Showing posts with label Catholics. Show all posts
Showing posts with label Catholics. Show all posts

Thursday, November 27, 2025

रेस कोर्सनजिक असलेल्या सेंट पॅट्रिक्ट्स कॅथेड्रल्समध्ये जाऊन पुण्याचे नवनिर्वाचित बिशप फादर सायमन अल्मेडा यांची आज सकाळी सदिच्छा भेट घेतली.

महाराष्ट्रातील एक महत्त्वाच्या असलेल्या आणि दिडशे वर्षांचा इतिहास असलेल्या पुणे कॅथोलिक धर्मप्रांताचे किंवा डायोसिसचे ते आठवे बिशप असतील.
पुणे डायोसिसची स्थापना १८८६ साली झाली होती. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत धर्मप्रांताचे पहिले दोन बिशप जर्मन होते.
कॅथोलिक धर्मप्रांताचे बिशप या पदाचे महत्त्व आणि अधिकार चर्चबाहेरच्या इतरांना सहसा माहित नसतात.
बिशप हे त्यांच्या डायोसिसमधील असलेल्या सर्व धर्मप्रांतीय शैक्षणिक संस्था - शाळा-कॉलेजेस, दवाखाने, सामाजिक आणि धर्मादाय संस्था यांचे व्यवस्थापकीय प्रमुख असतात.
आताच्या पुणे डायोसिसमध्ये पुणे, सातारा, सोलापूर, सांगली महसूल जिल्हे आणि कोल्हापूर शहर यांचा समावेश होतो.
एके काळी म्हणजे बिशप व्हॅलेरियन डिसोझा यांच्या कारकिर्दीच्या काळात १९८७ पर्यंत पुणे धर्मप्रांतात उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबारपासून कोकणातील रत्नागिरीपर्यंतचा भाग समाविष्ट होता.
गेल्या काही दशकांत नाशिक आणि नंतर सिंधुदुर्ग नवे धर्मप्रांत निर्माण झाल्याने पुणे धर्मप्रांताचे क्षेत्र कमी झाले आहे.
बिशप जॉन रॉड्रिग्स यांची मुंबई सर्वधर्मप्रांताचे आर्चबिशप म्हणून निवड झाल्याने हे पद गेले एक वर्षभर रिक्त होते.
त्याआधी थॉमस डाबरे वयाची पंच्याहत्तरी पूर्ण होईपर्यंत पुण्याचे बिशप होते.
प्रत्येक कॅथोलिक व्यक्तीचा त्यांच्या आयुष्यात किमान एकदा तरी बिशपांशी संपर्क आलेला असतोच.
याचे कारण कन्फर्मेशन किंवा दृढीकरण हा स्नानसंस्कार (सांक्रामेंत ) देण्याचा अधिकार केवळ बिशपांना असतो.
काही वर्षांपूर्वी फादर सायमन अल्मेडा आमच्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर चर्चचे पाच वर्षे धर्मगुरु होते.
कॅथोलिक चर्चच्या अखत्यारीतल्या चर्चमधील धर्मगुरूंची आणि शाळांच्या प्राचार्यांची ठरविक काळानंतर बदली होत असते.
कॅथोलिक चर्चचे जगभर पसरलेले जाळे, या चर्चच्या विविध संस्थांचे विविध समाजघटकांत चालू असलेले कार्य आणि या चर्चचे व्यवस्थापन हा एक स्वतंत्र अभ्यासाचा आणि अतिशय कुतूहलाचा विषय आहे.
चर्चसारखे नेटवर्क असलेली जगात इतर कुठलीही संस्था वा संघटना नसावी.
फादर सायमन अल्मेडा यांच्या बिशपपदाची घोषणा पोप लिओ चौदावे यांच्याकडून व्हॅटिकन सिटीमधून, कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाकडून दिल्लीतून आणि पुण्यातील सेंट पॅट्रिक्स कॅथेड्रलमधून एकाच दिवशी आणि एकाच क्षणी व्हावी, त्या घोषणेवेळी चर्चबेलचा घंटानादही व्हावा, या घटनेतून चर्चच्या जागतिक नेटवर्कची थोडीबहुत कल्पना यावी.
मी स्वतः गोव्यात जेसुईट फादर होण्यासाठी काही वर्षे उमेदवारी केली असल्याने कॅथोलिक चर्चच्या कामकाजाची आणि नियमांची मला थोडीफार माहिती आहे.
नूतन वर्षांरंभात फादर सायन अल्मेडा यांचा बिशप म्हणून दीक्षाविधी होईल.
नवनिर्वाचित बिशपांना शुभेच्छा !

Camil Parkhe


Friday, January 17, 2025

गोव्यातील ख्रिश्चनांची संख्या गेल्या काही वर्षां\त झपाट्याने कमी असून याबाबत गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिलाई यांनी केरळमध्ये एका कार्यक्रमात बोलताना चिंता व्यक्त केली आहे.

याच वाक्याच्या उत्तरार्धांत महनीय राज्यपालांनी जे म्हटले तो खरा तर या देशात अनेकांच्या दृष्टीने खरा चिंतेचा विषय असू शकतो.
मात्र त्यांच्या वाक्याचा उत्तरार्ध हा माझ्या अभ्यासाचा विषय नाही, त्यामुळे तिकडे न वळता गोव्यातील ख्रिश्चनांची संख्या गेली काही वर्षे सातत्याने कमी का होत आहे हे पाहता येईल.
गोव्यातील ख्रिश्चन लोक या राज्यात कॅथोलिक म्हणूनच ओळखले जातात. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगीजांनी या छोट्या प्रदेशात सत्ता मिळवली तेव्हापासून पुढील काही काळ येथे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडून आले.
पोर्तुगीज आणि स्पॅनिश हे दोन्ही देश कॅथोलिकांचे बालेकिल्ले. या दोन देशातले साहसी दर्यावर्दी नवे जग शोधायला आपल्या नौका समुद्रात सोडल्या तेव्हा वसाहती मिळवण्याबाबत आणि तेथे ख्रिस्ती धर्मप्रसार करण्याबाबत या दोन राष्ट्रांत स्पर्धा होऊ नये म्हणून पोप महोदयांनी संपूर्ण जगाची या दोन राष्ट्रांमध्ये चक्क वाटणीच करून टाकली होती.
पाद्रुआदू आणि प्रोपोगांडा या नावाने जगाची स्पेन आणि पोर्तुगाल राष्ट्रांत विभागणी झाली होती.
पोर्तुगालच्या दर्यावर्दी वॉस्को दा गामा गोव्यात १४९८ साली पोहोचला आणि तेव्हापासून तिथे ख्रिस्ती धर्माचा म्हणजेच रोमन कॅथोलिक पंथाचा प्रसार झाला.
इंग्लंडच्या राजाने मूळ कॅथोलिक पंथापासून फारकत घेत स्वतःचे अँग्लिकन चर्च स्थापन केले होते. आजही इंग्लंडचा राजा अथवा राणी अँग्लिकन चर्चची प्रमुख असते नि या चर्चच्या सर्वोच्च धर्मगुरुची - आर्चबिशप ऑफ कँटरबरीची राजा किंवा राणीच करत असते.
इंग्लंडने स्वतःच्या वसाहती निर्माण केल्या, मात्र ख्रिस्ती धर्मप्रसार हे ईस्ट इंडिया कंपनीचे उद्दिष्ट्य कधीच नव्हते. त्यामुळे पोर्तुगीजांच्या अंमलाखालील भारतात गोवा, वसई, दमण, सिल्व्हासा येथे मोठ्या प्रमाणावर लोक कॅथोलिक झाले तसे ब्रिटिश इंडियात झाले नाही.
प्रोटेस्टंटपंथीय असलेल्या ब्रिटिशांनी ना प्रोटेस्टंट मिशनरींना ना कॅथोलिक मिशनरींना धर्मांतरासाठी प्रोत्साहन दिले. धर्मप्रसाराऐवजी त्यांनी व्यापारालाच प्राधान्य दिले.
दक्षिण गोव्यात कॅथोलिकांची संख्या लक्षणीय आहे, दोन अपवाद वगळता इथल्या मतदारांनी आतापर्यंत नेहेमीच कॅथोलिक उमेदवाराची लोकसभा खासदार म्हणून निवड केलेली आहे. मागच्या निवडणुकीत फ्रान्सिको सार्दिन्हा खासदार म्हणून निवडून आले होते. यावेळी २०२४ च्या निवडणुकीत कॅप्टन विरिएतो फर्नांडिस दक्षिण गोव्यातून लोकसभेला निवडून आले आहेत.
याच्या अगदी उलट स्थिती उत्तर गोव्याची आहे, तिथे हिंदू बहुसंख्य आहेत आणि गोवा, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाच्या (१९६१ - १९८६) आणि गोवा राज्यात इतिहासात इथून नेहेमीच हिंदू उमेदवार लोकसभेवर निवडला गेला आहे.
गोव्याची सध्याची डेमोग्राफिक म्हणजे लोकसंख्याबाबत स्थिती अशी आहे.
अगदी मध्ययुगीन काळापासून गोव्यातले लोक गोवा सोडून हिरव्या कुराणाच्या शोधार्थ इतरत्र जात होते. यात मात्र तेव्हापासून एक मूलभूत फरक होता आणि आजच्या काळातही हा फरक प्रकर्षाने दिसून येतो.
गोव्यातील एक ज्येष्ठ वकील क्लिओपात अल्मेडा कुटिनो यांनी पणजीतल्या `द नवहिंद टाइम्स ' या इंग्रजी दैनिकात गोवा राज्यपालांच्या विधानाच्या अनुषंगाने या विषयावर एक विस्तृत लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी विविध बाबींवर प्रकाश टाकला आहे.
गोव्यातील उच्च जातींतील म्हणजे सारस्वत रोमन कॅथोलिक सोळाव्या शतकापासूनच पोर्तुगाल आणि तेथून पोर्तुगालच्या इतर वसाहती देशांत किंवा युरोपातील इतर देशांत जात असत.
आधुनिक संमोहनशास्त्राचा जनक असलेल्या अँबे (फादर) फरिया यांनी रोम आणि फ्रान्समध्ये मोठे नाव कमावले, त्यांचा संमोहन करण्याच्या क्रियेतील पूर्णाकृती पुतळा पणजी येथे आदिलशाही पॅलेसजवळच आहे.
हे अबे फरिया आणि गोव्यातील इतर कॅथोलिक लोकांनी लिस्बन आणि पोर्तुगालमध्ये कार्य केले ते सर्व सारस्वत या वरच्या आणि उच्चभ्रु जातीतले.
फरिया हे मूळचे शेणवी किंवा शिनॉय, म्हणजे सारस्वत .
पोर्तुगालचे माजी पंतप्रधान अंतोनिओ कोस्टा यांचे घराणे मूळचे गोव्यातील मडगाव येथले. त्याच्या आजोबांनी गोव्यातून स्थलांतर केले होते.
गोव्यातल्या, तसेच दमण आणि दीव, दादरा, नगर हवेली इथल्या `काही' नागरिकांना, - सर्वांना नव्हे - पोर्तुगालचे नागरिकत्व आणि पासपोर्ट आजसुद्धा मिळू शकतो. मी वर नमूद केलेले प्रदेश एकेकाळी पोर्तुगालच्या वसाहती होत्या, पोर्तुगाल इंडियाचे भाग होते.
१९६१ पूर्वी या पोर्तुगीज इंडियात जन्मलेल्या लोकांना आणि त्यांच्या पुढच्या तीन पिढींतील लोकांना आजही पोर्तुगीज नागरिकत्व आणि पासपोर्ट मिळू शकते, पोर्तुगालच्या कायद्यानुसार तो त्यांचा एक हक्क आहे.
वंश प्रस्थापित करण्यासाठी पोर्तुगीज नागरिक म्हणून आवश्यक प्रमाणपत्रांसह पोर्तुगालमध्ये जन्माची नोंदणी केल्यास लिस्बनमध्ये एक दोन दिवसातच पोर्तुगीज पासपोर्ट कसा ऊपलब्ध होऊ शकतो
गोव्यातील कॅथोलिक अगदी सोळाव्या शतकापासून गोव्यातून स्थलांतरित होत असले तरी हे प्रमाण नगण्य होते. गेल्या दिडशे वर्षांत स्थलांतरितांची संख्या वाढून येथील लोकसंख्येत कॅथोलिकांचे प्रमाण कमी होत गेले आहे. याचा परिणाम साहजिकच या राज्यातील निवडणूक निकालांवर पडत गेला आहे.
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय जनमताच्या रेट्याला प्रतिसाद देत अखेरीस १९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय लष्कराकरवी कारवाई करून गोवा, दमण आणि दीव हा प्रदेश हा पोर्तुगीज सत्तेतून मुक्त करुन भारतीय संघराज्यात सामील केला.
त्यानंतर या केंद्रशासित प्रदेशाचे भवितव्य ठरवण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९६७ च्या जानेवारीत या प्रदेशात सार्वमत घेतले. भारतीय संघराज्याच्या इतिहासातील हे पहिलेच आणि आतापर्यंतचे एकमेव सार्वमत.
या सार्वमताद्वारे गोवा, दमण आणि दीव या जनतेने या प्रदेशाचे स्वतंत्र अस्तित्व असावे आणि गोवा महाराष्ट्रात आणि दमण आणि दीव गुजरातेत विलीन करू नये असा निर्णय दिला.
विशेष म्हणजे या चिमुकल्या प्रदेशाचे शेजारच्या राज्यांत विलीनीकरण टळले ते सार्वमताच्या अगदी काही थोडक्या मतांच्या टक्क्याने आणि या सार्वमतात कॅथोलिक लोकांनीं विलीनीकरणाच्या विरोधी जवळजवळ एकगठ्ठा मतदान करून गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व राखले.
गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे याबाबत ४५ टक्क्यांहून अधिक लोकांनी मतदान केले होते यावर आज कुणाचा विश्वास बसणार नाही.
गोव्याचे महाराष्ट्रात विलिनी व्हावे यासाठी गोवा, दमण आणि दीवचे मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि केंद्रीय मंत्रि यशवंतराव चव्हाण यांनीं जोरदार प्रचार केला होता.
गोव्यातील कॅथोलिक पोर्तुगाल किंवा पोर्तुगालच्या इतर वसाहतींत स्थलांतर होणे तसे साहजिकच होते अगदी त्याच प्रमाणे गोव्यातील अनेक हिंदू लोकांनी महाराष्ट्रात मुंबई, पुण्यात आणि इतरत्र स्थलांतर केले होते.
महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींची यादी पाहिली कि त्यामध्ये अनेक गोमंतकीय आहेत हे लक्षात येते.
गोवा, दमण आणि दीव पोर्तुगालच्या साडे चारशे वर्षांच्या सत्तेतून १९६१ साली मुक्त केल्यानंतर या प्रदेशातल्या पोर्तुगीज पासपोर्ट असणाऱ्या लोकांना भारतात राहण्याचा किंवा पोर्तुगालला जाण्याचा निर्णय घेण्याची सोय होती.
अनेकांनी मग साहजिकच पोर्तुगालची आणि त्यामार्गे इतर पाश्चिमात्य देशांची वाट धरली.
गोव्यातील कॅथोलिक लोकसंख्या गोवामुक्तीनंतरच्या काळात ३६ टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आली आहे असे आकडेवारीवरून दिसते. नजिकच्या काळात हे प्रमाण असेच घसरत जाण्याची शक्यता दिसत आहे.
रोमन कॅथोलीक पंथात संतती नियमनाची कृत्रिम साधने आणि गर्भपात यावर कागदोपत्री बंदी आहे. पण चर्च या नियमांकडे कानाडोळा करत असते आणि कॅथोलिक लोक सरळसरळ दुर्लक्ष करत असतात हे वास्तव आहे. ख्रिस्ती लोकांची गोव्यात आणि इतरत्र सुद्धा लोकसंख्या कमी होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.
इंडियन एक्सप्रेसने अलीकडेच म्हणजे २७ जून २०२३ ला पान एकवर अँकरची बातमी या विषयाला धरुन छापली होती. बातमीचा मथळा होता :
Of 70,000 surrendered passports in India in a decade, 40% were in Goa
गोव्यातील कॅथोलिक लोकांनी पोर्तुगालकडे आणि नंतर युरोपियन देशांत इतक्या मोठया संख्येनें स्थलांतर का केले याची अनेक कारणे आहेत.
एक म्हणजे रोजगार. पोर्तुगीज इंडियात उद्योगाची आणि रोजगाराची वानवाच होती. पोर्तुगीजमुळे इतर युरोपियन भाषा शिकणे अधिक सहजसाध्य, पाश्चात्य पेहेराव, खाद्य संस्कृती, ख्रिस्ती धर्म वगैरे अनेक बाबींमुळे लिस्बनकडे जाणाऱ्या जहाजाची वाट धरणे अधिक आकर्षक ठरले.
गोव्यातील हिंदूंच्या तुलनेत कॅथोलिक्स अधिक वेस्टर्नाइज्ड होते, अनेक कॅथोलिक कुटुंबांत पोर्तुगीजमध्ये संभाषण होई, त्यामुलें इंग्रजी शिकणे त्यांना तुलनेत सोपे जाई, त्यांची खाद्य, पेहेराव आणि धार्मिक संस्कृती पाश्चात्य धर्तीची होती.
पोर्तुगालच्या गोव्यातल्या जुन्या मुलखातील कॅथॉलिकांचे प्रमाण १७६४ साली तब्बल ८६ टक्के होते. या ओल्ड काँक्वेस्टमध्ये गोव्यातील बार्देझ, सालसेट किंवा साष्टी, इलिहास (पणजीजवळचा भाग) आणि मार्मुगावचा समावेश होता.
पोर्तुगीजांनी नंतर उत्तर गोव्यावर कब्जा मिळवला आणि तेव्हाच्या नव्या आणि जुन्या मुलखांतील पोर्तुगीज गोव्यातील कॅथॉलिकांचे प्रमाण १८५१ साली ६३.८ टक्के इतके कमी झाले.
याचे कारण उत्तर गोव्यात दक्षिण गोव्याच्या तुलनेत फारच नगण्य स्वरूपाचे ख्रिस्ती धर्मांतर झाले होते. दुसरे कारण म्हणजे दक्षिण गोव्यात दाट लोकसंख्या होती तर उत्तर गोव्यात लोकसंख्या तुलनेने विरळ होती.
गोव्यातील कॅथॉलिकांनी केवळ पोर्तुगालला स्थलांतर केले असे नाही, अनेक कॅथोलिक कुटुंबांनी मुंबईत आणि त्याकाळी भारतातच असलेल्या कराची येथे कायमचे स्थायिक होणे पत्करले.
स्थलांतर करताना यापैकी अनेकांनी आपल्या वडिलोपार्जित मालमत्ता कायमच्या विकून टाकल्या होत्या.
देशातले आणि मुंबईचे पहिले भारतीय बिशप म्हणून आणि त्यानंतर पहिले भारतीय कार्डिनल होण्याचा सन्मान मिळणारे व्हॅलेरियन ग्रेशियस यांचा जन्म कराची येथला. कार्डिनल ग्रेशियस यांचे कुटुंब मूळचे गोव्यातील मडगावजवळ असलेल्या नावेली गावाचे होते.
पोर्तुगालमध्ये घटनात्मक राजेशाही १८२० साली प्रस्थापित झाल्यानंतर गोव्यात उदारमतवाही प्रवाह सुरु झाला आणि ब्रिटिश इंडियाच्या सीमावर्ती भागांतील अनेक मराठी बोलणारे लोक उत्तर गोव्यात स्थायिक झाले.
ख्रिस्ती धर्मांतर आणि इतर कारणांमुळे गोव्यातून पलायन केलेल्या लोकांपैकी अनेक जण पुन्हा गोव्यात स्थायिक झाले. दरम्यान गोव्यातून कॅथॉलिक लोकांचे पोर्तुगालला आणि इतर ठिकाणी स्थलांतर चालूच राहिले.
गोव्यातील पोर्तुगीजांची सत्ता १९६१ साली संपली तेव्हा कॅथॉलिकांचे १८५१ साली असलेले ६३.८ टक्के प्रमाण थेट ३८. ०७ इतके म्हणजे ११० वर्षांच्या काळात २५. टक्क्यांनी खाली घसरले होते.
मी गोव्यात शिक्षणासाठी १९७०च्या दशकात पोहोचलो, तेव्हा माझ्या मित्रांचे आईवडील, इतर ज्येष्ठ मंडळी आपापसांत पोर्तुगीज भाषेत बोलत. त्यांच्यामुळे मीही या भाषेत थोडेफार बोलायला शिकलो. गोव्यातून पोर्तुगीज भाषा आता हद्दपार झाली आहे.
गोव्यात कॉलेजला शिकताना माझ्या बरोबर जेसुईट प्री- नॉव्हिशिएटमध्ये (पूर्व-सेमिनिरीत) राहणाऱ्या बेनी (बेनेडिक्ट) फरीयाने सज्ञान होण्याआधी पोर्तुगालला जाण्याचा निर्णय घेतला.
बेनीचा आणि लेस्टर फर्नांडिसचा पासपोर्ट पोर्तुगीज होते. मात्र वयाची एकवीस वर्षे पूर्ण होईपर्यंत पासपोर्ट न बदलता ते आणि त्यांची भावंडे भारतात राहू शकत होते. सज्ञान झाल्यानंतर मात्र त्यांना भारतीय पासपोर्ट घेणे भाग होते. त्याआधीच बेनी फरीयाची आणि लेस्टर फर्नांडिसची सर्व भावंडं पोर्तुगालला गेली.
लेस्टर फर्नांडिसने मात्र पोर्तुगालऐवजी गोव्यातच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्याने आपला पोर्तुगालचा पासपोर्ट परत करून भारतीय पासपोर्ट आणि नागरीकत्व स्वीकारला होता.
गोव्यातुन परदेशांत झालेल्या स्थलांतराविषयी २००८ साली फातिमा दा सिल्वा यांनी केलेल्या एका संशोधनातून स्थलांतरीत लोकांमध्ये ७४ टक्के कॅथोलिक होते ते दिसून आले होते.
ही सगळी आकडेवारी क्लिओपात अल्मेडा कुटिनो यांनी आपल्या लेखात दिली आहे.
इंग्लंडच्या तुलनेत पोर्तुगालने भारताच्या आणि आपल्या इतर वसाहतींतील लोकांना पोर्तुगालमध्ये आणि त्यानंतर इतर युरोपियन देशांत स्थायिक होण्यास मोठया प्रमाणात हातभार लावला आहे.
भारतात गोवा, दमन आणि दीव १९६१ साली सामील झाला, आजही १९६१ सालापूर्वी या पोर्तुगीज वसाहतीत जन्मलेल्या आणि त्यांच्या पुढील तीन पिढ्यांना पोर्तुगालचा पासपोर्ट आणि पर्यायाने पोर्तुगालचे नागरिकत्व सहज मिळू शकते.
विशेष म्हणजे गोव्याच्या मुक्तीनंतरही गोव्यातील अनेक लोकांकडे पोर्तुगालचेही पासपोर्ट म्हणजेच नागरिकत्वही होते. हा प्रकार अनेक वर्षे चालू राहिला होता.
मागील काही शतकांत गोव्यातील अनेक स्थलांतरित लोक जहाजांवर विविध नोकऱ्या करत असत, सणावाराला किंवा इतर कामांसाठी ते आपल्या मायभूमीकडे परतत असत.
पोर्तुगालचे पंतप्रधान असताना अंतोनिओ कोस्टा हे सुद्धा दोनदा गोव्याच्या भेटीवर आले होते.
गोव्यात मी जातो तेव्हा आल्डोना, वागातोर वगैरे अनेक ठिकाणी मोठमोठे कौलारीं बंगले आणि घरे झाकून ठेवलेली दिसतात.
परदेशांत स्थायिक झालेल्या आपल्या मालकांच्या किंवा त्यांच्या वंशजांच्या परतण्याची ही छोटीमोठी घरे वाट पाहत असतात. अनेकदा हे बंगले, घरे लँड माफियांच्या कारस्थानाला बळी पडतात.
तर अशा गोंयकारांच्या अनेक प्रॉपर्टीज गोव्यात असल्या तरी ते कायमचे परतण्याच्या शक्यता धूसर झाल्या आहेत.
अगदी अशीच परिस्थिती `इस्तादो दा पोर्तुगालचा' म्हणजे पोर्तुगीज इंडियाचा भाग असलेल्या गुजरातजवळील दमण येथे, दादरा नगर हवेली आणि सिल्व्हासा येथे आहे हे मी नेहेमी पाहत असतो.
गोव्याप्रमाणेच एकेकाळी पोर्तुगालच्या वसाहती असलेल्या पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात आणि तेथून जवळच असलेल्या गुजरातच्या सीमेनजिकच्या दमण आणि सिल्व्हासा येथेसुद्धा स्थानिक कॅथोलिक लोकांचे मोठ्या प्रमाणात पाश्चात्य राष्ट्रांत स्थलांतर होत आहे.
गोव्याप्रमाणेच वसईतसुद्धा अनेक ठिकाणी घरटी निदान एकतरी व्यक्ती किंवा जवळचा नातेवाईक युरोपात, अमेरिकेत, कॅनडात किंवा ऑस्ट्रेलियात असतो असे मी स्वतः अनुभवले आहे.
गोवा मुक्तीनंतरच्या काळात भारताच्या विविध राज्यांतून हिंदू, मुस्लीम आणि इतर धर्मियांनी या छोट्याशा राज्यात स्थलांतर केले आहे आणि यामुळे कॅथोलिक लोकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सतत कमी होते गेली आहे.
गोंयकारांचे प्रमाण कमी होण्याचे एक महत्वाचे कारण प्रचंड संख्येने बाहेरील राज्यातून इथे आलेले लोक. हल्ली रोजगारासाठी आणि मजुरीकरता बिहार, झारखंड, कर्नाटक आणि इतर राज्यांतून मोठ्या संख्येने लोक गोव्यात आलेले आहेत.
सिटी बसमध्ये प्रवास करताना हे सहज जाणवते.
गोव्यातील मूळ गोवन - गोमंतकीय असलेल्या - लोकांची संख्याही त्यामुळे घटत चालली आहे. निज गोंयकार आणि भायले अशा संज्ञा त्यासाठी वापरल्या जातात.
असेच चालू राहिले तर काही काळात गोव्यात कॅथोलीक लोकांचे प्रमाण दखल न घेण्याइतके नगण्य होऊ शकते.
यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी विनोद म्हणून सांगितलेला एक किस्सा सद्याच्या परिस्थितीवर झोत टाकतो.
उत्तर भारतातील अनेक लोक, विशेषतः दिल्लीतील अनेक व्यक्ती हल्ली गोव्यात कायमचे स्थायिक होत आहेत असे त्यांनी पणजी येथे झालेल्या एका कार्यक्रमात म्हटले आहे.
``हल्ली गोव्यात पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक संख्येने लोक राहत आहेत. दिल्लीतलय एखाद्या व्यक्तीला तुम्ही जर `दिल्लीतल्या कुठल्या भागात राहता?'' असे विचारले तर ती व्यक्ती म्हणते: '' मी अजूनमधून दिल्लीत येत असतो, कायमस्वरुपी मी गोव्यात राहतो!' ''
'' उत्तर भारतातील प्रत्येकाला गोव्यात राहायचे आहे. निवृत्त होणाऱ्या प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला गोव्यात स्थायिक व्हायचे असते.," असे त्यांनी म्हटले आहे.
गोवा भारताचा भाग असल्याने यात वावगे काहीच नाही, मात्र इतक्या मोठ्या संख्येने गोव्यात स्थायिक होणाऱ्या लोकांना सामावून घेणे गोव्याला शक्य आहे काय असा प्रश्न त्यांनी विचारला होता.
फोटो ओळी : अंतोनियो कोस्टा पोर्तुगालचे पंतप्रधान असताना आपल्या मायभूमीच्या भेटीवर गोव्यात २०१७ साली आले तेव्हाचा फोटो
Camil Parkhe,

Friday, July 24, 2020

Goa city bus travel



 गोव्यातील नवहिंद टाइम्स या दैनिकात खूप वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले ते व्यंगचित्र मला अजूनही आठवते. गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे त्याकाळात म्हणजे १९७७ साली मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले एक महाशय गोव्याच्या दाबोळी विमानतळावरील धावपट्टीवर ब्रिफकेस घेऊन पळत येत असतांना लांबूनच हात उंचावून 'राव रे!' असे म्हणतात आणि उड्डाणाच्या तयारीत असलेले ते विमान त्यांना घेण्यासाठी खरेच चक्क थांबते असे ते व्यंगचित्र होते. आदल्या दिवशी शिक्षणमंत्री राऊल फर्नांडीस या मंत्रीमहोदयांना विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाला तेव्हा त्यांनी त्यांचे आगमन होईपर्यंत विमानच रोखून धरले होते, या घटनेवर आधारित सुबोध केरकर यांनी काढलेले ते व्यंगचित्र होते.
धेम्पे कॉलेजात मी हायर सेकंडरीला असताना नवहिंद टाइम्सच्या पान एकवर प्रसिद्ध झालेले ते व्यंगचित्र मला आज चाळीस वर्षांनंतरही ठळकपणे आठवते. याचे कारण म्हणजे `राव रे' ( 'अरे थांब रे) असे कोकणी भाषेत सांगताच थांबणारे ते विमान म्हणजे गोव्याची खासियत असलेल्या खासगी सिटी बस सेवेवरची ती एक मजेदार टिपण्णी होती !
पोर्तुगिजांची सत्ता संपवून गोवा १९६१ च्या डिसेंबरात भारत संघराज्यात सामील झाला तेव्हापासून गोव्यामध्ये खासगी बस वाहतूक आहे. या खासगी बस वाहतुकीचा या व्यंगचित्राला संदर्भ होता. गोव्यातील या खासगी बस वाहतुकीचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही रस्त्यावर, एखाद्या टोंक रस्त्यावर म्हणजे तीन रस्ते मिळतात तिथे, चौकात किंवा अगदी रस्त्यापाशी असलेल्या तुमच्या घरापाशी थांबून तुम्ही 'राव रे!' अशी हाक दिली की नागमोडी रस्त्यावर कितीही वेगात असलेली ही खासगी बस तुमच्यासाठी हमखास थांबते.
गोव्याच्या बहुतेक सर्व खेड्यांत सर्व घरांची रचना रस्त्यालगत असते यामुळे हे सहजशक्य होते. प्रवाशांसाठी कुठेही आणि कितीही वेळेपर्यंत थांबणाऱ्या गोव्याच्या या बसबद्दल त्यामुळे अनेक गंमतीदार घटना होतात. उदाहरणार्थ, घरातून कुटुंबातील दुसरी व्यक्ती येईपर्यंत दारासमोर असलेली बस थांबून राहू शकते ! खरे म्हणजे 'राव रे' अशी साद देणारे कुणी प्रवाशी रस्त्यावर आहेत का याचीच बसचे ड्रायव्हर आणि कंडक्ट्रर असे दोघेही टेहेळणी करत असतात. आपल्या घराच्या दारापाशी रस्त्यावर सामान घेऊन बसची पाहत असलेले कुणीही लांबूनही प्रवाशी दिसले कि हाक नाही मारली तरी ड्रायव्हर सवयीने बसचा वेग कमी करुन त्या प्रवाश्यांपाशी थांबत असतो. तुम्हाला तुमच्या सामानासह आत घेतल्यानंतर, सामान ड्रायव्हरच्या शेजारच्या जागेत कोंबल्यावर बसचा कंडक्टर मग पिल्लुक मारतो (शीळ घालतो) आणि ड्रायव्हर मग बस पुढे नेतो. बसमधील कुणा प्रवाशानेही 'राव रे !' असे म्हटले की त्याच्या घरापाशी व इतर इच्छित स्थळी बस थांबते. प्रवाशी घेण्याचा आणि उतरविण्याचा हा सिलसिला बसचा अखेरचा स्टॉप येईपर्यंत चालू राहतो.
भारतातील ज्या मोजक्या राज्यांत आणि शहरांत खासगी प्रवासी सिटी बस वाहतूक चालते, त्यामध्ये गोव्याचा समावेश होतो. गोवा हे एक स्वतंत्र राज्य असले तरी या राज्याचा भौगोलिक आकार अगदी छोटा म्हणजे महाराष्ट्रातील अहमदनगरसारख्या मोठ्या जिल्ह्यासारखा असल्याने तेथील सातआठ शहरांत आणि गावोगावी धावणाऱ्या बसेस तशा सिटी बसेसच. यातील फार लांब पल्ल्यांच्या बसच्या प्रवासाचा म्हणजे पणजी ते मडगाव व वास्को ते पणजी यादरम्यानचा प्रवास साधारणतः एका तासाच्या आसपास असतो ! या दीर्घ आणि छोट्या पल्ल्याच्या बस वाहतुकीतून गोमंतकीय संस्कृतीचे एक आगळेवेगळे दर्शन घडत असते. गोव्यात शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण आणि नंतर नोकरीनिमित्त अनेक वर्षे वास्तव्य करूनही आजही या संस्कृतीचे दर्शन मला आकर्षित करत असते.
पणजी, म्हापसा, पोंडा, वॉस्को, काणकोण किंवा मडगाव शहरांत बसस्टँडवार तुम्ही पोहोचला की वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या बसचे कंडक्टर तुम्हाला 'पोणजे मार्केट, मिरामार- डोना पावला', 'पोरवोरीम-म्हापसा', 'मडगाव-पोणजे', 'ओल्ड गोवा-मंगेशी- पोंडा' वॉस्को -मडगाव ,असे ओरडत प्रवाशांना आकर्षित करत असतात. बस अगदी खचाखच भरल्याशिवाय बसस्टँड सोडत नाही आणि वाटेवरही प्रवासी घेतच राहते. प्रवाशांकडे सामान असले तर हे कंडक्टर ते सामान ड्रायव्हरच्या केबिनमध्ये ठेवण्यासही मदत करतात.
गोव्यामध्ये हिंदू आणि ख्रिस्ताव हे दोन प्रमुख समाज. त्याचे प्रतिबिंब बसमध्ये ड्रायव्हरच्या केबिनमध्ये दिसते. कधी बसमालक ख्रिस्ती असतो तर ड्रायव्हर हिंदू असतो किंवा याउलट असते. त्यामुळे येशू ख्रिस्त आणि मदर मेरीच्या फोटोबरोबरच ड्रायव्हरच्या पुढयात मंगेशाची किंवा साईबाबांची छोटीशी प्रतिमा किंवा पुतळा असतो. केबिनमध्ये अगरबत्तीचा वास दरवळत असतो. त्याचबरोबर शेजारच्या येशू आणि मदर मेरीच्या (सायबिणीच्या) आणि गोयंचो सायबा असलेल्या संत फ्रान्सिस झेव्हियरच्या फोटोंसमोरील वायरीने जोडलेली मेणबत्तीही कायम तेवत असते. यात कुणालाही विसंगती भासत नाही वा कुणाच्या धार्मिक श्रध्दाही दुखावल्या जात नाहीत !
गोव्यातील खासगी बस वाहतुकीसाठी पैसे मोजावे लागत असले तरी प्रवाशांना तिकिटे मात्र दिली जात नाहीत. प्रवाशांनी गच्च भरलेल्या बसमध्ये कंडक्टरची बस ड्रायव्हरशी संवाद साधण्याची खास कला अनुभवायलाच हवी. बसमध्ये या दारापासून तो दुसऱ्या दारापर्यंत जात तिकिटांचे पैसे गोळा करत कंडक्टर सारखे 'यो रे' 'चोल रे' 'वोस रे' असे बोलत ड्रायव्हरला सूचना देत असतो. एका हातात नोटा घेऊन दुसऱ्या हाताची दोन बोटे तोंडात घालून वेगवेगळ्या प्रकारची शीळ घालून कंडक्टर ड्रायव्हरला थांबण्याचे वा पुढे निघण्याचे इशारे देत असतो. असे सांकेतिक इशारे देण्यासाठी शिटी वापरणारा कंडक्टर क्वचितच दिसतो. त्याशिवाय अधिकाधिक प्रवाशी मिळवण्यासाठी बसच्या ड्रायव्हरची आणि कंडक्टरची दुसऱ्या बसशी सतत स्पर्धा चाललेली असते. पणजी-मिरामार -दोनापावला अशा छोट्या अंतराच्या मार्गांवर वीसपंचवीस प्रवाशांसाठी मिनीबस असतात , या बसमध्ये एकच कंडक्टर असतो, लांब पल्ल्याच्या बसमध्ये शक्यतो दोन कंडक्टर असतात.
गोव्यात बहिणीकडे सुट्टीसाठी एकटा गेलो की प्रवासासाठी माझी प्रथम निवड हे तेथील बससेवाच असते. गोव्यात अनेक वर्षे राहिल्याने तेथे गेल्यावर मी फार हिंडत नसतो. पणजी ते म्हापसा, ओल्ड गोवा-मंगेशी आणि क्वचित मडगाव आणि मिरामार-डोना पावला इथपर्यंत माझा प्रवास असतो. त्याशिवाय शाळेत शिकवणाऱ्या माझ्या बहिणीची बदली चार-पाच वर्षांनी दक्षिण किंवा उत्तर गोव्यातील ज्या गावी होईल तेथेही जाणे होतेच.
सत्तरच्या दशकात पणजी शहरातील मुख्य बसस्टॅण्डवरील बहुतेक मार्गावरील सिटी बससेवा संध्याकाळी सातला बंद व्हायच्या. संध्याकाळी सातनंतर गोव्याची राजधानी असलेली पणजी एकदम सामसूम व्हायची. त्यामुळे पुण्यातून पणजीला जाणारी महाराष्ट्राची स्टेट ट्रान्सपोर्ट एस टी बस पुणे स्टेशनहून पहाटे चारला निघायची. याचे कारण म्हणजे ही बस पणजीला सूर्यास्ताआधी म्हणजे सिटी बसवाहतूक बंद होण्याआधी पोहोचायला हवी. मी असा प्रवास दोनतीन वेळेस केलेला आहे. कलंगुट आणि बागा या समुद्रकिनाऱ्याला गेल्यानंतर तेथून संध्याकाळी पाचच्या आत म्हापशाच्या दिशेने बस पकडावी लागायची अन्यथा या बीचवर रात्रभर अडकून राहावे लागत असे, आणि त्याकाळी या समुद्रकिनाऱ्यावर हॉटेलसुद्धा नव्हती यावर आज अनेकांचा विश्वास बसणार नाही.
गोव्यात पर्यटनासाठी पहिल्यांदाच जाणाऱ्या लोकांना गोव्याची तोंडओळख करून घेण्यासाठी मी त्यांना दोन दिवसांच्या 'गोवा दर्शन' टूरमध्ये सहभागी होण्याचा सल्ला देत असतो. या दोन दिवसांत उत्तर आणि दक्षिण गोवा असे पूर्ण गोवा राज्यातील सर्व प्रमुख पर्यटनस्थळे, मंदिरे, चर्चेस, समुद्रकिनारे वगैरे प्रेक्षणीय स्थळे दाखविली जातात. पहिल्या भेटीतच लोक गोव्याच्या प्रेमात पडतात. त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या गोवा भेटीनंतर कुणाचाही अशा धावत्या दौऱ्याचा उत्साह कमी होतो आणि गोव्याची संस्कृती विविध अंगांनी पाहण्याची, अनुभवण्याची इच्छा निर्माण होते. अशा लोकांनी मग स्वतःच्या दुचाकीवर किंवा चारचाकीने गोवा भटकंतीवर अवश्य जावे. मात्र निदान एकदातरी गोव्यातील प्रवासी बसने हिंडायालाच हवे,असा माझा मित्रमंडळींना आग्रहवजा सल्ला असतो ! या बस प्रवासात गोव्याच्या संस्कृतीची अनेक रूपे दिसून येतात हे या माझ्या आग्रहामागचे मुख्य कारण असते.
आजकाल उबर आणि ओला टॅक्सीच्या जमान्यात दुसऱ्या शहरात सहसा कुणी सिटी बसने प्रवास करण्याच्या फंदात पडणार नाही. पण दुसऱ्या देशातील, शहरातील संस्कृती जवळून अनुभवण्यासाठी स्थानिक सार्वजनिक वाहतूक सेवेसारखा दुसरा पर्याय नाही. युरोपच्या दौऱ्यात असताना यासाठीच रोम शहरात मी कुटुंबासह सिटी बसने आणि ट्रॅमने प्रवास करायचो. 'व्हेन इन रोम, डू ऍज रोमन्स डू' या उक्तीनुसार हे वागणे होते. या बस आणि ट्रॅम प्रवासात रोमवासी काही वर्तनाच्या बाबतींत अगदी आपल्या भारतीयांसारखेच आहेत याचे काही गंमतीदार अनुभव मिळाले. पॅरीसमध्ये मेट्रोने प्रवास करताना गर्दी नसतानाही एका चोराने स्टेशनवर उतरताना आमचे पाकिट मारले आणि तिथल्या एका वेगळ्याच संस्कृतीची आम्हाला चुणूक दाखविली.
गोव्यात मी इतरांबरोबर असलो की या लोकांना मी हमखास बसचा एकतरी प्रवास घडवतो. दोन वर्षांपूर्वी `सकाळ टाइम्स'चे जुळे प्रकाशन असलेल्या गोमंतक टाइम्सच्या कामासाठी आम्ही काही जण सांत इनेजला गोमंतक भवन मध्ये उतरलो होतो. सकाळी तेथून १८ वा जून रस्त्याने चालत भाजीपाव आणि मिरचीभजे खाण्यासाठी आझाद मैदानापाशी गेलो आणि येताना त्यांना मी हॉटेल मांडवी येथून कला अकादमीपर्यंत बसने आणले.
धेम्पे कॉलेजात मी हायर सेकंडरीला असताना ऑल गोवा स्टुडंट्स युनियनने ( अगसू) विद्यार्थी संघटनेने या खासगी बसमध्ये विद्यार्थ्यांना पन्नास टक्के प्रवास भाडे सवलत मिळावी म्हणून आंदोलन केले होते. सतीश सोनक आणि मनोज जोशी हे आंदोलनाचे नेते होते. या आंदोलनाच्या वेळी पोर्तुगीज सत्तेतून मुक्त होऊन भारतात समाविष्ट झालेल्या गोव्यात पहिल्यांदाच खळखट्याक आवाज झाला ! आंदोलन यशस्वी होऊन विद्यार्थ्यांना प्रवासभाडे सवलत मिळाली ती आतापर्यंत चालू आहे. त्याकाळात म्हणजे १९७८ साली पणजी मिरामार प्रवास भाडे पंचवीस पैसे होते, या आंदोलनानंतर आम्हा विद्यार्थ्यांसाठी हे प्रवासभाडे तेरा पैसे इतके झाले हे आजही आठवते.
मी कॉलेजला शिकत असताना काही संघटनांनी गोव्यत खासगी बस वाहतूकसेवा बंद करुन सरकारी बस वाहतूक सेवा करावी अशी मागणी केली होती. या मागणीचे समर्थन करणाऱ्या रोलंड मार्टिन या विद्यार्थी नेत्याशी माझा नेहेमी वाद व्हायचा. महाराष्ट्रातील त्याकाळच्या बस वाहतुकीच्या अनुभवावरुन आणि गोव्यातील प्रवासीभिमुख खासगी बस सेवेमुळे माझा बस वाहतुकीच्या सरकारीकरणास ठाम विरोध असायचा. अलिकडच्या काळात कोलकाता आणि इतर काही शहरांत खासगी बसने प्रवास करण्याचा प्रसंग आला आणि ते अनुभव फारसे सुखावह नव्हते.
प्रतापसिंग राणे मुख्यमंत्री असताना १९८०च्या दशकांत गोव्यात सरकारी बस वाहतूक सुरू करण्यात आली. त्यासाठी कदंब वाहतूक महामंडळ स्थापन करण्यात आले. गोव्यात एके काळी कदंब घराण्याची राजसत्ता होती. म्हणून कदंब हे नाव ! कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन हे मुख्यमंत्री राणे यांच्या या आवडत्या अपत्याने मात्र बाळसे असे कधीच धरले नाही. कदंब वाहतूक महामंडळाची स्थापना होऊन चाळीस वर्षे उलटून गेली तरी आजही आजसुद्धा अगदी थोडयाच मार्गांवर निळ्या-पांढऱ्या रंगाच्या कदंब बस धावत असतात. सरकारी मालकीच्या असलेल्या या बसमध्ये प्रवाशांना तिकिटेही दिली जातात. पणजी-म्हापसा अशा ठराविक काही मार्गांवर विनावाहक तत्त्वावर कदंब बसेस चालतात. या बसमध्ये तुम्हाला बसायला जागा मिळू शकते, मात्र फेऱ्यांचे प्रमाण कमी असल्याने प्रवासी भरगच्च भरलेल्या खासगी बसचाच पर्याय निवडतात.
या खासगी बससेवेचा एक तोटा म्हणजे बस अगदी भरुन गेल्याशिवाय बसस्टॅण्ड सोडत नाही. कंडक्टरला फूटबोर्डवर जेमतेम पाय टेकवता येईल इतकी बस भरली की मगच बस पुढे ढळते . याउलट कदंब बस अगदी ठराविक वेळापत्रकानुसार सुटतात. मात्र कदंबाचे पगारदार ड्रायव्हर आणि कंडक्टरसुद्धा प्रवाशी आकर्षित करण्याचे प्रयत्न करतात हे मान्य करायला हवे.
गोव्यातील नागमोडी वळणाच्या अरुंद रस्त्यांवरून या खासगी बस आणि मिनीबस जातात, तेव्हा ड्रायव्हरच्या कौशल्याला दाद द्यावी लागते. एखादया टोंकापाशी (तीन रस्ते मिळतात ती जागा) बस थांबते तेव्हा कुणी प्रवासी आपल्या घरापासून येतो आहे काय याकडे ड्रायव्हर आणि कंडक्ट्रर या दोघांचेही लक्ष असते. त्याचवेळी मागून येणारी बस ओव्हरटेक करून पुढचे सर्व प्रवासी घेणार नाही याचीही त्यांना काळजी घ्यावी लागते. एखादी महिला सामानासह लांबून येताना दिसली की कंडक्ट्रर ड्रायव्हरला थांबण्याचा इशारा करतो. 'ये गो, बेगीन यो !' असे त्या महिलेलाही सांगतो. गोव्यात कोकणीत लहान-मोठयांशी एकेरीतच बोलले जाते. अगदी मुख्यमंत्री किंवा कुणाही मोठ्या व्यक्तीला आदरयुक्त स्वरात पण एकेरीतच 'तू बस हांगा!' असेच म्हटले जाते. कोकणी भाषेतला हा खास गोडवा ! प्रवाशांना बसमध्ये घेत असताना त्याचवेळी मागची बस ओव्हरटेक करुन पुढे उभे राहिलेले प्रवाशी घेणार तर नाही ना याची काळजी कंडक्ट्ररला असते. दररोजच्या फेऱ्यांमधून अधिकाधिक पैसा गोळा करण्यासाठी ड्रायव्हर आणि कंडक्ट्रर यांच्यामध्ये सुसूत्रता असते महत्त्वाचे असते.
प्रवाशांचे अवजड सामान ड्रायव्हरच्या केबिनमधील मोकळ्या जागेत ठेवले जाते. ज्येष्ठ नागरीकांचे आणि इतरही प्रवाशांचे सामान घेऊन ते ड्रायव्हरच्या शेजारच्या मोकळया जागेत ठेवण्यात कंडक्ट्रर मदत करतो. जास्तीत जास्त प्रवासी मिळवून उत्पन्न वाढवण्याचा प्रत्येक ड्रायव्हर अन कंडक्ट्रर प्रयत्न करत असतो त्यामुळे प्रवाशांना ही व्हीआयपी वागणूक !
गोव्यातील सिटी बसमधील पुढच्या निम्म्या जागा महिलांसाठी राखीव असतात. प्रवास सुरु झाला कि थोड्या वेळाने कंडक्ट्रर प्रवाशांकडून तिकिटाचे पैसे गोळा करू लागतो. तिकीट अर्थांतच नसते. बसमध्ये खूप गर्दी असली तर प्रत्येक स्टॉपवर बसमधून खाली उतरून कंडक्टर उतरणाऱ्या प्रवाश्यांकडून तिकिटाचे पैसे गोळा करत असतो. हा विश्वासाचा मामला असतो. या बसमध्ये तिकीट नसले तरी त्यामुळे तिकिटाचे पैसे न दिल्याबद्दल वाद कधी होत नाहीत हे विशेष. हा, `मोडचे' म्हणजे सुट्टे पैसे नसले तर गडबड होऊ शकते.
गोव्यातील प्रवासी वाहतुकीचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथील पायलट दुचाकी सेवा. तुम्ही पोणजे प्रासा किंवा पणजी आंतरराज्यीय बसस्टँडवर पोहोचला की पिवळ्या रंगाचे मडगार्ड असलेल्या मोटारसायकलींवरील पायलट तुम्हाला कुठे जायचे आहे असे विचारतील. अशा मोटारसायकल रिक्षा भारतात केवळ गोव्यातच असाव्यात.
खूप वर्षांपूर्वी म्हणजे १९७० आणि १९८०च्या दशकांत मी पणजीला शिकत असताना हे मोटारसायकल पायलट गोव्यात सगळ्या शहरांत चौकाचौकात आणि मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठया संख्येने दिसायचे. माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनाच्या काळात गोव्यात शेकडो युवकांना आणि इतरांना मोटारसायकल पायलटच्या सेवेने रोजगार मिळवून दिला होता. कर्जावर घेतलेल्या राजदूत आणि इतर मोटारसायकल एव्हढीच काय त्यांची यासाठी आर्थिक गुंतवणूक असायची. एखादी साडीवाली, फ्रॉकवाली किंवा स्कर्टधारी महिला मासे आणि भाजीपाला घेऊन पणजी मार्केटबाहेर आली की एखादा पायलटच्या दुचाकीवरून मिरामार, अल्तिनो किंवा सांत इनेजला जाई.
त्याकाळात या छोट्याशा अंतरासाठी किमान दहा रुपये भाडे असायचे. कामावर किंवा इतर कुठे जाणारी पुरुषमंडळी छोटया अंतरावर जाण्यासाठी या मोटारसायकल पायलट सेवेचा वापर करत. एका व्यक्तीसाठी तीनआसनी रिक्षापेक्षा मोटारसायकल पायलट सेवा अधिक स्वस्त असायाची. तीन -आसनी रिक्षा त्याकाळात प्रामुख्याने पर्यटकच वापरायचे.
दोन वर्षांपूर्वी थायलंडच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर सकाळ टाइम्सचा वार्ताहर म्हणून मी उपस्थित होतो. तेथे बँकॉक येथे सकाळी चौकाचौकात शाळकरी मुले-मुली अशाच मोटारसायकल पायलटबरोबर शाळेत जाताना दिसली आणि गोव्याच्या अशाच आगळ्यावेगळ्या प्रवाससेवेची आठवण झाली. का कुणास ठाऊक पण गेल्या काही वर्षांत या मोटारसायकल पायलटांची संख्या अख्ख्या गोव्यात खूपच कमी झाली आहे.
मात्र अलीकडच्या काळात प्रवासी दुचाकीची एका नवी सेवा गोव्यात सुरू झाली आहे. तुमच्याकडे पॅनकार्डसारखा ओळखपत्र पुरावा असला की तुम्हाला एखादी दुचाकी दिवसाला साडेतीनशे किंवा चारशे रुपयांस भाडयाने मिळू शकते. मागे एकदा मी एका पेट्रोलपंपावर उभा होते तेव्हा पेट्रोल भरणाऱ्या युवकाने विचारले, 'गोव्यात फिरायला आला का?' भाडेतत्त्वावर दिल्या जाणाऱ्या दुचाकीचे मडगार्ड व्यावसायिक वाहनाचे म्हणजे पिवळ्या रंगाचे असल्याने मी पर्यटक आहे हे त्याने ओळखले होते !
कोरोनाचा सद्याचा लॉकडाऊन संपला कि गोव्याचा दौरा करायला उत्सुक असणाऱ्या लोकांनी एकदा तरी गोव्याच्या या सिटी बसमध्ये प्रवास करायलाच हवा

Sunday, November 23, 2014

Goa CM's post : BJP bungles up in social engineering

Goa CM: BJP bungles up in social engineering
Sakal Times Reporters Name | CAMIL PARKHE | Wednesday, 19 November 2014 AT 03:58 PM IST
Send by email    Printer-friendly version
I had just arrived in Goa for a holiday when the newly elected Goa chief Minister Laxmikant Parsekar inducted two more Roman Catholics into his cabinet. (Christians in Goa always refer themselves as Catholics; Goans professing the Protestant sect of Christianity are almost non-existent in this tiny state). The induction of Independent legislator Avertano Furtado and Goa Vikas Party legislator Francisco alias Micky Pacheco was a part of the BJP's move to placate the Catholics who were apparently annoyed when deputy chief minister Francis D'Souza's 'natural' claim to the chief minister's post was rejected by the ruling party's high command.

Deputy Chief Minister Francis D'Souza had cut short his abroad tour when the BJP declared its plans to shift Goa Chief Minister Manohar Parrikar to the Union Cabinet for the coveted defence minister's post. D'Souza staked his claim to the vacant chief minister's post and also threatened to raise a banner of revolt if his claim was rejected. But Parsekar who was health minister in the Parrikar government was later unanimously elected leader of the Goa BJP legislative party.

Francis D'Souza had created a stir during the recent Lok Sabha poll campaign when he declared that he was a 'Hindu Christian.' During the parliamentary polls, he had also toured extensively in Christian-dominated pockets like Mumbai, Vasai in Thane districts and other parts of the country to tell the minority voters not to be wary of the BJP which stood only for 'development, efficient governance' and was not 'anti-minorities'.

Incidentally in the previous state assembly elections, D'Souza was elected with the highest margin of votes in Goa. The BJP had in 2012 elections won 21 of the total 40 assembly seats and most important, seven of these legislators were Catholics, elected from the predominantly Christian South Goa assembly constituencies. This was because Parrikar who could not win the simple majority in previous two state elections had later successfully implemented social engineering in Goa and succeeded in winning the faith of the Catholics who form nearly one third population in the state. Parrikar had then rewarded D'Souza with the number two position and also inducted other Catholics into his cabinet.

After winning the power with impressive vote percentage and also the number of seats in 2012 state elections, Parrikar and his party was expected to carry on the social engineering in the longer interest of the party and also the state. But in 2014 Lok Sabha elections, the BJP had forsaken social engineering and instead nominated Hindu nominees both in North Goa and South Goa Lok Sabha seats.

This was in contrast to the long popular mood in the state. Since Goa's Liberation from the Portuguese regime in 1962, the state's representation in the Lok Sabha has been even distributed equally among the two dominant communities in the North and South districts – Hindus and the Christians, irrespective of the political parties in the arena. The BJP this time had a golden opportunity to win both the seats while respecting the strength of both the communities in the two districts. The ruling BJP which had seven Catholics MLAs in its camp could have easily nominated one of them to contest the south Goa Lok Sabha seat and also win it easily. But it did just the opposite and also succeeded in winning both the seats- albeit with a very narrow margin in South Goa. The BJP which has been very vocal about pseudo-secularism and exploitation of the minority votes by the Congress and other so-called secular parties had a good opportunity to prove that 'development' was indeed its main plank and it represented all sections of the society.

Not a single member of the Muslim or other minority community was among the BJP's 282 Lok Sabha members elected in 2014 polls and the party had to induct Najma Heptullah and Mukhtar Abbas Naqvi into the Union ministry although they have not been elected to the Lok Sabha. Their induction into the ministry as Muslim faces of the party was badly needed to prove that the party represented all sections of society. By rejecting Deputy Chief Minister D'Souza's natural claim to the number one position, the BJP failed miserably to cash in on the popular support received from the major minority community and thus change its image as a 'sectarian' party.

Commenting on D'Souza's rejection of claim to the chief minister's seat, a political commentator in Goa wrote that D'Souza may have believed that he was a 'Hindu Christian' but the BJP did not believe so. The BJP will get many opportunities in future to prove that it stands for true development and all-inclusiveness and should not once again bungle up such chances.
 
0
 
0
 
Comments
James Selvaraj - Thursday, 20 November 2014 AT 06:32 PM IST
Its interesting !

Tuesday, May 13, 2014

Indians don’t figure in Vatican’s cardinals list

Indians don’t figure in Vatican’s cardinals list
- CAMIL PARKHE
Sakal Times
Friday, 22 October 2010 - 05:28 PM IST


PUNE: Indian archbishops and bishops were left out when Pope Benedict XVI announced appointment of 24 new cardinals all over the world at the Vatican on Wednesday. This is despite the fact that India has sizable number of practising Catholics and 30 archbishops and 125 bishops.

At present, India has six cardinals, Mumbai’s Ivan Dias presently based in Rome, Mar Varkey Vithayathil of Ernakulam-Angamaly, Ranchi’s Telesphore P Toppo, Mumbai’s Cardinal Oswald Gracias, Simon Pimenta (retired) and Cardinal D Simon Lourdusamy who resides in Rome.

For many years, a few of Indian clergies have been occupying high posts in the Church hierarchy at the global level. Pope Benedict has appointed Mumbai-born Cardinal Ivan Dias as Prefect of the Pontifical Congregation for the Evangelisation of Peoples. Vasai Bishop Felix Machado was for many years based at the Vatican as the Holy See’s official.

Non-inclusion of Indians among the new cardinals has expectedly disappointed members of the local Catholic Church. When contacted, a city-based Church official expressed his dismay over the Holy See’s decision not to elevate more Indian archbishops and bishops as cardinals.

Speaking on a condition of anonymity, the clergy, however, said that “the Holy Father in his wisdom has selected the new cardinals and we have full faith in him.”

Among the new cardinals are two Americans and others from Europe, Latin America, Asia and Africa.

The newly appointed ‘princes of the church’ will be formally elevated in Rome on Nov 20. Some of the Indian cardinals and archbishops are likely to attend the ceremony.

 
0
 
0
 
Comment
Manuel(Manik) - Sunday, 31 October 2010 - 11:57 PM IST
It is not the Number but the spirituality supplemented by paradigm changes in the life of common man that matters.we must remember to walk the talk right up to calvary of life ,like Jesus.we r forgetting He started his work for the Marginalized.he kept away from the rich...& luxuries .what r we doing so not the no.but one man son of God like is Required.Lets remember Jesus ...his life & Death every day and Emulate not Just Chant the Prayers Mechanically. Manu.
 
0
 
0
 
Manuel(Manik) - Sunday, 31 October 2010 - 11:53 PM IST
It is not the Number but the spirituality supplemented by paradigm changes in the life of common man that matters.we must remember to walk the talk right up to calvary of life ,like Jesus.we r forgetting He started his work for the Marginalized.he kept away from the rich...& luxuries .what r we doing so not the no.but one man son of God like is Required.Lets remember Jesus ...his life & Death every day and Emulate not Just Chant the Prayers Mechanically. Manu.
 
0
 
0
 
S.S.Waghmare - Saturday, 30 October 2010 - 02:58 PM IST
Dear Camil, I concur the views of Dr.Ajit Lokhande totally.
 
0
 
0
 
Vincent Bagul, Mumbai, India - Saturday, 23 October 2010 - 08:49 PM IST
It is not that whether we require more Cardinals or not. Actually, there are more Catholics in Asian countries than in Europe or America. I would demand that next Pope should be Indian.
 
0
 
0
 
Walter Kamble - Saturday, 23 October 2010 - 12:05 PM IST
We should not harp upon having no new Cardinals in Vatican. The Church in India is alive and hapenning. The Church should not play the number game. Ours is an Universal "Catholic" Church so having more Cardinals, in my opinion will not change anything for the Christians in India. YES the CBCI should be more proactive and stress upon the Vatin to strengthen the situation of the Church in India. Most important Nashik Diocese needs a Bishop immediately that too a Son of the Soil.
 
0
 
0
 
Fr. Michael G. - Friday, 22 October 2010 - 07:51 PM IST
Its a point for Indian Bishops to ponder. Considering the continent-like size of our country India trully needs one or two more Cardinals. They will help better organise the church affairs in the country and also offer themsemselves as candidates for the responsibility as future popes.The Bishops Conference (CBCI) must convince Vatican of the need and even put the demand forcefully. _Fr. Michael G., Vasai President Marathi Khristi Sahitya Parishad & Indian Catechetical Association.
 
0
 
0
 
robert Das - Friday, 22 October 2010 - 07:30 PM IST
It is interesting that the Nashik Diocese is still waiting for the announcment of the new Bishop for more than a year now. Are we getting a European Bishop for Nashik? if so, then, perhaps it will take another year for him to master Marathi and another year for Hindi. Let us hope for the best. We are still waiting and praying.
 
0
 
0
 
Dr. Ajit LOKHANDE - Friday, 22 October 2010 - 06:55 PM IST
I find it no calamity if there is no new Indian Cardinal. The Indian church remains what it is even without more cardinals. Let us make our Indian church more vibrant, live better Christian life, spread more comittedly Christ's love. Let us have a broad heart and rejoice sincerely for and with the new cardinals in the universal church.
 
0
 
0