लेख छपाईला पाठविण्याआधी मला दाखवा’’, असेही त्यावेळी त्यांनी मला बजावले होते.
अलिकडेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अर्ध्वर्यू आचार्य अत्रे यांच्या खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्र आणि भारतसुद्धा सोडून परदेशातच स्थायिक झालेल्या एका कन्येचे वृदापकाळाने निधन झाले अशी बातमी वाचली तेव्हा नानासाहेबांबरोबर उडालेल्या या छोट्याशा खडाजंगीची मला आठवण झाली होती. त्यानंतर काही दिवस नानासाहेबांची भेट घेणे मी टाळले होते.
नानासाहेबांच्या त्या अगदी छोट्याशा गढीत प्रवेश करताना आणि धोतर, सदरा पेहेरावात असलेल्या नानासाहेबांशी बोलताना त्यांच्या साधेपणाचे मला नेहेमी आश्चर्य वाटायचे. त्याकाळात मी डेक्कनला रानडे इन्स्टिट्यूटसमोरच्या हॉटेल हिल्व्ह्यू -प्रिया लॉजमध्ये मंथली कॉट बेसिसवर राहत होतो. मात्र रशियाचा दौरा करताना आणि बल्गेरिया येथे पत्रकारितेचा अभ्यासक्रम करताना युरोपातील जीवनशैलीचा मी अनुभव घेतला होता. त्यामुळे १९४२च्या चले जाव आंदोलनात शिक्षा झालेल्या, गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या, १९५७ ला पुण्यातून लोकसभेवर निवडून गेलेल्या आणि नंतर राज्यसभेचेही सभासद असलेल्या, वर्षातून काही महिने अमेरिकेत आपल्या मुलीबरोबर राहणाऱ्या आणि मुख्य म्हणजे ब्रिटनमध्ये भारताचे उच्चायुक्त असलेल्या माणसाशी आपण बोलत आहोत यावर विश्वास ठेवणे अवघड व्हावे अशी त्यांची साधीसुधी जीवनशैली होती.
दोनतीन वेळेस त्यांचे डायनिंग टेबल असलेल्या आतल्या खोलीत जाण्याचा योग आला तेव्हा भिंतींना लागून असलेल्या लाकडी कपाटांतील पुस्तकांकडे मी नीट पाहून घेतले होते. स्वतः नानासाहेबांनी अनेक पुस्तके लिहिली होती हे मला माहिती होतेच. त्यांच्या तुरुंगवासातील दिवसांवर आधारीत एक लेख मला शाळेत पाठयपुस्तकात अभ्यासालाही होता.
नानासाहेबांबद्दल माझ्या मनात आदर निर्माण होण्यास आणखी एक कारण होते. शासकीय आणि खासगी वैद्यकीय कॉलेजांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मानवी मृतदेहांचा तुटवडा पडतो म्हणून देहदानाची चळवळ सुरु करणारे सोहोनी यांच्याबाबाबत मी इंडियन एक्सप्रेसमध्ये अनेक बातम्या छापल्या होत्या. सत्तरी ओलांडलेल्या सोहोनी यांच्या देहदान चळवळीस पाठबळ देणाऱ्या पुण्यातील दोन प्रमुख व्यक्तींमध्ये ना. ग. गोरे यांचा समावेश होता. यापैकी दुसरी व्यक्ती होती उद्योगपती शंतनुराव तथा एस. एल. किर्लोस्कर.
नानासाहेब आणि शंतनुराव या दोघांनीही मृत्यूपश्चात देहदानाचा अर्ज भरुन देहदानाच्या चळवळीस आपला सक्रिय पाठिंबा आहे असे जाहीर केले होते. देहदान चळवळीचा प्रचार करताना सोहोनी नेहेमी या दोन समाजधुरीणांचा उल्लेख करत असत. विशेष म्हणजे शंतनुराव किर्लोस्कर यांच्या व्यक्तिचित्राचा समावेश असलेले 'उत्तुंग' हे संजय सोनवणी यांनी प्रकाशित केलेले माझे पुस्तक भेट देण्यासाठी किर्लोस्कर यांनाही याच काळात मी सोनवणी यांच्याबरोबर भेटलो होतो. मात्र नानासाहेबांचा आपल्या देहदानाचा हा निर्णय त्यांच्या अमेरिकेतील मुलीने देहदानाविरुद्ध भूमिका घेतल्याने पूर्ण होऊ शकला नाही.
एक मात्र खरे कि त्याकाळात नानासाहेबांशी बोलताना आपण किती मोठ्या, विद्वान आणि अनुभवसमृद्ध व्यक्तीशी बोलतो आहोत याची त्यावेळेस जाणिव झाली नव्हती. मी त्यांच्या गाठीभेटी घेत होतो त्यावेळेपर्यंत ना. ग. गोरे या व्यक्तीच्या जीवन आणि कार्याविषयी प्रतिष्ठेच्या मराठी विश्वकोशात यदुनाथ थत्तेलिखित एक नोंदही प्रसिद्ध झाली आहे याची मला माहितीही नव्हती.
त्यांच्या मुलाखतीवर आधारीत गोवामुक्ती संग्रामावर लिहिलेला लेख पणजीतल्या दैनिक 'गोमंतक'चे संपादक नारायण आठवले यांनी छापला होता.

 

पोर्तुगीजांची वसाहत असणाऱ्या गोव्याच्या मुक्तीसाठी १९५५ साली गोव्यात आपला ऐतिहासिक सत्याग्रह करण्यापूर्वी समाजवादी नेते श्री. ना. . उर्फ नानासाहेब गोरे यांनी त्यावेळच्या गोव्यातील पोर्तुगीज गव्हर्नर जनरलला एक पात्र लिहिले होते. गोव्यात सत्याग्रह करण्यामागील आपली भूमिका त्यांनी या पत्रात  स्पष्ट केली होती. आमच्या या कृतीने तुमची सत्ता मोडेल असे मानण्याचे असे मानण्याचे अतिरेकी धाडस आम्ही करत नाही अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली होती पण या वाक्याला जोडूनच त्यांनी लिहिले होते.

परंतु आमच्या प्रयत्नांचा काहीच परिणाम होणार नाही असे मात्र आम्हाला वाटत नाही. गोव्याच्या लढ्यात आम्ही (गोवेकर सोडून इतर भारतीय) सहभागी केल्यामुळे गोवा आणि भारत यामधील कृत्रिम सरहद्दीच्या दोन्ही बाजूस राहणारे लोक शास्वत बंधुप्रेमाने एकत्र येतील. शाश्वत बंधुप्रेमाने एकत्र येतील. शिवाय ज्यांचा भविष्यकाळ सध्या पोर्तुगालच्या हातात आहे. त्यांच्या स्वातंत्र्याची सुप्रभात उगवण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल. 

पारतंत्र्याच्या बेडीतुन गोव्याची मुक्तता करण्यासाठी या पोर्तुगीज वसाहतीवर निःशस्त्र स्वारी करणाऱ्या या सत्याग्रहींस चुकूनही कल्पना आली नसेल कि पत्रातील वरील उतारा एक भविष्यवाणी ठरून त्यानंतर केवळ सहा वर्षातच गोव्यातील ४५० वर्षाची पोर्तुगीजांची सत्ता कोलमडून पडेल पण अखेर असेच घडले. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या आदेशानुसार भारतीय सेनेने गोव्यात प्रवेश केला आणि जवळजवळ कुठल्याही प्रतिकाराविना गोवा १९ डिसेम्बर १९६१ साली मुक्त झाला.

कारवार येथे १९५४ साली भरलेल्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे श्री. नानासाहेब गोरे अध्यक्ष होते. पारतंत्र्यात असलेल्या पंतकालीन मराठी साहित्यिकांची तोपर्यँत गोमंतकाबाहेरच करत असत. यापुढील गोमंतकीय मराठी साहित्य संमेलन गोव्यातच व्हावे अशी इच्छा नानासाहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली अन यातूनच गोवा मुक्तीसाठी भारतीयांनी गोवेकरांच्या खांद्यास खांदा लावून लढा उभारण्याची कल्पना जन्मास आली.

पुण्याला परतल्यानंतर नानासाहेबांनी आपले समाजवादी दिवंगत एस. एम. जोशी यांची घेतली आणि गोवा मुक्तीसाठी गोव्यात प्रवेश करून तेथे सत्याग्रह करण्याचा आपला मनोदय व्यक्त केला. एसेम  यांनी सत्याग्रहाच्या कल्पनेचे स्वागतच केले. पण त्याचवेळी पोर्तुगीजांच्या वसाहतीत स्वातंत्र्यासाठी अगदी शांततामय सत्याग्रह करणेही किती धोकादायक आहे याची मला स्पष्ट कल्पना दिली. जुन्या आठवणींना

ब्रिटिश आणि पोर्तुगीज राज्यकर्त्यांमध्ये हाच फरक होता. गोव्यातील आपल्या सत्येला आव्हान देणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला मग ती सशस्त्र असो व निशस्त्र पोर्तुगीज राज्यकर्ते दीर्घ कारावासाची शिक्षा देत असत. अनेक स्वतंत्रसैनिकांनी या लढ्यात तर प्राणही गमावले होते.

गोवा मुक्तीसाठी त्या काळात पुण्यात स्थापन झालेल्या गोवा डमोचन सहायक समितीचे नानासाहेब एक कार्यवाह होते. या समितीतर्फे गोव्यात पाठविण्यात येणाऱ्या भारतीय सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीचे नेते म्हणून नानासाहेबांची निवड करण्यात आली. समितीतर्फे १५ ऑगस्ट १९५५ साली गोव्यात सामुदायिक सत्याग्रह आयोजित करण्याचा निर्णयही येवेळी घेण्यात आला होता. गोवा मुक्तीसाठी गोव्यात आणि गोव्याबाहेर कार्यरत असलेल्या गोवा नॅशनल काँग्रेसने त्यावेळेस श्री. नानासाहेब गोरे याना त्यांच्या सत्याग्रहप्रित्यर्थ निरोप देण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा आयोजित केली होती. आचार्य अत्रे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. श्री. पीटर अल्वारीस त्रिस्तव बॅगांझा कुर्हा वगैरे जेष्ठ गोवा स्वात्यंत्रसेनानाची याप्रसंगी भाषणे झाली होती.

नानासाहेबांच्या सत्याग्रहाच्या तुकडीने पुण्याहून गोव्याच्या दिशेने १२ मे १९५५ रोजी प्रस्थान केले. वयोवृद्ध स्वतंत्रसेनानी सेनापती बापट हेही या तुकडीत सहभागी झाले होते. सत्याग्रहींची संख्या सुरुवातीस ३२ होती तर वाटेत आणखी  व्यक्ती या तुकडीत सामावून सत्याग्रहींची संख्या ६८  पर्यंत पोहोचली. यापैकी चार सत्याग्रही गोमंतकीय होते. ५३ महाराष्ट्रीयन होते. ३ उत्तर प्रदेशचे आणि राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यातील प्रत्येकी एक व्यक्ती होती. या सत्याग्रह मोहिमेचे वर्णन करताना नानासाहेब म्हणतात, गोव्यापर्यंतच्या आमच्या प्रवासात आम्हा सत्याग्रहींचे जयसिंगपूर कोल्हापूर, बेळगाव आणि इतर ठिकाणी उत्साहाने स्वागत करण्यात आले. गोवा मुक्तीविषयी भारतीयांच्या भावना इतक्या तीव्र असतील अशी कुणी कल्पनाही केली नव्हती. भारत छोडो ये १९४२च्या चळवळीत निर्माण झालेल्या वातावरणासारखीच परिस्थिती येवसलीही आम्हाला दिसून आली.   

आपल्या सत्याग्रहातील भूमिका स्पष्ट करताना नानासाहेबांनी गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नर जनरलला लिहिले होते, ज्या परिस्थितीत गोवा, दमण बी दिवला भारतात विलीन होणे शक्य होईल ती परिस्थिती निर्माण व्हायला आम्ही सत्यभूत होऊ इच्छितो ज्याप्रमाणे शंभराहून अधिक वर्षे ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले म्हणून आमचा देश ब्रिटिश होऊ शकला नाही. त्याचप्रमाणे या टीचभर तुकड्यावर तुम्ही कितीतरी वर्षे राज्य केले म्हणून तो प्रदेश पोर्तुगीज होऊ शकत नाही. आम्हाला माहित आहे कि गोवा-दमण-दिवच्या जनतेला तुमचे स्वामित्व नको आहे तुमच्या स्वामित्वाविरुद्ध ती बंद करून उठली आहेत आणि त्या लोकांचे आम्ही (गोवेकराव्यतिरिक्त इतर भारतीय) भाईबंद असल्यामुळे त्यांना स्वतंत्र मिळविण्याच्या बाबतीत मदत करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. गोव्याच्या लोकांनी तुमच्या प्रशासकीय दहशतीविरुद्ध दीर्घकाळ लढादिलेला आहे आणि आपले रक्त सांडले आहे. जर या विषम, कठोर संघर्षात आम्ही स्तब्धपणे बघ्याची भूमिका घेतली आणि तुम्ही करीत असलेली पाशवी हिंसा अविरतपणे चालू दिली तर भावी पिढ्या आम्हाला अपराधी ठरवतील. या पात्राची एक प्रत पंतप्रधान पंडित नेहरू याना पाठविण्यात आली होती.

या सत्याग्रहींच्या तुकडीचे स्वागत गोव्यात डिचोलीजवळ सशस्त्र पोर्तुगीज पोलिसांनी केले. नानासाहेब, सेनापती बापट यांच्यासह सर्व सत्याग्रहींना  यावेळी बेदम मारहाण करण्यात आली. नानासाहेब वगळता इतर सर्व सत्याग्रहींना नंतर गोव्याच्या सरहद्दीबाहेर नेऊन सोडण्यात आले. नानासाहेबांची तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्यांच्यानंतर गोव्यात सत्याग्रहींच्या तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या श्री. शिरूभाऊ लिमये, श्री. जगन्नाथराव जोशी, श्री. मधू लिमये, खासदार श्री. किडीबकुमार चौधरी या सर्वांवर लष्करी न्यायालयात खटला भरण्यात आला. यापैकी बहुतेक नेत्यांना दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. परंतु अम्नेस्टी इंटरनॅशनलमुळे अडीच वर्षानंतर त्यांची मुक्तता करण्यात आली.

केवळ  स्वातंत्र्याचे  नारे लागवल्याबद्दल निशस्त्र सत्याग्रहींना दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा मिळाल्याच्या वृत्ताने त्यावेळेस भारतात मोठी खळबळ निर्माण झाली होती. या शिक्षेची बातमी कळताच माझ्या आई वडिलांना धक्काच  बसला. माझी आणि त्यांची पुन्हा कधीही भेट होणार नाही असेच त्यांना वाटले, असे नानासाहेब म्हणतात. नानासाहेबांना दहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा फर्माविण्यात आली तेव्हा त्यांच्या वडिलांचे वय ८२ वर्षाचे होते.  

नानासाहेब तुरुंगात असताना त्यांना कोणत्या प्रकारची पुस्तके वाचण्यास आवडतात अशी विचारणा पंतप्रधान नेहरूंनी नानासाहेबांच्या पत्नीकडे केली होती. त्यानंतर पंडितजींनी पुस्तकांचा एक गठ्ठा नानासाहेबांना पाठविण्याची व्यवस्थाही केली. पण हि पुस्तके माझ्या तुरुंगाच्या कोठडीत कधीच पोहोचली नाहीत. नानासाहेबांनी हसत हसत सांगितले.

नानासाहेबांची तुरुंगातून मुक्तता झाली तेवढा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने जोर घेतला होता. या काळात झालेल्या निवडणुकीत नानासाहेब पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. लोकसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात नानासाहेबांनी गोवा मुक्तीचा विषय उपस्थित केला होता.

या काळात भारत सरकारने लष्करी कारवाई करून गोवा मुक्त करावा यासाठी राष्ट्रवादी मंडळ सरकारवर सतत दबाव आणत होती. त्यावेळी पंतप्रधान नेहरू श्री. पीटर अस्वारीस, बॅरिस्टर पै आणि श्री. गोरे यांच्याशी प्रश्नावर चर्चा केली, गोवा मुक्त करण्यासाठी गोमंतकीय नागरिक पोर्तुगीज सरकारविरुद्ध तीव्र करू शकतील काय असा प्रश्न पंडितजींनी या बैठकीत आम्हाला विचारला. पण अहिंसा, सत्याग्रहासारख्या आंदोलनांनी पोर्तुगीजांवर दबाव आणण्याचे कधीच मागे गेला आहे आता एकाच पर्याय राहिलेला  आहे म्हणजे लष्करी कारवाई असे मी पंडितजींना दिले असे श्री.  म्हणतात .   लष्करी कारवाईच्या आमच्या सल्ल्यानेच पंडितजींनी नंतर कारवाई केली असा दावा मी करत नाही. पण यानंतर वेळोवेळी घेतल्या भूमिकेवरून कारवाईचा त्यांनी ठाम निर्णय होता हे स्पष्ट झाले व पोर्तुगीज शासनालाही ह्याची स्पष्टता आली होती. श्री. गोरे पुढे म्हणतात.

स्वातंत्र्यसैनिकांचा सशस्त्र निशस्त्र उठाव, आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिष्टाई वगैरे सर्व प्रयत्नानंतरही पोर्तुगीजांनी सोडण्यास नकार दिला. नेहरुंच्या आदेशावरून भारत, गोवा, दमण आणि दिवमध्ये केला अन गोवा स्वतंत्र झाला. गोव्याच्या मुक्तीसाठी हुतात्मा सांडलेले रक्त आणि स्वातंत्र्य श्रम वाया गेले नाही अन ४५० प्रदीर्घ काळानंतर गोवा पुन्हा भारत भूमीशी संलग्न झाला. 

Friday, October 23, 2020

सामाजिक चळवळीतील - डॉ. बाबा आढावांचे योगदान

 

सामाजिक चळवळीतील - डॉ. बाबा आढावांचे योगदान

 डॉ. बाबा आढाव म्हणजे समाजातील दुर्बल आणि शोषित घटकांचा अन्यायाविरुद्धचा लढा असे जवळजवळ समीकरणच बनले आहे. कुठेही अन्याय घडून आल्यास त्याविरुद्ध संघर्ष करण्यासाठी तरुणाच्या उमेदीने उभ्या राहणाऱ्या बाबाची कामगिरीही तशीच आहे.

सडपातळ बांध्याच्या, जाड्याभरड्या खादीचे कपडे वापरणाऱ्या आणि पुण्यातील महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या छोटेखानी कार्यालयात हमाल पंचायतीच्या सदश्यांशी बोलताना बाबाना पहिले म्हणजे महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी चळवळीत एक भरीव योगदान करणारी व्यक्ती ती हीच यावर विश्वास बसत नाही. समोर बोलणारी व्यक्ती मग टिम्बर मार्केटमध्ये काम करणारी हमाल असो वा समाजातील एखादी मान्यवर व्यक्ती असो बाबांच्या चेहऱ्यावर बोलताना नेहमीच स्मितहास्य खेळत असते. १९५२ साली अन्नधान्य भाववाढीविरोधी सत्याग्रहात बाबानी भाग घेतल्याबद्दल त्यांना तीन आठवड्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यावेळी हा तरुण अन्यायाविरुद्धच्या लढ्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहून टाकील याची कल्पना कुणालाही आली नसणार त्यानंतर म्हणजे गेल्या चार दशकात प्रभाव असणाऱ्या डॉ. बाबा आढावांनी अन्यायाविरुद्धच्या संघर्षात कोणतेही क्षेत्र वर्ज्य मानलेले नाही. एक गाव, एक पाणवठा सारखी अस्पृश्यता निर्मूलन मोहीम, देवदासींच्या पुनर्वसनाची मोहीम हमाल - माथाडी आणि फूटपाथवर माल विकून पॉट भरणारे कष्टकरी घटकांचे संघटीकारण, मुस्लिम आणि दाऊदी मोहरा

पंढरपूर येथे शासकीय खर्चाने दरवर्षी होणारी विठोबाची पूजा १९७१ साली बंद पडण्यास बाबानी शासनाला भाग पडले होते. भारताच्या निधर्मी धोरणाशी हि शासकीय पूजा सुसंगत नाही असं बाबांचे म्हणणे. मात्र पुढे श्री. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर हि प्रथा पुन्हा सुरु करण्यात येऊन पुरोगामी चळवळीची काही प्रमाणात पीछेहाट झाली याचे बाबाना अजूनही वैषम्य वाटते. संतांनी समतेची पताका उभारून सर्व समाजास एकसंघ बनविण्याचा प्रयत्न केला असतानासुद्धा विठोबाच्या दर्शनास जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंड्यामध्ये अस्पृश्यांसाठी वेगळे पथक ठेवण्याच्या प्रथेसही बाबानी तीव्र विरोध केला.

बाबांच्या पुढाकाराने १९७४ साली कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे पहिली देवदासी परिषद भरविण्यात आली. तेव्हापासून धर्माच्या नावावर चालणाऱ्या या अमानुष प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी बाबांनी  मोलाची कामगिरी पार पाडली आहे. एक धार्मिक प्रथा या गोंडस नावाखाली महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमाभागातील बालिकांना वेश्या व्यवसायास लावणाऱ्या या प्रथेस दोन्ही राज्य सरकारांनी पूर्णतः आळा घालून या प्रथेचे बळी ठरलेल्या महिलांचे पुनर्वसन करावे.      

त्यांच्या होणाऱ्या मानहानीचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी बाबा गडहिंग्लज परिषदेतील एका देवदासींच्या छोट्याश्या भाषणाचा दाखल देतात. गौराबाई हि देवदासी या परिषदेत बोलण्यासाठी दोन्ही हात जोडून उभी राहिली पण तिचे भाषण दोन-तीन वाक्यापुरतेच मर्यादित राहिले. बाबांनो तुम्ही आम्हाला मे-बहिणी म्हणून संबोधले आणि यातच आम्हाला सर्व काही मिळाले. असे म्हणून हि देवदासी मटकन खाली बसली. पुरुषांच्या फक्त कामुक अथवा हेटाळणीच्या नजरेची सवय झालेल्या या देवदासींना समाजाचा एक घटक आपल्याला सन्मानाने जगता यावे म्हणून पुढे येतो या जाणिवेनेच अपार आनंद झाला होता.

देवदासी प्रथा निर्मूलनाच्या चळवळीच्या निमित्ताने अनेक सभा-संमेलनातून मी या प्रथेवर कडक हल्ले चढविले आहेत. पण यापैकी एकही भाषण गौराबाईच्या त्या छोट्याश्या भाषणाइतके परिणामकारक नव्हते असे बाबा म्हणतात.

काही काळापुरता बाबांनी पक्षीय राजकारणातही वावर केला. १९६७ साली खेड मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्याआधी म्हणजे १९६३ साली ते पुढे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून निवडून आले होते परंतु आपल्या समाजवादी विचारसरणीशी तडजोड करण्याचे त्यांनी स्वीकारले नाही. त्यामुळे अंदाजपत्रकात झोपडपट्टी विकासासाठी पुरेशी आर्थिक तरतूद नाही या कारणावरून त्यांनी १९७१ मध्ये नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.

आणीबाणीच्या काळात लोकशाही पद्धतीने विरोध करण्याच्या सर्व पद्धतींवर देशात बंदी घालण्यात आली होती. या काळात दडपशाहीच्या भीतीमुळे सर्वच चळवळी एकदम थंडावल्या होत्या. त्यापैकी बाबानी पुण्यात झोपडपट्टी परिषद आयोजित केली. यावेळी भूमिगत असलेले व बाबांचे समाजवादी पक्षातील एकेकाळचे सहकारी श्री. जॉर्जे फर्नांडिस यांनी बाबांना आता सर्व जबाबदारी तुमच्या खांद्यावर असा संदेश पाठवला होता. झाले. त्याच रात्री बाबाना अटक करण्यात आली व येरवड्याच्या कारागृहात त्यांना दीड वर्षे ठेवण्यात आले.

आणीबाणी उठविण्यात आल्यानंतर इतर नेत्यांबरोबरच बाबांचीही तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. त्यानंतर समाजवादी पक्षाचे नव्यानेच स्थापन करण्यात आलेल्या जनता पक्षात विलीनीकरण करण्यात आले. पण बाबा जनता पक्षात गेले नाहीत. पक्षविरहित राहून समाजकार्य करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. जनता पक्ष सत्तेवर असतानासुद्धा झोपडपट्टीच्या प्रश्नावर बाबानी सत्याग्रह केला व तुरुंगवास पत्करला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी आणीबाणीनंतर आपली जातीयवादी भूमिका बदलली संघाचे परिवर्तन झाले अशी प्रकारचा प्रचार जनता राजवटीच्या काळात करण्यात येत होता. त्यावेळी बाबानी संघाचे परिवर्तन झाले. अशी प्रकारचा प्रचार जनता राजवटीच्या काळात करण्यात येत होता. त्यावेळी बाबानी संघाचे ढोंगबाजी आणि संघापासून सावध या पुस्तिका लिहून संघाचे पितळ उघडे पडण्याचा प्रयत्न केला होता. या दोन पुस्तिकांनी त्यावेळेस सगळीकडे प्रचंड खळबळ उडवून दिली होती.

आयुर्वेद वैद्यकशास्त्राची पदवी असणाऱ्या बाबा आढावांनी गोआ मुक्ती आंदोलनातही सहभाग घेतला. १९५५ साली त्यांच्या नेतृत्वाखाली एक शुश्रूषा पथक गोव्याच्या सीमेवर गेले होते. मराठवाडा विद्यापीठास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी झालेल्या आंदोलनातही ते अग्रस्थानी होते. १९७९ साली नामांतरप्रकारणी त्यांनी सत्याग्रहींचा लॉन्ग मार्च आयोजित केला होते. त्यावेळी त्यांना व इतर सत्याग्रहींना शासनाने रस्त्यावरच अडवून वीस दिवस तुरुंगात ठेवले होते.

महाराष्ट्र राज्य माथाडी महामंडळाचे  अध्यक्ष या नात्याने राज्यातील बाजारपेठ वाहतूक व्यवसाय सरकारी बसस्थानके येथे केम करणाऱ्या हमालांना संघटित करून त्यांचा न्याय मागण्यासाठी संघर्ष करण्याचे कार्य बाबा करत आहे. पुण्यातील हमाल कामगारांशी तर त्यांचे नाते जवळजवळ चार दशकांचे आहे. पुण्यातील हमाल पंचायतीचे हमाल भवन हे आज परिवर्तनाच्या आणि कष्टकरी जनतेच्या लढ्याचे एक प्रतीकच बनले आहे.

हमालांना संघटित करून बाबानी समाजातील अनेक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली आहे. प्रश्न महागाईचा असो अथवा सामाजिक न्यायाच्या हक्कासंबंधीचा असो, पुण्यातील हमाल व इतर कष्टकरी त्यासंबंधी आपले मत मांडण्यासाठी नेहमीच रस्त्यावर आलेले आहेत.

हमाल केमगार आणि इतर कष्टकरी जनतेपैकी बहुतेक जण निरक्षर असतात आणि त्यांना सामाजिक न्याय, स्वतःचे हक्क व आर्थिक पिळवणूक वगैरे संकल्पनांचे मुळीच ज्ञान नसते. त्यामुळे मोर्चा, निदर्शने वगैरे लढ्याच्या भाषेतूनच त्याने त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची आणि त्यांच्या स्वतःच्या हक्काची जाणीव करून देता येते, असे बाबा म्हणतात.

स्वतःचे श्रम विकून आपले पॉट भरणाऱ्या एका फार मोठ्या घटकास समाजात मनाचे स्थान पॅट नाही याचे बाबांना फार वैषम्य वाटते. वाहतूक व्यवसायातील व्यापाज्यानी स्वतःच्या वाहनांना ठेवण्यासाठी गॅरेज नाही म्हणून हि वाहने भर रस्त्यावर उभी केली तर कुणीच आक्षेप घेत नाही. मात्र एखाद्या गरीब पोटभरू व्यक्तीने ह्याच रस्त्यावर फळभाज्या व इतर वस्तू विकावयास सुरुवात केली तर पोलीस, नगरपालिका आणि इतर खात्यातील अधिकारी लगेच त्यांच्याविरुद्ध कारवाई करावयास पुढे येतात यामधील पक्षपाताची त्यांनी नेहमीच चीड व्यक्त केली आहे. एखाद्या गरीब आणि नाडलेल्या कष्टकरी व्यक्तीने छोट्याश्या वस्तूची चोरी केली तर तो एक मोठा गुन्हा मानला जातो. मात्र या कष्टकऱ्यास त्यांच्या सेवेबद्दल अत्यंत कमी मोबदला देऊन त्यांच्या श्रमाची राजरोसपणे होणाऱ्या चोरीची कुणीच का दखल घेऊ नये असा त्यांचा सवाल आहे.

मी स्वतः इज फुलेवाडी माणूस आहे. महात्मा फुल्यानी स्वतःच्या सामाजिक कार्याची स्रियांपासून सुरुवात केली. पण अजून स्रियांना अर्थव्यवस्थेत पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळालेले नाही. स्त्रीमुक्ती चळवळ आज फोफावते आहे. पण आजपावेतो तरी हि चळवळ कष्टकरी आणि दलित महिलांपर्यंत पोहोचली नाही याची खंत वाटते. असे बाबा म्हणतात.

सामाजिक न्याय आणि समता या तत्वांचे एक कट्टर पुरस्कर्ते बाबा आढाव गेले एक दशकभर मंडळ आयोगाचे समर्थन करत आहेत. सद्य अस्तित्वात असलेल्या सामाजिक असमतेचे निर्मूलन केल्याशिवाय सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे स्वप्न प्रत्यक्षात आणणे शक्य नाही व यासाठी सामाजिक दुर्बल घटकांना राखीव जागांचे सरक्षण मिळालेच पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे.

ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे अशी उच्च वर्गातील मंडळी राखीव जांगांच्या धोरणास विरोध करतात. बसमध्ये जागा मिळालेल्या सर्व व्यक्तींना वाटते कि, कंडक्टरने ताबडतोब डबल बेल वाजवून बस बसस्थानकावरून निघावी, बुसीमध्ये जागा न मिळाल्याने स्थानकावरील रांगेतच तात्काटलेल्या व्यक्तींचा या मंडळींपैकी कुणीच विचार करत नाही. मंडळ आयोगास विरोध करणाऱ्या व्यक्तीची असलीच मनोवृत्ती आहे असे बाबा म्हणतात.

 

 

 

Thursday, October 1, 2020

पंधरा वर्षांनंतर महाराष्ट्राने निवडला मुस्लीम खासदार

 



 विशेष लेख 

पंधरा वर्षांनंतर महाराष्ट्राने निवडला मुस्लीम खासदार

कामिल पारखे

पाच वर्षांपूर्वी औरंगाबादमधून एमआयएमतर्फे  महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्यावर इम्तियाज जलील यांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता, तसाच किंबहुना त्याहून अधिक मोठा धक्का त्यांनी यावेळी लोकसभेवर निवडून येण्याचा पराक्रम केल्यामुळे दिला आहे. जलील यांच्या रूपाने महाराष्ट्राने प्रदीर्घ काळाने म्हणजे पंधरा वर्षानंतर एक मुस्लीम नेता लोकसभेत पाठवला आहे.  याआधी काँग्रेसचे नेते अब्दुल रहेमान अंतुले कोकणातील त्याकाळच्या कुलाबा या मतदारसंघातून चार वेळेस लोकसभेला निवडून गेले होते.

औरंगाबादने  एक मुस्लीम आमदार देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून जपली आहे. १९८०च्या दशकाच्या अखेरीस औरंगाबादला लोकमत टाइम्समध्ये असताना या ऐतिहासिक शहराची मला ओळख झाली.  त्याकाळात डॉ. रफिक झकेरिया हे औरंगाबादमधील मोठे राजकीय प्रस्थ होते. अनेक शैक्षणिक संस्था त्यांनीं तेथे उघडल्या होत्या. आधुनिक औरंगाबादचे शिल्पकार असेही त्यांना संबोधले जायचे. याचकाळात मुंबईबाहेर  महाराष्ट्रात औरंगाबाद येथे पहिल्यांदाच शिवसेनेने आपले पाय रोवले. मोरेश्वर सावे या पक्षाचे औरंगाबादचे पहिले खासदार झाले आणि चंद्रकांत खैरे महापालिकेत नगरसेवक बनले.

सन  २००४च्या निवडणुकीत काँग्रेसने अंतुले याना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांत उभे केले होते.  या मतदारसंघात मुस्लीम मतदार मोठया संख्येने असल्याने आणि शिवसेनेकडून ही जागा जिंकून घेण्याचा त्यामागे उद्देश होता. मात्र अंतुले यांना येथील निवडणुकीच्या रिंगणात उभे केल्याने शिवसेनेला त्याचा फायदा झाला.. हिंदू आणि मुस्लीम मतांचे सरळसरळ ध्रुवीकरण होऊन त्यावेळी चंद्रकांत खैरे दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडले गेले.  अंतुले यांच्या सुदैवाने ते याचवेळी कुलाब्यातून निवडून आले आणि मग डॉ मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीही झाले !

एमआयएम यासारख्या धार्मिकतेचे राजकारण करण्याचे आरोप करून बदनाम ठरवलेल्या पक्षातर्फे इम्तियाझ जलील निवडून आले आहेत. एखाद्यास कानफाटक्या असे नाव देऊन नंतर त्याला वाळीत टाकण्याचा प्रकार केला जातो. एमआयएम ला अशाप्रकारची वागणूक इतर राजकीय पक्षांकडून आणि प्रसारमाध्यमांकडून दिली जात असतानाही पत्रकार असलेल्या इम्तियाझ जलील यांनी राजकारणात उडी घेण्यासाठी या पक्षाची निवड केली  या निवडीआधी त्यांनी नक्कीच भरपूर विचार केलेला असणार. राजकारणात आल्यानंतर एमआयएम चे नेते म्हणून त्यांनी प्रचंड टीकांचा भडीमार सहन केला आहे मात्र आपल्या कठीण परिश्रमाने क्रमाक्रमाने यशाची पायरी चढली आहे. आपल्या पाच वर्षांच्या राजकीय कारकिर्दित जलील यांनी महाराष्ट्रातील मुस्लीम जनतेचा चेहरा अशी ओळख कमावली आहे. अंतुले या लोकप्रिय, जनाधार असलेल्या नेत्याच्या निधनानंतर असा चेहरा लुप्त झाला होता.  आता संसदेवर निवडून गेल्याने जलील यांच्या कार्याचे क्षेत्र अधिकच व्यापक झाले आहे.

मात्र इम्तियाज जलील यांची लोकसभेवर निवडून येण्यास भारतीय संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने एका आगळेवेगळे वेगळे महत्त्व आहे.  याचे कारण म्हणजे अल्पसंख्य समाजाचे विशेषतः मुस्लीम समाजाचे विधानसभेतील आणि संसदेतील प्रतिनिधित्वात त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या तुलनेत गेल्या काही वर्षांत   सातत्याने घट होत आहे.

आपल्या देशात जातीच्या  आणि धर्माच्या आधारावरच उमेदवारी दिली जाते याचे कारण म्हणजे मतांची विभागणी आणि ध्रुवीकरण जातीनुसार आणि धर्मानुसार होत असते.  मुस्लिमांना उमेदवारी दिल्यास आपल्या विरोधी राजकीय पक्षाच्या ताटात विजय मिळवून देण्यासारखे आहे याचा अनुभव आणि धसका आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसने २००९ साली आझमभाई पानसरे यांना नव्यानेच निर्माण झालेल्या मावळ मतदारसंघांत उमेदवारी दिली आणि शिवसेनेचे गजानन बाबर याना मग धार्मिक ध्रुवीकरणाचा फायदा होऊन ते निवडून आले होते.  तेव्हापासून आजतागायत शिवसेनेने मावळ हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला आहे.

गेल्या काही वर्षांत काश्मिरसारखे काही  अपवादात्मक मतदारसंघ वगळता मुस्लीमांना उमेदवारी न देण्याचा धोरणात्मक निर्णय भाजपने घेतला आहे. अशा  अपवादात्मक काही जागांवर भाजपने २०१९ साली मुस्लिमांना उमेदवारी दिली होती, आणि त्यांच्यापैकी कुणीही विजयी झालेले नाही. भाजपच्या   या धोरणाचा मोठा फटका या समाजाला उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांत बसला आहे. मुस्लीमांना उमेदवारी न देता किंवा त्यांची मते न मागतासुद्धा आपण  सत्तेवर येऊ शकतो याचा सर्वप्रथम अनुभव भाजपने २०१४च्या निवडणुकीत घेतला. त्यामुळे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रातील सत्ताधारी पक्षाचा एकही मुस्लीम लोकसभा सभासद नाही असे घडले. यावेळच्या २०१९ च्या निवडणुकीमुळे आताही  दुसऱ्यांदा तीच परिस्थिती आहे. सुदैवाने काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समता पक्षांचे धोरण मुस्लिमांच्या विरोधी नसल्याने यावेळी लोकसभेतील मुस्लीम सदस्यांची संख्या गेल्या वेळच्या तुलनेने वाढून तेवीसवरून पंचवीसवर गेली आहे. या मुस्लीम खासदारांमध्ये  हैदराबादचे एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी आणि औरंगाबादच्या इम्तियाज जलील यांचा समावेश असणार आहे.

भारतातील लोकसंख्येत मुस्लिमांची  संख्या १४ टक्के आहे तर या समाजाची लोकसभेतील आजची संख्या त्यांच्या लोकसंख्येंच्या पाच टक्के आहे  

नूतन लोकसभेत या पंचवीस मुस्लीम सदस्यांमध्ये  सर्वाधिक म्हणजे पाच मुस्लीम खासदार तृणमूल काँग्रेसचे असणार आहे. काँग्रेसचे चार तर काश्मिरच्या  नॅशनल काँग्रेसचे, समाजवादी पक्षाचे आणि बसपाचे प्रत्येकी तीन मुस्लीम खासदार असणार आहेत.

————————–


Sunday, September 13, 2020

अभिनंदन, दहावीत बोर्डात पहिला आलास तू !

 अभिनंदनदहावीत बोर्डात पहिला आलास तू  !

कामिल पारखे 

कॅम्पस रिपोर्टर नात्याने  मे महिन्याचा अखेरचा आठवडा माझ्या दृष्टीने अगदी तणावाचा असायचाया काळात काही वर्षांपूर्वीच स्थापन झालेले गोवादमण आणि दीव एसएससी बोर्ड दहावीचा निकाल जाहिर करत असेत्यानिमित्त पणजीतल्या मांडवी हॉटेलात एसएससी बोर्डाच्या अध्यक्षांची पत्रकार परिषद एक वार्षिक सोहोळा असे.

त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होई.  दुदैवाने एसएससी बोर्डाची ही पत्रकार परिषद मला कधीच एन्जॉय करता आली नाहीयाचे कारण परीक्षेच्या निकालाची छापील प्रत हातात पडतात मला तातडीने ते हॉटेल सोडून बातमीसाठी बाहेर पडावे लागायचेतो दिवस म्हणजे माझ्या कॅम्पस रिपोर्टिंगचा वर्षातील सर्वांत अधिक कष्टाचाताणतणावाचा आणि अगदी व्यावसायिक तृप्ततेचाही असायचा



माझ्या कॅम्पस रिपोर्टींगचा हा कालावधी होता १९८१ नंतरचात्याकाळात गोवा बोर्डाचे एसएससीचे एकूण विद्यार्थी असायचे बारा हजारांच्या आसपास आणि बारावीचे विद्यार्थी असायचे चार हजार त्याकाळात महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही दहावीचा पूर्ण निकाल लिस्टसह सर्व दैनिके छापत असतविद्यार्थ्यांना नंतर त्यांच्या शाळेतून मार्कशीट्स दिली जात असतया  निकालाची तारीखही आधी जाहीर केली जात नसेनिकालाची प्रत हातात पडल्यानंतर मेरीट लिस्टमध्ये झळकलेल्या पहिल्या दहा विद्यार्थाना त्यावेळच्या गोवा   केंद्रशासित प्रदेशातील त्यांच्या शहरांत आणि गावांत जाऊनत्यांची मुलाखत आणि फोटो मिळवण्याची माझी जबाबदारी होतीसंपूर्ण गोव्यात फिरून संध्याकाळपर्यंत पणजीला नवहिंद टाइम्स कार्यालयांत येऊन डेडलाईन संपायच्या आत मला बातमी देणे भाग होते. 'संपूर्ण वर्षभरात या दिवशी एक दिवस तरी कामिल भरपूर,चांगले काम करत असतो," असे आमच्या इंग्रजी दैनिकाचे माझे मुख्य बातमीदार थोडे गंमतीने आणि अधिक तथ्य अशा शैलीमध्ये म्हणायचेयाचे कारण त्याकाळात मी नोकरीबरोबरच पदव्युत्तर शिक्षणही घेत होतो

त्या हॉटेलातून बाहेर पडताच आपल्या शबनम बॅगेत निकालाची प्रत टाकून मी ताबडतोब जवळचाच एक मोटारसायकल पायलट गाठत असे. ( मोटारसायकल पायलट ही प्रवासाची आगळीवेगळी सुविधा भारतात फक्त गोव्यातच आढळतेआपल्याकडे चौकाचौकात ऑटोरिक्षा स्टॅण्ड असतात तसे त्याकाळात जागोजागी मोटारसायकल पायलट आपल्या काळ्या-पिवळ्या मोटसायकलसह गिऱ्हाईकांची वाट पाहत असत.) पहिल्यादुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीच्या घरी जाण्यास प्राधान्य असेत्यानुसार म्हापसामडगावडिचोलीवॉस्को अशा ठिकाणी जायचे असे सांगून सुसाट वेगाने आम्ही निघत असू

गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांच्या गावी पोहोचल्यावर पहिल्यांदा मी त्यांच्या शाळेत जात असेतेथून त्या विद्यार्थ्यांचा निवासी पत्ता घेतल्यानंतर त्या मुलाचा /मुलीचा फोटो शाळेच्या दफतरातून उचकटून घेऊन मार्गस्थ होत असे१९८०च्या दशकात विद्यार्थ्यांचे फोटो त्यांच्याकडे वा त्यांच्या पालकांकडे असतीलच याची शाश्वती नसायची आणि पटकन फोटो काढून घेण्याची यंत्रणाही नव्हतीशाळेच्या रजिस्टरमध्ये चिटकवलेले विद्यार्थ्यांचे फोटो उचकटून आम्हा पत्रकारांनां देण्यास शाळांचे मुख्याध्यापक आणि इतर मंडळींनीही आधी आढेवेढे घेतले नाही याचे मागे वळून पाहताना मला आता विशेष कौतुक वाटते !

विद्यार्थ्यांच्या घरात पोहोचल्यानंतर होणारा सवाल-जबाब आणि त्यानंतरची प्रतिक्रीया अगदी स्मरणीय असे. 'नमस्कारमी नवहिंद टाइम्सचा बातमीदारगोवा दहावी परिक्षेत तू बोर्डात पहिला आला आहेसत्याबद्दल अभिनंदन ! "  त्यानंतर त्या घरात होणारे प्रथम विस्मयाचे आणि नंतर आनंदाचे चित्कारगडबड अनुभवण्यासारखी असेत्या कुटुंबात काही गोड पदार्थ खाण्याचा जाईकॅथॉलिक कुटुंब असल्यास त्या उन्हाळ्याच्या दिवसांत फ्रिजमधली थंडगार बीअर आणि केकचा आस्वाद  घ्यावा लागेतो पाहुणचार चालू असताना विद्यार्थ्यांची मुलाखत घ्यावी लागे.प्रश्न नेहेमीचेच म्हणजे पुढे काय करणार आणि होणार असे असायचे आणि त्यांची उत्तरेही एकाच पठडीतली  असायचीविशेष म्हणजे या सात-आठ वर्षांच्या काळात माझ्यावर कुणीही कधी अविश्वास दाखविला नाही वा माझे ओळखपत्रव्हिझिटिंग कार्ड विचारले नाहीमात्र प्रत्येक कुटुंबातला  पाहुणचार काही मिनिटांत आटपून मला उरलेली कामगिरी पूर्ण करण्यासाठी निघावे लागेदुसऱ्यातिसऱ्याचौथ्या क्रमांकांच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गावी जाऊन त्यांच्या घरी तोच उपक्रम असायचा.  काही वेळेस टॉप रँकरच्या घरी गेल्यावर तेथे घराला टाळे असायचेविद्यार्थी आपल्या कुटुंबियांसह सुट्टीसाठी मुंबईला वा दुसरीकडे गेलेला असायचाअशावेळी शाळेतून घेतलेला तिचा /त्याचा फोटो कामाला यायचा



संध्याकाळी उशिरा पणजीत ऑफिसांत पोहोचेपर्यंत पहिल्या दहा गुणवंतांपैकी दुसऱ्यासातव्या किंवा दहाव्या गुणवंताचा फोटो वा मुलाखत नसायचीअशावेळी नवहिंद टाइम्सचे जुळे भावंड असलेल्या नवप्रभा या मराठी दैनिकाच्या स्थानिक वार्ताहराने पाठवलेला फोटोमुलाखत माझी अब्रू वाचवायचीसर्व गुणवंताचे फोटो आणि मुलाखती छापण्यासाठी पणजीतील गोमंतक वा मडगावच्या राष्ट्रमत या दैनिकांशी आमची स्पर्धा असायचीशिवाय मिळालेला एक फोटो दुसऱ्यांशी शेअर करणे त्यावेळच्या वेळखाऊ ब्लॉक मेकिंगच्या जमान्यात अशक्य होते

त्यावेळच्या गोवादमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात गोव्यातील दहा तालुकेदमण तालुका आणि दीव तालुका आहि एकूण बारा तालुके समाविष्ट होतेयापैकी गुजरातपाशी असलेले दमण आणि दीव गोव्यापासून शेकडो कोस आहेत.केवळ पोर्तुगीजांचे गोवादमण आणि दीव या प्रदेशांवर डिसेंबर १९६१ पर्यंत राज्य होते केवळ याच कारणांमुळे हे तीन प्रदेश एकत्र होतेबाकी भौगोलिक व सांस्कृतिकदृष्टया त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नव्हताया केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्रीही दमण आणि दीव या तालुक्यांना क्वचितच भेट देत असत.  त्याकाळात दमण आणि दीव या ग्रामीण तालुक्यांतील एकही विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकला नाहीया यादीत तेथील विद्यार्थी झळकले असते तर गुणवत्ता यादीत त्यांचे केवळ नाव छापून असतेत्यांचे फोटो छापणे शक्यच नव्हते. (गोव्याला १९८६ला राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर दमण आणि दीवशी या प्रदेशाचा उरलासुरलेला संबंध संपला )     

दहावी आणि बारावीच्या बोर्डांच्या निकालांचे अशा प्रकारे सूप वाजल्यानंतर मी मोटारसायकल पायलटच्या खर्चाची बिले संपादकांच्या सहीसह अकाउंट्स खात्यांकडे जमा करीतेव्हा तेथे नेहेमीच तेच तेच सवाल-जबाब झडत असत. "एका दिवसात तीनशे रुपये प्रवास भाडे ?मोटारसायकल पायलट कशालाबसने जाता  आले नसते का?"  या प्रश्नाला काय उत्तर देणार?  त्याकाळात पालेकर वेतन आयोगानुसार माझा मासिक पगार पाचशे तीस रुपये होतामात्र संपादकांकडून बिल मंजूर झाले असल्यामुळे मला ती रक्कम मिळत असे,

काही दशकांपूर्वी महाराष्ट्रात एसएससी महामंडळाचे विभागवार  बोर्ड नसायचेत्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील राज्यस्तरीयप्रादेशिक आणि जिल्हा पातळीवरचे सगळे दैनिके संपूर्ण राज्याचा निकाल छापत असतत्यादिवशी या सगळ्याच दैनिकांच्या खपात  प्रचंड वाढ होत असे.  मात्र त्याकाळात बोर्डाचा दहावीचा निकाल तीस टक्क्यांच्या आसपास असे यावर आजच्या पिढीचा विश्वास बसणार नाहीबहुतांश विद्यार्थी गणित आणि इंग्रजी विषयांत गटांगळी खाऊन शिक्षणाचा नाद सोडत असतत्यामुळे पास झालेल्या फक्त तीस टक्केच विद्यार्थ्यांचे क्रमांक दैनिकांत छापले जायचे.

कालांतराने  विभागवार एससीसी बोर्ड स्थापन झालेआणि स्थानिक वृत्तपत्रांत फक्त त्या विभागाचा दहावी आणि बारावीचा निकाल छापून येऊ लागलाकाही वर्षांनंतर  परीक्षांचा पूर्ण निकाल दोन-तीन पानांत छापण्याची पद्धत  सर्वच दैनिकांनी बंद केली.

आज इंटरनेटच्या आणि मोबाईलच्या जमान्यात महत्त्वाच्या सर्व परीक्षांचा निकाल तो वेबसाईटवर अपलोड होताक्षणी कुठेही पाहणे शक्य झाले आहेबदलत्या तंत्रज्ञानाबरोबरच पत्रकारीतेचेही स्वरूप बदलत आहेचाळीस वर्षांपूर्वी टेलिग्राम हीच सर्वाधिक वेगवान संपर्क सेवा होतीत्या काळात बोर्डाचा दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यांनतर राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना सोळा-अठरा तासांच्या आत कळवण्यात वृत्तपत्रे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतदरम्यानच्या काळात तंत्रज्ञानात झालेल्या प्रचंड प्रगतीमुळे आज तशी गरजही राहिलेली नाही


---------------------


Camil Parkhe

Journalist, author, blogger 

Saturday, September 12, 2020

दीनानाथ दलालांची चित्रे

 

   दीनानाथ दलालांची ’ोहक चित्रे

 

चित्रकार दीनानाथ दलाल यांची कलाकृती पाहिली नाही असा ’ध्यवयीन ’राठी वाचक शोधूनही ि’ळणार नाही. दलालांची चित्रकलेतील कारकीर्द 1940 ते 1970 या दरम्यानची. तीन दशकांच्या या कालखंडात त्यांच्या कुंचल्याने कलेच्या विविध प्रातांत अ’ाप संचार केला, त्या’ुळे दान दशकांपूर्वी ’ृत्यू पावलेल्या या प्रतिभावान कलाकाराचा गाढा प्रभाव नव्या पिढीतील चिकारांवर अजूनही काय’ आढळतो.

दीनानाथ दा’ोदर दलाल हे ’ूळचे गोव्याचे. ’डगावात 30 ’े 1916 रोजी त्यांचा जन्’ झाला. चित्रकलेतील त्यांचे कौशल्य त्यांच्या लहानपणीच इतरांच्या निदर्शनास आले. असे सांगतात की, पोर्तुगीज राजवटीत शाळेत शिकत असताना छोट्या दीनानाथने हेड’ास्तरांचे चित्र रेखाटले. ते हुबेहुब रेखाटन पाहून हे चित्र तूच काढले काय असा प्रश्‍न हेड’ास्तरांनी दीनानाथास विचारला. त्या ’ुलाचे चित्रकलेतील कौशल्य पाहून कलाशिक्षणासाठी त्यास ’ुंबईस पाठवावे असा आग‘ह हेड’ास्तरांनी दीनानाथांच वडिलांना केला आणि दलालांचे ’ुंबईत आग’न झाले. एका प्रगल्भ चित्रकराच गौरवशाली कारकीर्दीची ती सुरूवात होती.

आपल्या कादकीर्दीच्या सुरूवातीस काही काळ दलाल यांनी एका चित्रपट जाहिरातीच्या संस्थेत का’ केले पण दीनानाथ दलाल एक चित्रकार म्हणून प्रसिद्धिस आले. ते चित्रा या साप्ताहिकाचे राजकीय व्यंगचित्रकार म्हणूनच. अनंत काणेकर आणि ’. गो. रांगणेकर या जोडगोळीने हे साप्ताहिक काढले होते. पण दलालांचे नाव ’राठी वाचकांच्या घरोघरी पोहोचविले ते ना. धों ताम्हणकरांच्या गोट्या या ’ालिकेने. या ’ालिकेसाठी दलालांनी सुरेख रेखाटन पुरविले होते. त्यानंतर दलालांनी अनेक ना’वंत ’राठी लेखकांच्या पुस्तकांना चित्रे पुरविली. ’ाणशी ’ाणसं, गावाकडच्य गोष्टी, बनगरवाडी ही त्यापैकी काही प्रसिद्ध पुस्तके.

आपल्या कारकीर्दीत म्हणजे 1940 ते 1971 पर्यंत या काळातील सर्वच ना’वंत ’राठी लेखकांच्या पुस्तकांना ’ुखपृष्ठे अथवा रेखाटने दलालांनी पुरविली. साने गुरूजी, ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक वि.स. खांडेकर आणि वि. वा. शिरवाडकर, कुसु’ाग‘ज, पु. ल. देशपांडे, रणजित देसाई अशी या नावांची यादी प्रचंडच आहे. त्याशिवायदलालांनी अनेक दिवाळी अंकांना ’ुखपृष्ठे पुरविली. हिंदीतील प्रसिद्ध व्यक्तींची व्यकित्चित्रेही अत्यंत प्रसिद्ध आहेत. ’हात्’ा गांधी, पंडित नेहरू, विनोबा भावे, स्वातंत्यर सावरकर ही त्यापैकी काही अत्यंत नावाजलेली व्यक्तिचित्रे.

दलालांच्या व्यक्तिरेखाटन शैलीने वाचकांना अत्यंत प्रभावित केले होते. लेखक शब्दरूपाने एखाद्या व्यक्तीचे वा प्रसंगाचे वर्णन करतो. त्या व्यक्तींना अथवा प्रसंगांना आपल्या कुंचल्याद्वारे आकार देऊन जिवंत करण्याची कि’या दलाल करीत. त्या’ुळेच या पुस्तकातील घटना आठवल्या म्हणजे आजही वाचकांच्या डोळ्यास’ोर ताबडतोब दलालांची चित्रे उभी राहतात.

दलालांनी आपल्या चित्रासाठी पौराणिक, ऐतिहासिक, सा’ाजिक आणि राजकी असे अनेक विषय हाताळले. दिवाळी अंकासाठी तसेच पुस्तकांसाठी ’ुखपृष्ठे पुरविणसाठी त्यांच्याकडे सतत प्रकाशकांची अन् लेखकांची ’ागणी असे. त्यांना भरपूर व्यावसायि य ि’ळाले, पण त्या’ुळे कलेकडे त्यांनी अजिबात दुर्लक्ष केले नाही. चिकार दलाल यांनी व्यावसायि कला आणि अभिजात कला या’धील दरी दूर केली हा त्यांचा सर्वात ’ोठेपणा असे नव्या पिढीतील चित्रकार आणि दलालांस गुरू ’ानणारे अनिल उपळेकर म्हणतात ते या’ुळेच.

चित्रकलेत अ’ाप लोकप्रिय आणि व्यावसायि य ि’ळविल्यानंतर दलालांनी चित्रकलेत नाना प्रकारची तंत्रे हाताळून पाहिली. नवनवे प्रयोग केले. दलालांच्या चित्रकलेचा अभ्यास असणार्‍यांना त्यांच्या कलेतील हा बदल, नवनवे प्रयोग विशेषतः 1960 सालानंतरच्या चित्रकलेत आडळून ेतो. दलालांनी सुरू केलेले दीपावली हे ’ासिकही त्या काळात, अत्यंत लोकप्रिय झाले होते.

वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी म्हणजे 1971 साली दलालांचा ’ृत्ू झाला. पण त्यांनी आपल्या’ागे अ’ूल्य कि’तीचा चित्रसंग‘ह ठेवला. दलालांच्या चित्रकलेने प्रेरित झालेली चित्रकाराची एक पिढी आज निर्’ाण झाली आहे. या ’हान चित्रकाराच्या पंचाहत्तराव्या जन्’दिनानिि’त्त वर्षी वेगवगळ्या शहरात त्यांच्या निवडक चित्रांची प्रदर्शने आयोजित केली जात आहेत. दलालांच्या चित्रकलेशी दोन पिढीतील ’राठी वाचकांचा अत्यंत जवळून संबंध आलेला आहे. त्यांच्या चित्रप्रदर्शनाच्या निि’त्ताने या चित्रांशी निगडीत असलेल्या आठवणींना निश्‍चितच उजाळा ि’ळेल.